क्रीडा जगतातील ४ प्रसंग ज्यामध्ये खेळाडूंनी केले चूकीचे दावे- 4 Times when a Player Made a Wrong Story
४. डेल स्टेन-
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू डेल स्टेनकडे (Dale Steyn) क्रिकेट जगतातील एक वेगवान गोलंदाज म्हणून पाहिले जाते. स्टेनने आपल्या घातक गोलंदाजीने मोठ-मोठ्या फलंदाजांना चिंतेत टाकले आहे. स्टेन एक महान गोलंदाज आहे यात काही शंका नाही. परंतु एकदा त्याने स्वत:च एक गोष्ट रचली होती. २०१०मध्ये ग्वालियर येथे भारताविरुद्धच्या वनडे सामन्यात सचिन तेंडुलकरने अविस्मरणीय नाबाद द्विशतकी खेळी केली होती.
त्या सामन्याबद्दल बोलताना स्टेनने सामन्यानंतर एक दावा केला होता की, सचिनला त्याने १९० धावांवर बाद केले होते. परंतु पंचाने त्याला नाबाद करार दिला. त्यानंतर स्टेनने केलेला हा दावा चूकीचा ठरला होता.
३. फारुख इंजिनियर-
भारतीय संघाचे माजी यष्टीरक्षक फलंदाज फारुख इंजिनियर (Farokh Engineer) भारताकडून काही वर्षेच खेळले आहेत. त्यांची एका गोष्टीसाठी नेहमीच आठवण काढली जात होती, ती म्हणजे चूकीची माहिती देण्यासाठी. त्यामुळे त्यांच्यावर चाहते अधिक विश्वास ठेवत नव्हते.
अशाच प्रकारे २०१८मध्ये भारतासाठी रिषभ पंतने कसोटी पदार्पण केले होते. त्यात त्याने कारकीर्दीची सुरुवात षटकाराने केली होती. त्यावर इंजिनियरने त्याची जरा जास्तच प्रशंसा केली होती. तसेच म्हटले होते की, त्यांनीही आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या ३ चेंडूवर ३ षटकार ठोकले होते. परंतु हे चूकीचे होते. इंजिनियर यांना आपल्या पहिल्या कसोटीतील पहिल्या ३ चेंडूत केवळ २ धावा केल्या होत्या.
२. मायकल क्लार्क-
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कला (Michael Clarke) ऑस्ट्रेलियाचा एक चांगला खेळाडू समजले जाते. क्लार्कने आपल्या कारकीर्दीत यशस्वी कामगिरी केली आहे. परंतु असे काही प्रसंग आले ज्यामध्ये क्लार्कने केलेले वक्तव्य चूकीचे ठरले होते.
काही महिन्यांपूर्वी क्लार्कने एक मोठा दावा केला होता, ज्यामध्ये २०१८-१९मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दल चर्चा केली होती. त्यात क्लार्कने म्हटले होते की, त्या दौऱ्यात टीम पेनच्या नेतृत्वातील खेळाडू भारताचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) स्लेज करत नव्हते. कारण त्यांना आयपीएलमधील आपला करार गमावण्याची भीती होती. परंतु हा दावा शेवटी चूकीचा ठरला होता.