---Advertisement---

गेल, रसेल नव्हे तर या ३ फलंदाजांची सरासरी आहे टी२० मध्ये सर्वोत्तम

On: गुरूवार, ऑगस्ट 13, 2020 10:29 AM
---Advertisement---

टी२० हे क्रिकेटचे असे प्रारुप आहे, ज्यात फलंदाज वेगाने धावा काढत आपल्या संघाला विजयी करण्यासाठी प्रयत्नशील असतात. टी२० मध्ये स्ट्राइक रेटला खूप महत्त्व दिले जाते. मात्र, सरासरी देखील तितकीच महत्त्वाची आहे. बरेचसे, फलंदाज टी२० मध्ये आपली सरासरी अनेकदा संतुलित राखू शकत नाहीत.

वेस्ट इंडीजचे फलंदाज हे टी२० क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवत असलेले आपण अनेकदा पाहतो. गेल, रसेल, पोलार्ड यांसारखे खेळाडू तर आताच टी२० चे दिग्गज झाले आहेत. या सर्व खेळाडूंचा स्ट्राइक रेट कितीही असला तरी सरासरी मात्र, कमी आहे.

आज आम्ही तुम्हाला अशा खेळाडूंविषयी सांगणार आहोत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये कमीत कमी १००० धावा बनवताना, सर्वोत्तम सरासरी राखली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यामध्ये एकही वेस्टइंडीज फलंदाज नाही.

३) केएल राहुल

भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा नियमित सदस्य असलेला व सध्या संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या, केएल राहुलचा या यादीत समावेश आहे. क्रिकेटचा एक आदर्शवत खेळाडू म्हणून त्याची जगभरात ख्याती आहे. २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केल्यापासून राहुलने अनेकदा भारतीय संघाच्या विजयात आपल्या सर्वांग सुंदर फलंदाजीने हातभार लावला आहे.

जगातील सर्वोत्तम तंत्रशुद्ध फलंदाजांपैकी एक असलेल्या राहुलमध्ये, एका टी२० स्पेशालिस्ट खेळाडूंमध्ये जे गुण हवे ते सर्व गुण आहेत. राहुलने आत्तापर्यंत ४२ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करताना ४५.६५ च्या सरासरीने १,४६१ धावा फटकावल्या आहेत. सर्वाधिक सरासरी असलेल्या खेळाडूंमध्ये त्याचा तिसरा क्रमांक लागतो.

२) बाबर आझम

आजकाल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ताऱ्याप्रमाणे चमकत असलेला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकल्यापासून बाबर आझम सातत्याने जबरदस्त कामगिरी करत आहे.आपल्या छोट्याशा कारकीर्दीत त्याने जगभरातील तमाम क्रिकेट रसिकांना आपल्या फलंदाजीने मंत्रमुग्ध केले आहे.

तांत्रिकदृष्ट्या मजबूत असलेल्या बाबर आझमने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्येही आपला डंका वाजवला आहे. आझम सध्या आंतरराष्ट्रीय टी२० फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. बाबरने आतापर्यंत ३८ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ५०.७२ च्या सरासरीने १,४७१ धावा केल्या आहेत.

१) विराट कोहली

भारताचा तीनही प्रकारातील विद्यमान कर्णधार विराट कोहली याचा या यादीत प्रथम क्रमांक लागतो. ‘रनमशीन’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावांचा रतीब घातला आहे. कसोटी व एकदिवसीय सामन्यांप्रमाणे, टी२० चे सुद्धा अनेक सामने कोहलीने एकहाती जिंकून दिले आहेत.

सद्यस्थितीत, विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. कोहलीने आत्तापर्यंत खेळलेल्या ८१ आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ५०.८० च्या सरासरीने २७९४ धावांचा डोंगर रचला आहे. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये, सर्वोत्तम सरासरी असणाऱ्या खेळाडूंत कोहली शीर्षस्थानी विराजमान आहे.

ट्रेंडिंग लेख –

किस्से क्रिकेटचे: त्या टांगेवाल्याने ‘लिफ्ट’ दिली नसती, तर जगाला कधीच एक दिग्गज क्रिकेटपटू भेटला नसता

भारताच्या ८८ वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात सर्वात यशस्वी ठरलेले ५ कर्णधार

ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये १२ चेंडूत अर्धशतक झळकावणारे ३ महारथी

महत्त्वाच्या बातम्या – 

मुंबईचा ‘डेल स्टेन’ अशी ओळख असलेल्या क्रिकेटरची आयपीएलमध्ये संधी न मिळाल्याने आत्महत्या

बुमराह, मलिंगा का स्टार्क? सुपर ओव्हरमधील बेस्ट गोलंदाज कोण? भारतीय दिग्गजाने घेतले हे नाव

पहिल्याच वनडेत धमाकेदार ५५ धावा करुनही परत कधीच संधी न मिळालेला क्रिकेटर म्हणतोय, माझी…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---