---Advertisement---

गोलंदाजांना धु- धु धूताना कसोटीत एकाच दिवशी ५०० धावा करणारे संघ

On: शुक्रवार, ऑगस्ट 7, 2020 11:08 AM
---Advertisement---

कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज संथ परंतू विश्वासपुर्ण खेळाला महत्त्व देतात. यामध्ये खेळाडूंकडे खेळण्यास पूर्ण वेळ असतो. म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये आपल्याला खूप मोठी धावसंख्या पहायला मिळतात. खेळाडू जोखीम न घेता या स्वरूपात धावा करण्याचा प्रयत्न करतात.
परंतु, बर्‍याच वेळा असे होते की, कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान फलंदाजी केली जाते आणि म्हणूनच एकाच दिवसात मोठी धावसंख्या उभारली जाते. खरं तर बरेच संघ दोन दिवसात ५०० धावा करतात परंतु काही सामने असे झाले जेव्हा एकाच दिवसात ५०० पेक्षा जास्त धावा केल्या गेल्या.

या लेखात तुम्हाला त्या ४ सामन्याबद्दल सांगणार आहोत जेव्हा एका दिवसात कसोटी सामन्यात ५०० पेक्षा जास्त धावा केल्या. या मध्ये भारतीय संघ सर्वात वरच्या क्रमांकावर आहे.

४. इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका – ५०८ धावा
१७ ऑगस्ट १९३५ रोजी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ओव्हल येथे एक कसोटी सामना खेळला गेला. या सामन्याच्या तिसर्‍या दिवशी एकूण ५०८ धावा केल्या. त्यासाठी ८ विकेटही गेले. पहिल्या डावामध्ये दक्षिण आफ्रिकेने ४७६ धावा केल्या आणि दुसरा डाव ६ बळी गमावून २८७ धावांवर घोषित केला.
त्याचवेळी इंग्लंडने पहिल्या डावात ६ गडी गमावून ५३४ धावा केल्या आणि डाव घोषित केला. दुसर्‍या डावात इंग्लंडला फलंदाजीची संधी मिळाली नाही आणि त्यामुळे सामना अनिर्णित राहिला.

३. श्रीलंका विरुद्ध बांगलादेश – ५०९ धावा
२१ जुलै २००२ रोजी कोलंबो येथे श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात एक कसोटी सामना खेळला गेला. या सामन्याच्या दुसर्‍या दिवशी एकूण ५०९ धावा झाल्या. पहिल्या सामन्यात बांगलादेशचा संघ केवळ १६१ धावांवर बाद झाला.
प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेने ९ गडी गमावत ५४१ धावा करुन डाव घोषित केला. दुसर्‍या डावात बांगलादेशला केवळ १८४ धावा करता आल्या. बांगलादेश संघाला एक डाव आणि १९६ धावांनी पराभव पत्करावा लागला.

२. इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका – ५२२ धावा
२८ जानेवारी १९२४ रोजी दोन्ही संघांमध्ये कसोटी सामना खेळला गेला. लॉर्ड्स येथे खेळल्या गेलेल्या या सामन्याच्या दुसर्‍या दिवशी एकूण ५२२ धावा केल्या.
पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने २७३ धावा केल्या, त्या प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने २ गडी गमावून ५३१ धावा करुन डाव घोषित केला. ३ फलंदाजांनी शतके ठोकली. दुसर्‍या डावात दक्षिण आफ्रिका संघ केवळ २४० धावा करण्यात यशस्वी ठरला आणि त्यांना एका डावाने पराभव पत्करावा लागला.

१. इंग्लंड विरुद्ध भारत, ५८८ धावा
भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना २५ जुलै १९३६ रोजी मॅनचेस्टर येथे खेळला गेला. त्या सामन्याच्या दुसर्‍या दिवशी एकूण ५८८ धावा झाल्या. आजपर्यंत जागतिक क्रिकेटमधील कसोटी सामन्याच्या एकाच दिवसात इतक्या धावा झाल्या नाहीत.
भारताच्या संघाने पहिल्या डावात २०३ आणि दुसऱ्या डावात ५ गडी गमावून ३९० धावा केल्या. इंग्लंडने ८ गाड्यांच्या मोबदल्यात ५७१ धावा करुन आपला डाव घोषित केला होता. हा सामना अनिर्णित राहिला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---