आयपीएलच्या 13 व्या हंगामात चेन्नईने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केलेली नाही. या हंगामात खेळलेल्या 10 सामन्यांपैकी 7 सामन्यात त्यांचा पराभव झालेला आहे. संघाचे अनुभवी खेळाडू सपशेल अपयशी ठरले आहेत. पुढील सामन्यात युवा खेळाडूंना संधी देऊ असे कर्णधार धोनीने म्हटले होते. त्यामुळे मुंबई इंडियन्सविरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी ऋतुराज गायकवाड, जगदीशन, केएम आसिफ, साई किशोर या चार खेळाडूंची नावे चर्चेत आहे.
ऋतुराज गायकवाडला मिळू शकते संधी
युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड हा वरच्या फळीतील फलंदाज आहे. 30 टी20 सामन्यांपैकी 28 सामन्यात त्याने तिसर्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. आयपीएल 2020 मध्ये त्याला दोन सामन्यात मधल्या फळीत फलंदाजीसाठी संधी मिळाली होती. तथापि, त्यात त्याने चांगली कामगिरी केली नाही.
अनुभवी अष्टपलू ड्वेन ब्राव्हो तंदुरुस्त झाल्यावर गायकवाडला संघातून वगळण्यात आले होते. आता दोन भारतीय फलंदाज अंबाती रायुडू आणि केदार जाधव यांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केलेली नसल्याने ऋतुराजला संधी दिली जाऊ शकते. ऋतुराज या संधीची वाट पाहत आहे. अष्टपैलू सॅम करनला वरच्या वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी संधी देऊनही संघाला फार यश आले नाही, अशा परिस्थितीत ऋतुराजला संधी दिली जाऊ शकते.
जगदीशन उत्तम खेळी खेळल्यानंतरही संघातून झाला बाहेर
युवा फलंदाज नारायण जगदीशन हा यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्याला एका सामन्यात संधी मिळाली होती. त्या सामन्यात जगदीशनने 28 चेंडूत 33 धावा केल्या होत्या. यामुळे या तरुण खेळाडूला अधिक संधी मिळेल अशी आशा होती, पण तसे झाले नाही. एका सामन्यानंतर जगदीशनला संघातून वगळण्यात आले. चेन्नईने बेंगलोरविरुद्धचा हा सामना 37 धावांनी गमावला होता. पुढच्या सामन्यात कर्णधार धोनीने जगदीशनला संघातून काढून पीयूष चावलाला संधी दिली होती.
केएम आसिफलाही मिळाली नाही संधी
चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी न मिळालेल्या युवकांमध्ये 27 वर्षीय केएम आसिफचाही समावेश आहे. आसिफ ताशी 140 किमी वेगाने गोलंदाजी करू शकतो. चेन्नईची गोलंदाजीत मजबूत स्थितीत नाही. अशा परिस्थितीत आसिफ संघाला सामर्थ्य देऊ शकतो.वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर किंवा जोश हेजलवुडच्या जागी आसिफला संधी दिली जाऊ शकते. जर हेजलवुडच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेश होत असेल तर चेन्नई फिरकीपटू इम्रान ताहिरलाही मैदानात उतरवू शकेल.
फिरकीपटू सई किशोरचेही नाव चर्चेत
रवी श्रीनिवासन साई किशोर (आर. साई किशोर) डावखुरा फिरकीपटू आहे. तो असा फिरकीपटू आहे जो पॉवरप्लेमध्येही चांगली गोलंदाजी करू शकतो. त्याला आतापर्यंत एकही संधी मिळालेली नाही. धोनीच्या संघात अनेक गोलंदाज आहेत, परंतु त्यापैकी कोणालाही फलंदाजांवर दबाव आणण्यात यश आले नाही. अशा परिस्थितीत संघ साई किशोरला अनुभवी फिरकीपटू पियुष चावलाच्या जागी संधी दिली जाऊ शकते. मागील सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सई किशोरने सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
आज चेन्नई-मुंबई आमने-सामने; धोनीच्या चेन्नई संघासाठी ‘करा किंवा मरा’ची स्थिती
छा गये पांडेजी ! राजस्थानविरुद्धच्या दमदार खेळीनंतर ट्विटरवर मनीष पांडेच्याच नावाचा कल्ला
धोनी, युवराज, रैना बिग बॅश लीगमध्ये खेळणार?
ट्रेंडिंग लेख –
स्टेडियममध्ये प्रेक्षक नसतानाही सामना पाहाताना कोठून येतो त्यांचा आवाज? घ्या जाणून
नजर हटी, दुर्घटना घटी: दांडी उडवून गेलेल्या चेंडूला वाईड देणारे डॅरेल हार्पर
आयपीएल २०२०: पॉवरप्लेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज






