fbpx
Thursday, January 28, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएलमधील ५ स्टार फलंदाज, जे सर्वाधिक वेळा झालेत शुन्यावर बाद

5 batsman with most ducks in ipl

September 23, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0
Photo Courtesy: Twitter/rajasthanroyals

Photo Courtesy: Twitter/rajasthanroyals


दरवर्षी आयपीएलमध्ये आपल्याला अनेक रोमांचक सामने पाहायला मिळतात. याशिवाय आयपीएलमध्ये चौकार-षटकार आणि अनेक मोठे विक्रम आहेत. काही फलंदाज प्रत्येक हंगामात शतक ठोकण्याच्या प्रयत्नात असतात. आयपीएलच्या प्रत्येक हंगामात वेगवेगळे छोटे-मोठे विक्रम केले जातात आणि तोडलीही जातात. यात काहीवेळेस नकोसे विक्रमही झालेले पहायला मिळतात. यातील एक विक्रम म्हणजे शुन्यावर बाद होण्याचा. टी २० क्रिकेटचे स्वरुप असे आहे की मैदनावर फलंदाज येताच त्याला मोठे शॉट्स खेळावे लागतात, त्यामुळे लवकर बाद होण्याचा धोका खूप जास्त असतो. त्याचमुळे बऱ्याचदा खेळाडू शुन्यावर बाद होतात.

या लेखात आम्ही तुम्हाला त्या ५ फलंदाजांविषयी सांगू जे आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्य धावांवर बाद झाले आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झाले हे ५ फलंदाज

५. अजिंक्य रहाणे

दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज अजिंक्य रहाणेचे या यादीत पाचवे स्थान आहे. रहाणे आयपीएलमध्ये अनेक संघांकडून खेळला आहे. त्याने आतापर्यंत मुंबई इंडियन्स, राइजिंग पुणे सुपरगिजंट्स आणि राजस्थान रॉयल्स अशा संघातून आयपीएल खेळले आहे. तसेच या हंगामात तो दिल्ली कॅपिटल्स संघात आहे.

आयपीएलमध्ये अजिंक्य रहाणे ११ वेळा शुन्यावर बाद झाला आहे. परंतु तो आयपीएलमधील यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधारही होता.

४. रोहित शर्मा

या यादीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचे नावदेखील आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये जवळपास ४ हजार ८०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. याशिवाय त्याने आपल्या नेतृत्वात ४ वेळा मुंबई इंडियन्स संघाला चॅम्पियन बनवले आहे. मात्र रोहित शर्मा आयपीएलमध्ये १२ वेळा आपले धावांचे खाते उघडू शकला नाही.

३. मनीष पांडे

मनीष पांडे हे २००८ पासून म्हणजे आयपीएलच्या पहिल्या हंगामापासूनच आयपीएलमध्ये सहभागी आहे. त्याने अनेक संघांच्या वतीने आयपीएलमध्ये भाग घेतला आणि जवळजवळ सर्व संघाकडून चांगला खेळ केला. मनीष पांडे आयपीएलमध्ये आतापर्यंत कोलकाता नाइट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, मुंबई इंडियन्स, पुणे वॉरियर्स इंडिया आणि सनरायझर्स हैदराबाद या संघातून खेळताना दिसला.
आतापर्यंत मनीष पांडेने आयपीएलमध्ये एकूण २८४३ धावा केल्या असून तो १२ वेळा शून्यावर बाद झाला आहे.

२. अंबती रायुडू

अंबाती रायुडू चेन्नई सुपर किंग्जचा एक चांगला फलंदाज असल्याचे सिद्ध होत आहे. २०१८ मध्ये तो चेन्नई सुपर किंग्ज संघात सामील झाला आणि त्या मोसमातील त्याची कामगिरी जबरदस्त होती. २०१८ मध्ये सीएसकेने ही स्पर्धा देखील जिंकली. त्यात रायडूचा मोठा वाटा होता. आयपीएलमध्ये रायुडूने आतापर्यंत ३ हजाराहून अधिक धावा केल्या आहेत पण तो १२ वेळा शुन्यावर बाद  देखील झाला आहे.

१. पार्थिव पटेल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेल या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक १३ वेळा एकही धाव न करता माघारी परतला आहे. पार्थिव पटेलही बर्‍याच संघांसाठी आयपीएल खेळला आहे. या हंगामात तो आरसीबीच्या संघाचा एक भाग आहे.


Previous Post

दुर्दैव! फाफ डु प्लेसिस सारखी वेळ कोणावरही येऊ नये

Next Post

झिम्बाब्वेला क्रिकेटमध्ये मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या ऍलिस्टर कॅम्पबेलची कारकिर्द एक अध्याय ठरली

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@KKRiders
टॉप बातम्या

मुंबई टू टीम इंडिया व्हाया केरळ! भारतीय संघात नेट बॉलर म्हणून निवड झालेल्या संदीप वॉरियरचा संघर्षमय प्रवास

January 27, 2021
Screengrab: Instagram/@radhika_dhopavakar
टॉप बातम्या

क्वारंटाईनमध्ये रहाणे घालवतोय मुलीसोबत वेळ, पत्नीने शेअर केला गोड व्हिडिओ

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@JamshedpurFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : ब्लास्टर्सची जमशेदपूरची गोलशून्य बरोबरी

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@englandcricket
टॉप बातम्या

वनक्कम टीम इंग्लंड! जो रूटचा संघ पोहोचला चेन्नईत

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/@TheRealPCB
टॉप बातम्या

कराची कसोटीत पाकिस्तानला आघाडी, फवाद आलमचे संघर्षपूर्ण शतक

January 27, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
टॉप बातम्या

आयसीसी वनडे क्रमवारी : विराट-रोहितचे वर्चस्व अबाधित, बुमराह देखील ‘या’ स्थानी कायम

January 27, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ ICC

झिम्बाब्वेला क्रिकेटमध्ये मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या ऍलिस्टर कॅम्पबेलची कारकिर्द एक अध्याय ठरली

Photo Courtesy: Twitter/ IPL

'या' ३ फलंदाजांचे ट्वेंटी२०मध्ये आहे मोठे नाव, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर करता आले नाही एकही अर्धशतक

Photo Courtesy: Twitter/ ICC

वाढदिवस विशेष- माहित नसलेला अंबाती रायडू

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.