fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

वनडेत मॅचच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारे ५ खेळाडू

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक फलंदाज आक्रमक खेळण्यासाठी ओळखले जातात. पण तरीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणत्याही सामन्याच्या पहिल्या चेंडूवरच षटकार मारने सोपी गोष्ट नाही. मात्र असे ५ खेळाडू आहेत ज्यांनी वनडे सामन्यात धावांचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याचा कारनामा केला आहे.

या ५ फलंदाजांनी मारले आहेत वनडे सामन्यांत धावांचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर षटकार 

१. विरेंद्र सेहवाग – भारताचा धडाकेबाद सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवान नेहमीच त्याच्या तुफानी फलंदाजीसाठी ओळखला गेला. त्याने २००४ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध व्हीबी सिरिजमध्ये खेळताना जेसन गिलेस्पीने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. त्यावेळी भारतासमोर ३५९ धावांचे आव्हान होते.

२. मार्टिन गप्टिल – न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिलने २०१९ च्या सुरुवातीला भारताविरुद्ध हेमिल्टन येथे झालेल्या वनडे सामन्यात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. त्यावेळी न्यूझीलंडचा संघ ९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत होता.

३. मार्क ग्रेटबॅच – वनडेमध्ये सर्वात पहिल्यांदा धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर षटकार मारण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या मार्क ग्रेटबॅच यांच्या नावावर आहे. त्यांनी १९९२ ला पाकिस्तान विरुद्ध खेळताना वासिम आक्रमने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. त्यावेळी न्यूझीलंड संघ १४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत होता.

४. फिल वॉलेस – वेस्ट इंडिजने फलंदाज फिल वॉलेस यांनी भारताविरुद्ध १९९८ ला असा कारनामा केला होता. त्यांनी ढाका येथे झालेल्या वनडे सामन्यात जवागल श्रीनाथने टाकलेल्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला होता. तेव्हा भारताने वेस्ट इंडिजला २४३ धावांचे आव्हान दिले होते.

५.तमिम इक्बाल – बांगलादेशचा फलंदाज तमिम इक्बालने २०१७ मध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळताना असा कारनामा केला होता. त्यावेळी बांगलादेशचा संघ २७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना  इक्बालने जीतन पटेलने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता.

ट्रेंडिंग घडामोडी – 

पाकिस्तानच्या क्रिकेटपटूची युवी-भज्जीकडे मदतीची याचना

तो म्हणतो, मोठे खेळाडू आमच्याकडे दुर्लक्ष करतात

या कारणामुळे आरसीबी जिंकत नाही आयपीएल ट्राॅफी

You might also like