क्रिकेटविश्वातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा पुढील हंगाम एप्रिल महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, 23 डिसेंबर रोजी आयपीएल 2023 चा मिनी लिलाव पार पडेल. कोची येथे होणाऱ्या या लिलावासाठी आता खेळाडूंची अंतिम यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार एकूण 405 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे नाव या लिलावात घेतले जाईल. आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबतची घोषणा करण्यात आली.
🚨 NEWS 🚨: TATA IPL 2023 Player Auction list announced. #TATAIPLAuction
Find all the details 🔽https://t.co/fpLNc6XSMH
— IndianPremierLeague (@IPL) December 13, 2022
मंगळवारी (13 डिसेंबर) आयपीएल 2023 लिलावासाठी अंतिम झालेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली गेली. यामध्ये एकूण 405 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे यंदा 991 खेळाडूंनी लिलावासाठी नाव नोंदणी केलेली. मात्र, त्यानंतर आता ही 405 नावांची अंतिम यादी जाहीर केली गेली.
या यादीमध्ये भारताच्या सर्वाधिक 273 खेळाडूंचा समावेश असून, या लिलावात विदेशी खेळाडूंची संख्या 132 किती आहे. विदेशी खेळाडूंमध्ये सर्वाधिक संख्या इंग्लंडच्या खेळाडूंची असेल. त्यांचे 27 खेळाडू लिलावात दिसतील.
मागील वर्षीच खेळाडूंचा मेगा लिलाव झाला होता. त्यामुळे यंदा सर्व संघ आपल्या संघातील रिकाम्या जागा भरण्यावर भर देतील. इंग्लंडचे जो रूट, बेन स्टोक्स व सॅम करन हे खेळाडू लिलावात मोठी कमाई करण्याची शक्यता आहे. यंदा सनरायझर्स हैदराबाद लिलावात सर्वाधिक 42.25 कोटी इतकी रक्कम घेऊन सहभागी होतील. कोची येथे होणारा हा लिलाव दुपारी 2.30 वाजता सुरू होईल.
देशानिहाय नोंदणी झालेले खेळाडू-
भारत- 273, इंग्लंड- 27, दक्षिण आफ्रिका-22, ऑस्ट्रेलिया-21, वेस्ट इंडिज-20, न्यूझीलंड-10, श्रीलंका-10, अफगाणिस्तान-8, आयर्लंड-4, बांगलादेश-4, झिम्बाब्वे-2, नामिबिया-2, युएई-1, नेदरलँड्स-1
(405 Players Under The Hammer In IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पोराचा नाद पूर्ण करण्यासाठी अंबानी घेणार अब्जावधींचा फुटबॉल क्लब विकत? इंग्लंडमध्ये बसवणार बस्तान
बांगलादेशचा कर्णधारही पहिल्या कसोटीला मुकणार? सामन्याच्या 24 तास आधी हॉस्पिटलमध्ये दाखल