मुंबई इंडियन्स संघ हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मानला जातो. आयपीएलचे सर्वाधिक ४ विजेतेपद या संघाने आपल्या नावावर केले आहेत. मुंबईचे हे यश त्यांच्या खेळाडूंमुळे त्यांना मिळाले आहे. या संघात असे काही महत्त्वाचे खेळाडू आहेत ज्यांना मुंबईने कदाचित रिलीझ करू नये.
हंगामाची सुरुवात पराभवाने करून शेवट विजयाने करणारा संघ अशी मुंबईची एक वेगळी ओळख आहे. परदेशात खेळताना मुंबईचा संघ ढिसाळ कामगिरी करतो, असे या हंगामापूर्वी जाणकार म्हणत होते. 2009 साली दक्षिण आफ्रिकेत फक्त पाच सामने मुंबईचा संघ जिंकला होता. त्यानंतर 2014 साली यूएई येथे झालेले पाचही सामने मुंबईने गमावले होते. आयपीएल सुरू होण्यापूर्वी मुंबईने परदेशात एकूण 19 सामने खेळले होते. त्यातील 5 सामन्यांत विजय, तर 14 सामन्यात मुंबईने पराभव स्विकारला होता.
या हंगामातील चेन्नई विरुद्धचा पहिला सामना मुंबईचा परदेशातील 20वा सामना होता जो मुंबईने गमावला होता. आणि विदेशात सामना जिंकण्याची सरासरी ही फक्त 25% झाली. युएईमध्ये मुंबईला पहिला विजय हा त्यांच्या आतापर्यंतच्या 7व्या व या हंगामातील दुसऱ्या सामन्यात मिळाला. त्यानंतर मुंबईने मागे वळून न पाहता हा मुद्दाच खोडून पाडला. मुंबईला यशस्वी करण्यामागे त्यांच्या काही यशस्वी खेळाडूंचा महत्त्वाचा हात आहे.
मुंबईने या खेळाडूंना संघातून कधीही बाहेर काढू नये
1. हार्दिक पंड्या
मुंबईने 2015 साली फक्त 10 लाख रुपयांच्या मुळ किंमतीत हार्दिक पंड्याला संघात घेतले होते. पुढे 2018 साठी हार्दिकला संघात घेण्यासाठी 11 कोटी मुंबईला मोजावे लागले होते. मिळालेल्या संधीचे सोने करीत हार्दिकने स्वतःची किंमत वाढवली आहे. आज तो मुंबईचा एक महत्त्वाचा खेळाडू बनला आहे. त्याने गेल्या 6 हंगामात मुंबईसाठी आतापर्यंत 79 सामने खेळले असून 1346 धावा व 42 बळी घेतले आहेत.
2. जसप्रीत बुमराह
जसप्रीत बुमराह हा सध्या मुंबईचा अतिमहत्त्वाचा वेगवान गोलंदाज आहे. मुंबई संघातच त्याने 2013 साली आयपीएल साठी पदार्पण केले आहे. निर्णायक क्षणी बुमराहच्या गोलंदाजीवर मुंबईचा संघ सामना काढून आणू शकतो. बुमराहने आतापर्यंत आयपीएल मध्ये मुंबईसाठी 91 सामन्यांत 109 बळी घेतले आहेत.
3. कायरन पोलार्ड
कायरन पोलार्ड देखील आयपीएल मध्ये फक्त मुंबईच्या संघात खेळलेला आहे. आतापर्यंत त्याने मधल्या फळीला एक भक्कम आधार दिला असून उपकर्णधार म्हणून वेळेला आपले योगदान देखील दिले आहे. पोलार्डने मुंबईसाठी 165 सामने खेळले असून 3014 धावा व 60 बळी घेतले आहेत.
4. रोहित शर्मा
मुंबईच्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा त्याच्या संघासाठी सर्वात महत्वाचा खेळाडू आहे. 2007 च्या विश्वचषकातुन आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पाऊल ठेवणाऱ्या रोहित शर्माला डेक्कन चार्जर्स हैदराबाद ने 2008-2010 पर्यंत पहिल्या तीन हंगामासाठी संघात घेतले होते. त्यानंतर 2011 साली मुंबईच्या संघाने मुंबईकर रोहित शर्माला लिलावातून संघात घेतले. 2013 पासून रोहित मुंबईचे कर्णधारपद भुषवत आहे. पहिल्याच हंगामात त्याने आपल्या नेतृत्वाखाली मुंबईला पहिला आयपीएल चषक जिंकवून दिला होता. त्याने मुंबई संघासाठी 154 खेळले असून 3992 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने संपूर्ण आयपीएल कारकिर्दीत 199 सामने खेळत 5162 धावा केल्या आहेत. सोबतच 2020 चा अंतिम सामना त्याच्या आयपीएल कारकिर्दीतला 200 वा सामना असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-ब्रेकिंग ! गौतम गंभीर सेल्फ आयसोलेट, स्वतः ट्विट करून दिली माहिती
-ऑस्ट्रेलियाला जाण्याआधी कोहलीचे मोठे भाष्य, ‘या’ कारणामुळे दौरे मोठे नसावेत
-“वैयक्तिक कीर्तिमान महत्वाचे परंतु…”, दिल्लीविरुद्धच्या विजयानंतर सूर्यकुमारची खास प्रतिक्रिया