२०१३ साली क्रिकेटजगतात एका नव्या टी२० क्रिकेट लीगने एंट्री केली. ही लीग म्हणजे वेस्ट इंडिजची सर्वात चर्चेत असणारी कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल). गेल्या ७ हंगामात सीपीएलच्या प्रसिद्धीत वाढ झाली आहे. यावर्षी सीपीएलचा आठवा हंगाम १८ ऑगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान खेळण्यात येणार आहे.
सीपीएलमध्ये अनेक स्टार क्रिकेटपटू उत्तमोत्तम कामगिरी करताना दिसतात. यात वेस्ट इंडिजच्या खेळाडूंपासून ते इतर परदेशी खेळाडूंचाही समावेश होतो. या लेखात, सीपीएलच्या ८व्या हंगामात शानदार प्रदर्शन करण्यासाठी सज्ज असणाऱ्या ४ परदेशी खेळाडूंचा आढावा घेण्यात आला आहे. 4 Overseas Players Would Be Star Of CPL 2020
१. राशिद खान –
अफगाणिस्तान संघाचा फिरकीपटू राशिद खान हा कोणत्याही संघातील प्रमुख गोलंदाज बनण्याची क्षमता राखतो. त्याचा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील इकोनॉमी रेट हा ६.१४ इतका आहे. राशिद सीपीएल २०१७मध्ये गयाना अमेझॉन वॉरियर्स संघाचा भाग होता. त्यावेळी पूर्ण हंगामात त्याने १२ सामने खेळत १४ विकेट्स चटकावल्या होत्या.
सीपीएलमधील राशिदचा इकोनॉमी रेट हा ५.८२ इतका आहे. त्यामुळे सीपीएल इतिहासातील सर्वाोत्कृष्ट इकोनॉमी रेट असणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. राशिद सीपीएल २०२०मध्ये बार्बाडोस ट्रिडेंट्स या संघाकडून खेळताना दिसेल.
२. इमरान ताहिर –
दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इमरान ताहिर हा ४१ वर्षाचा आहे. वयाशी चाळीशी ओलांडली तरीही त्याच्या गोलंदाजी प्रदर्शनासमोर मोठमोठे फलंदाज त्यांचे पाय टेकतात. ताहिरने सीपीएलमध्ये आजवर २१ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने १५.०३च्या सरासरीने ३२ विकेट्स घेतल्या आहेत.
तर त्याचा सीपीएलमधील इकोनॉमी रेट हा ५.७९ इतका आहे. त्यामुळे तो सीपीएल इतिहासात सर्वोत्कृष्ट इकोनॉमी रेट असणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दूसऱ्या क्रमांकावर आहे. यावर्षी ताहिर सीपीएलच्या गयाना अमेझॉन वॉरियर्स संघाकडून दमदार गोलंदाजी प्रदर्शन करताना दिसेल.
३. रॉस टेलर –
न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर हा एकमेव क्रिकेटपटू आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात १०० किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळले आहेत. आपल्या खतरनाक फलंदाजीने टेलरने सीपीएलमध्ये ७००पेक्षाही जास्त धावांचा आकडा पार केला आहे. त्याने सीपीएलमध्ये ३६ सामने खेळत ७२४ धावा केल्या आहेत. पण, टेलर सीपीएलमध्ये एकही शतक करु शकला नाही. त्याच्या सर्वाधिक स्कोर हा ७० धावा इतका आहे.
सीपीएल २०२० मध्ये टेलर गयाना अमेझॉन वॉरियर्स संघाकडून खेळणार आहे. यंदा तो सीपीएलमध्ये शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आपले नाव सामाविष्ट करण्याच्या प्रयत्नात असेल. तसेच, आपल्या शानदार फलंदाजी प्रदर्शनाने संघाला ट्रॉफी जिंकून देण्याचा प्रयत्न करेल.
४. कॉलिन मुनरो –
ट्रिनबागो नाइट रायडर्स संघ सीपीएलच्या आत्तापर्यंतच्या ७ हंगामात तीन वेळा विजेता ठरला आहे. यावर्षी ते चौथ्यांदा ट्रॉफी पटकावण्यासाठी प्रयत्न करताना दिसतील. त्यांच्या संघात समावेश असणाऱ्या न्यूझीलंडचा सलामीवीर मुनरोचा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील स्ट्राईक रेट हा १५६.४४ इतका आहे. त्यामुळे मुनरोचे नाव त्या निवडक फलंदाजांच्या यादीत येते ज्यांचा टी२० क्रिकेटमधील स्ट्राईक रेट हा १००पेक्षा जास्त आहे.
मुनरो २०१६ पासून सीपीएलचा भाग आहे. २०१६-१९ दरम्यान मुनरोने ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ४६ सामने खेळत १५४६ धावा केल्या आहेत. यात त्याच्या नाबाद १०० धावांचा समावेश आहे. तसेच त्याने सीपीएलमध्ये १२ अर्धशतके ठोकली आहेत. सीपीएल २०२०मध्येही मुनरो ट्रिनबागो नाइट रायडर्स संघाकडून खेळताना दिसेल.
ट्रेंडिंग लेख –
गेल, रसेल नव्हे तर या ३ फलंदाजांची सरासरी आहे टी२० मध्ये सर्वोत्तम
४ दिग्गज कर्णधार ज्यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला
ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये १२ चेंडूत अर्धशतक झळकावणारे ३ महारथी
महत्त्वाच्या बातम्या –
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा, स्टोक्सच्या जागी या क्रिकेटरला मिळाली संधी
जर २०२१ विश्वचषक आयोजनाला भारत नाही म्हटला तर हे देश आहेत तयार
मुंबईचा ‘डेल स्टेन’ अशी ओळख असलेल्या क्रिकेटरची आयपीएलमध्ये संधी न मिळाल्याने आत्महत्या