---Advertisement---

आयपीएल २०२२ साठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ ‘या’ ३ खेळाडूंना करू शकतात रिटेन

On: शुक्रवार, नोव्हेंबर 19, 2021 2:47 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ स्पर्धेचा दुसरा टप्पा यूएईमध्ये आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने अप्रतिम कामगिरी केली होती. त्यांना जेतेपद मिळवता आले नसले तरी देखील प्लेऑफ पर्यंत त्यांनी जबरदस्त कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

तसेच इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेत मोठे फेरबदल पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेत २ नवीन संघांची एंट्री होणार आहे. यासह खेळाडूंचा मोठा लिलाव देखील करण्यात येणार आहे. प्रत्येक संघाला जास्तीत जास्त ४ खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशातच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे. हा संघ कुठल्या खेळाडूंना रिटेन करू शकतो? याबाबत अधिक माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

विराट कोहली – विराट कोहली आयपीएल २०२२ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार नाहीये. गेल्या ४ हंगामापासून त्याला फ्रेंचायजीकडून १७ कोटी रुपये मानधन दिले जात आहे. यावेळी त्याला १६ कोटी रुपये मानधन दिले जाऊ शकते. यासह तो सर्वात महागडा खेळाडू देखील ठरू शकतो. तसेच त्याने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, तो शेवटपर्यंत आरसीबीकडूनच खेळेल. त्यामुळे संघ त्याला रिटेन करण्याची दाट शक्यता आहे.

युझवेंद्र चहल – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आपल्या अनुभवी गोलंदाजाला पुन्हा एकदा संघात घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. टी२० क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक युझवेंद्र चहलने ११३ सामन्यात २२.०४ च्या सरासरीने १३९ गडी बाद केले आहेत. त्याने गेल्या अनेक वर्षांपासून संघाकडून खेळताना महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. तो संघाच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक राहिला आहे.

देवदत्त पडीक्कल – देवदत्त पडिक्कल याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सलामीवीर फलंदाज म्हणून प्रवेश केला होता. त्याने आयपीएल २०२० स्पर्धेत ४११ आणि आयपीएल २०२१ मध्ये ४७३ धावा केल्या. तसेच तो सध्या केवळ २१ वर्षांचा आहे. त्यामुळे त्याचा फॉर्म पाहाता आणि भविष्याच्या दृष्टीने आरसीबी या युवा खेळाडूला संघात कायम करु शकतात.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारत-न्यूझीलंड दुसऱ्या टी२० सामन्यादरम्यान दवाचा प्रभाव जाणवणार? पाहा कोणासाठी असेल अनुकूल खेळपट्टी

आणि एबी डिविलियर्सचे ते स्वप्न अखेर अपुर्णच राहिलं!

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या टी२० सामन्यासाठी ‘महा ड्रीम ११’; हे खेळाडू करुन देऊ शकतात पैसा वसूल!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---