---Advertisement---

MPL 2025: 4एस पुणेरी बाप्पा संघाचे MPLचे संपुर्ण वेळापत्रक..!

On: मंगळवार, मे 20, 2025 12:14 PM
---Advertisement---

देशातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीगपैकी एक असलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग अर्थात MPLला 4 जूनपासून सुरुवात होत आहे. या लीगचे हे तिसरे वर्ष आहे. या स्पर्धेतील शुभांरभ सामन्यातच गतविजेता संघ रत्नागिरी जेट्स आणि ईगल नाशिक टायटन्स (4 जून) रोजी आमने-सामने असतील. असे असले तरी पुणेरी बाप्पा या संघावर सर्वांचेच विशेष लक्ष असते. यावेळी सर्वच संघ साखळी फेरीत 10 सामने खेळणार आहे. (Puneri Bappa MPL 2025 Schedule – Full Match Fixtures, Dates & Timings)

तत्पूर्वी 4एस पुणेरी बाप्पा संघाचे महाराष्ट्र प्रीमियर लीगचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेऊयात.

पुणेरी बाप्पा संघ या स्पर्धेत एकूण 10 सामने खेळणार आहे. यादरम्यान साखळी फेरीत त्यांचा पहिला सामना (6 जून) आणि शेवटचा सामना (19 जून) रोजी होणार आहे. या लीगच्या सलग तिसऱ्या हंगामात देखील संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) कडे असणार आहे.

या स्पर्धेत (20 जून) रोजी क्वॉलीफायर 1 व एलिमीनेटरचे सामने होतील. तर (21 जून) रोजी क्वॉलीफायर 2चा सामना होईल. (22 जून) रोजी फायनलचा सामना खेळला जाईल.

4एस पुणेरी बाप्पाचे MPL 2025चे संपूर्ण वेळापत्रक
6 जून, विरुद्ध रत्नागिरी जेट्स, दुपारी 2:00 वाजता
7 जून, विरुद्ध रायगड रॉयल्स, सायंकाळी 7:00 वाजता
10 जून, विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स, सायंकाळी 7:00 वाजता
11 जून, विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, सायंकाळी 7:00 वाजता
13 जून, विरुद्ध रायगड रॉयल्स, सकाळी 9:30 वाजता
14 जून, विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, दुपारी 2:00 वाजता
15 जून, विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स, सकाळी 9:30 वाजता
16 जून, विरुद्ध सातारा वॉरियर्स, सायंकाळी 7:00 वाजता
17 जून, विरुद्ध रत्नागिरी जेट्स, दुपारी 2:00 वाजता
19 जून, विरुद्ध सातारा वॉरियर्स, दुपारी 2:00 वाजता

प्रेक्षकांना मोफत प्रवेश
MPLमध्ये 6 संघ सहभागी होत असून प्रत्येक संघ साखळी फेरीत 10 सामने खेळेल. या स्पर्धेत एकूण 34 सामने होणार असून फायनल सामना (22 जून) रोजी होणार आहे. या स्पर्धेचे सर्व सामने प्रेक्षकांना स्टेडियमवर मोफत पहायला मिळणार आहे. WMPL देखील याच काळात होत असल्याकारणाने ते सामने देखील प्रेक्षकांना इथे पहाता येतील. तसेच आपल्या आवडत्या संघाला पाठिंबा देता येणार आहे. लीगचे हे तिसरे वर्ष असून एमसीएचे अध्यक्ष आ. रोहित पवार यांनी प्रेक्षकांना मोफत एंट्रीची घोषणा यापुर्वीच केली आहे, तसेच फॅन्सने मोठ्या संख्येने स्टेडियमवर येऊन आपली टीम तसेच आवडत्या खेळाडूला पाठिंबा देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

ऑनलाईन व टीव्हीवरही सामने
ओटीटी प्लॅटफॉर्म जीओ हॉटस्टारवर प्रेक्षकांना MPL व WMPLचे सामने घरबसल्या पहायला मिळणार आहेत. तसेच स्टारस्पोर्ट्स चॅनेलवर टीव्हीच्या माध्यमातूनही सामने पहायला मिळणार आहेत. आपल्या गावातील, शहरातील क्रिकेटपटूला थेट टीव्हीवर पहाण्याचा आनंद प्रेक्षकांना या माध्यमातून घेता येईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---