वनडे मालिकेत विंडीजला क्लीन स्विप दिल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेतही विजयाने सुरुवात केली. त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर टीम इंडियाने ६ गड्यांच्या बदल्यात १९० धावा केल्या आहेत. यानंतर यजमानांना ८ गड्यांच्या बदल्यात १२२ धावाच करता आल्या. या टी-२० सामन्यात रोहित शर्माचे कर्णधार म्हणून पुनरागमन झाले असून त्याला वनडे मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय संघाने २० षटकांत ६ गडी गमावून १९० धावा केल्यानंतर यजमान संघाला८ गड्यांच्या मोबदल्यात १२२ धावाच करता आल्या. त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला जाणारा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना जिंकून भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली आहे. या विजयात भारताच्या ४ खेळाडूंनी आपली चमक दाखवून दिली.
कर्णधार रोहित शर्मा
भारतीय कर्णधार रोहित शर्माने संघात पुनरागमन करताना दमदार शैलीत फलंदाजी केली. त्याने ४४ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६४ धावा केल्या. रोहित आणि सूर्यकुमार यादव यांनीही ४४ धावांची सलामीची भागीदारी केली. रोहित सलामीला उतरला आणि संघाची ५वी विकेट म्हणून पॅव्हेलियनमध्ये परतला, तेव्हा भारताची धावसंख्या १२७ धावांवर पोहोचली होती. रोहित शर्माने केवळ बॅटनेच कमाल दाखवली नाही तर कर्णधारपदाबाबत काही वेगळे निर्णयही घेतले. त्याने सलामीला सूर्यकुमार यादवला सोबत आणले. हार्दिक पांड्या पाचव्या तर रवींद्र जडेजा सहाव्या क्रमांकावर आहे. भुवनेश्वर कुमारने फक्त २ षटके टाकली तर रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी ४ षटके टाकली.
दिनेश कार्तिक
दिनेश कार्तिकने पुन्हा एकदा आपल्या बॅटने धमाल केली. त्याला ‘फिनिशर’ का म्हटले जात आहे, हे त्याने सिद्ध केले. कार्तिक ७व्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने तुफानी खेळ केला. यामुळे त्याची सामनावीर म्हणूनही निवड करण्यात आली. दिनेश कार्तिकच्या फलंदाजीमुळेच टीम इंडियाला १९० धावांपर्यंत मजल मारता आली. कार्तिकने १९ चेंडूत ४१ धावांची तुफानी खेळी खेळली आणि नाबाद परतला. त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले. विशेष म्हणजे कार्तिकचा स्ट्राईक रेट २१५ पेक्षा जास्त होता.
रविचंद्रन अश्विन
स्टार अष्टपैलू रविचंद्रन अश्विन तब्बल ८ महिन्यांनंतर टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. त्याने १० चेंडूत १ षटकाराच्या मदतीने १३ धावा केल्या आणि नाबाद परतला. कार्तिक आणि अश्विनने ७व्या विकेटसाठी नाबाद ५२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर अश्विननेही ४ षटकात २२ धावा देत २ बळी घेतले.
युवा गोलंदाज अर्शदीप सिंग
युवा गोलंदाज अर्शदीप सिंग आपल्या कारकिर्दीतील दुसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि त्याने खूप प्रभावित केले. अर्शदीपने ४ षटकात २४ धावा देत २ बळी घेतले. अर्शदीपने सलामीवीर काइल मेयर्स आणि अकील हुसेन यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अनुभवी भुवनेश्वर कुमारने फक्त २ षटके टाकली आणि ११ धावांत १ बळी घेतला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
फलंदाजांनी चोपलं, गोलंदाजांनी रोखलं; पहिल्या टी२०त भारताचा वेस्ट इंडिजवर ६८ धावांनी एकतर्फी विजय
सूर्याचा धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न, आगळ्यावेगळ्या फटक्याला पाहून व्हाल अचंबित
नाद नाद नादच! कॉमनवेल्थ गेम्समधील भारताची ‘सिक्सर क्विन’ बनली हरमनप्रीत, व्हिडिओ व्हायरल