प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात अशी वेळ येतेच जेव्हा तो त्याच्या कारकिर्दीला पूर्णविराम लावून खेळातून संन्यास घेतो. खेळातून निवृत्ती घेण्याचा निर्णय कोणत्याही खेळाडूसाठी सोपा नसतो. बऱ्याच काळापासून खेळाशी जोडलेले नाते हे त्यानंतर तूटणार असते, ज्यामुळे आयुष्यात एक प्रकारे पोकळी निर्माण होते. निवृत्ती घेण्याचा निर्णय खेळाडूंचा वैयक्तिक असतो. पण काहीवेळा खेळ आणि मैदानावर अतिरिक्त गोष्टीही यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतात.
आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले प्रदर्शन करताना निवृत्ती घेणे फार कठीण असते आणि अनेक खेळाडूंनी अशाप्रकारे निवृत्ती घेतली आहे. या खेळाडूंनी जरी आंतरराष्ट्रीय स्तरावरून निवृत्ती घेतली असली; तरीही इतर ठिकाणी हे खेळाडू त्यांचे खेळाचे कौशल्य दाखवताना दिसतात. त्यामुळे खेळातील जाणकार लोक त्यांना आजही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी सक्षम समजतात. आपण या लेखात अशा खेळाडूंचा उल्लेख करणार आहोत, जे आजही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करू शकतात.
4. थिसारा परेरा-
श्रीलंकेचा खेळाडू थिसारा परेर याने नजीकच्या काळातच वयाच्या 32व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने हा निर्णय येणाऱ्या आयसीसी स्पर्धेत युवा खेळाडूंना संधी मिळण्यासाठी घेतला. श्रीलंकेचा सध्याच्या संघातील काही खेळाडूंचे प्रदर्शन खराब चालू आहे आणि परेरा आजही सहज श्रीलंकन संघात खेळू शकतो. त्याने एकदिवसीय प्रकारात 3000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्या व्यतिरिक्त गोलंदाजीमध्ये एकूण 237 आंतरराष्ट्रीय विकेट्स मिळवले आहेत. नजीकच्या काळात श्रीलंकेतील लिस्ट-ए स्पर्धेत खेळताना बरीचशी अर्धशतके केली, जी हेच दर्शवतात की परेरा आजही सध्याच्या श्रीलंकन खेळाडूपेक्षा उत्तम कामगिरी करू शकतो.
3. हसिम आमला-
हासिम आमला हा खेळाडू क्लासिक फलंदाजीसाठी ओळखला जातो. या खेळाडूच्या फलंदाजीत प्रेक्षणीय टोलेबाजी असायची. विराट कोहलीलाही त्याने काही काळासाठी आकड्यांमध्ये मागे टाकले होते. आमलाने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला 2019 मध्ये अलविदा केले. मात्र त्याचे घरेलू आणि काउंटी क्रिकेट खेळ चालूच आहे. या हंगामातील काउंट क्रिकेटमध्ये सर्रेसाठी खेळताना 8 सामन्यात 57.70 च्या सरासरीने 577 धावा बनवल्या आहेत. ज्यात दोन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. सध्या दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघात एकही असा खेळाडू नाही जो या दिग्गजांची जागा भरून काढू शकेल. आजही आमला त्याच्या उत्तम प्रदर्शनामुळे आंतरराष्ट्रीय संघात खेळू शकतो.
2. मोहम्मद आमिर-
पाकिस्तानचा प्रतिभाशाली वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने केवळ वयाच्या 28व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांना अचंबित केले होते. प्रशिक्षक आणि व्यवस्थापनासोबत झालेल्या मतभेदांमुळे आमिरने हे पाऊल उचलले होते. आमीर उत्तम गोलंदाज असून त्याने महत्वाच्या वेळेला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीने हे सिद्ध केले आहे.
आगामी टी20 विश्वचषक पाहता आमिरसारखा अनुभवी गोलंदाज पाकिस्तान संघासाठी खूप महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो. बाबर आजम तथा अन्य लोक त्याच्याशी सातत्याने बोलत आहेत. त्यामुळे ही गोष्ट पाहावी लागेल कि, तो आता पुन्हा संघात येतो का?
1. एबी डिव्हिलियर्स-
दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक एबी डिव्हिलियर्स ने 2018 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून अचानक संन्यास घेतला. त्याच्या निर्णयाने क्रिकेटविश्व हैरान झाले होते. त्याने नंतर 2019 मध्ये विश्वचषक खेळण्याची इच्छा असल्याचे दाखवले आणि पुनरागमन करण्याविषयीही बोलला होता. पण दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने ते अमान्य केले. त्यानंतर त्याच्या आयपीएलमधील कामगिरीनंतर येत्या टी20 विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिका संघामध्ये पुनरागमन करण्याची चर्चा होती. पण त्याने आपला निर्णय बदलला नाही आणि आता तो माघारी येणार नाही.
या फलंदाजाने निवृत्तीनंतर वेगवेगळ्या टी20 स्पर्धांमध्ये दिग्गज आंतरराष्ट्रीय गोलंदाजांविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे. यावरून दिसते की तो आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी आजही तयार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
असे ४ प्रसंग, जेव्हा कसोटी सामन्यात एकाच दिवशी बनल्या होत्या ५०० हून जास्त धावा
अजिंक्य रहाणेचे खराब प्रदर्शन ‘या’ २ फलंदाजांसाठी खुले करू शकते कसोटी संघाचे दरवाजे
‘हे’ ३ भारतीय फलंदाज आहेत ‘लंबी रेस का घोडा’! मोडू शकतात सचिनचा मोठा विश्वविक्रम