---Advertisement---

“ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंना हेड कोच साठी कुठलीही ऑफर दिलेली नाही”, नकार मिळाल्यानंतर जय शाह यांच्याकडून सारवासारव

Jay Shah
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. बीसीसीआयनं या पदासाठी ऑस्टेलियाचा माजी खेळाडू रिकी पाॅटिंगला ऑफर दिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यासोबतच लखनऊ सुपर जायंट्सचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांचंही नाव समोर आलं होतं.

आता या सर्व चर्चांवर आता बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शाह यांनी, बीसीसीआयनं ऑस्ट्रेलियन खेळाडूंना कुठलीही ऑफर दिली नसल्याचं स्पष्ट केलंय. व्हायरल होत असलेल्या ह्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या असल्याचं ते म्हणाले.

टीम इंडीयाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ टी20 विश्वचषकानंतर संपणार आहे. त्यामुळे बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. त्यासाठी बीसीसीआयनं अर्ज मागवले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयनं रिकी पाॅटिंग आणि जस्टिन लँगर यांना मुख्य प्रशिक्षकासाठी ऑफर दिली होती. मात्र आता अशी कोणतीही ऑफर बीसीसीआयनं दिली नसल्याचं जय शाह यांनी स्पष्ट केलं आहे.

‘एएनआय’शी बोलताना जय शाह म्हणाले, “जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलतो, तेव्हा भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदापेक्षा कोणतंही पद मोठं नाही. भारतीय क्रिकेट संघाचे चाहते जगभरात आहेत. त्यामुळे बीसीसीआय योग्य व्यक्तीचीच निवड करेल. बीसीसीआयनं कोणत्याही माजी ऑस्टेलियन खेळाडूंना ऑफर दिली नाही. व्हायरल होत असलेल्या बातम्या चुकीच्या आहेत.”

आगामी टी20 विश्वचषकात भारताचा पहिला सामना 5 जूनपासून आयर्लंड विरुद्ध न्यूयॉर्कमधील नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर होईल. यानंतर 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान सामना रंगणार आहे. या विश्वचषक स्पर्धेनंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपेल. राहुल द्रविड यांच्या मार्गदशानाखाली भारतीय क्रिकेट संघानं चांगली कामगिरी केली आहे. मात्र कुटुंबाला अधिक वेळ देण्यासाठी द्रविड यांनी मुख्य प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

एलिमिनेटर सामन्यातील पराभवानंतर विराट कोहली झाला भावूक; म्हणाला, “आम्ही सन्मानासाठी खेळलो आणि…”

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच यांच्या नात्यात दुरावा? इंस्टाग्रामवरून आडनाव हटवल्यामुळे खळबळ!

दिनेश कार्तिक पाठोपाठ आता ‘गब्बर’ही करणार क्रिकेटला अलविदा? शिखर धवनच्या निवृत्तीबाबत काय आहे अपडेट?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---