सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी (Garfield Sobers Trophy) ‘क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कारासाठी 4 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या 4 खेळाडूंमध्ये भारतीय वेगवान गोलंदाज ‘जसप्रीत बुमराह’चा (Jasprit Bumrah) समावेश आहे. बुमराहशिवाय इंग्लंडचा हॅरी ब्रूक (Harry Brook), जो रूट (Joe Root) आणि ऑस्ट्रेलियाचा ट्राव्हिस हेड (Travis Head) यांना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. यंदा या खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी केली आहे. तथापि, कोणत्या खेळाडूला सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले जाते हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
भारतीय संघाने यंदाच्या टी20 विश्वचषकाचे (T20 World Cup) विजेतेपद पटकावले. भारतीय संघाच्या विश्वचषक विजयात जसप्रीत बुमराहचे महत्त्वाचे योगदान होते. त्याने या स्पर्धेत 15 विकेट्स घेतल्या. कसोटी व्यतिरिक्त बुमराहने वनडे आणि टी20 फॉरमॅटमध्येही उत्कृष्ट गोलंदाजी केली. मात्र, आता या दिग्गज वेगवान गोलंदाजाचे सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे. याआधी बुमराहला आयसीसी कसोटी प्लेयर ऑफ द इयरसाठी नामांकन मिळाले होते.
ऑस्ट्रेलियाविरूद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ‘जसप्रीत बुमराह’ची (Jasprit Bumrah) कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. आतापर्यंत बुमराहने 4 सामन्यात 12.83च्या सरासरीने 30 फलंदाजांना बाद केले आहे. सध्या सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो पहिल्या स्थानी आहे. जर आपण त्याच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने आतापर्यंत 44 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ज्यामध्ये त्याने 2.76च्या इकॉनॉमी, 19.43च्या सरासरीने 203 विकेट्स घेतल्या आहेत.
Four top performers set the standard in the longest format in 2024 💪
Presenting the nominees for ICC Men’s Test Cricketer of the Year 🗒️ #ICCAwards | #WTC25https://t.co/PN3E7Z6seY
— ICC (@ICC) December 30, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS; “त्याने स्वत: समजून घेणे…” रिषभ पंतबद्दल काय म्हणाला भारतीय कर्णधार?
मेलबर्नमधील लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माची प्रतिक्रिया, म्हणाला…
या 3 खेळाडूंमुळे मेलबर्न कसोटीत भारताचा पराभव झाला, सविस्तर जाणून घ्या