पॅट कमिन्सच्या सनरायझर्स हैदराबादला धूळ चारत कोलकाता नाईट रायडर्सनं आयपीएल इतिहासातील तिसरा खिताब जिंकला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सनं उत्कृष्ट गोलंदाजी करत आधी हैदराबादला अवघ्या 113 धावांवर रोखलं त्यानंतर आक्रमक फलंदाजीच्या जोरावर 8 गडी राखून विजय मिळवला.
या पाच कारणांमुळे सनरायझर्स हैदराबादनं गमावला सामना
टाॅस जिंकून चूकीचा निर्णय – चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी पूर्णपणे चुकीचा ठरला.
मिचेल स्टार्कची गोलंदाजी – कोलकाताचा वेगवान मिचेल स्टार्कची गोलंदाजी हैदराबादसाठी मोठी डोकोदुखी ठरली. स्टार्कने अभिषेक शर्माला स्वस्तात बाद करुन हैदराबादला पहिला धक्का दिला. मिचेल स्टार्कच्या समोर कोणत्याही फलंदाजाकडे गेम प्लॅन नव्हता.
हैदराबादकडे कोणताही प्लॅन ‘बी’ नव्हता – हैदराबादनं संपूर्ण स्पर्धेत आक्रमक फलंदाजी केली, जी त्यांना अंतिम फेरीत महागात पडली. आक्रमक फलंदाजीशिवाय संघाकडे दुसरा कोणताही प्लॅन ‘बी’ नव्हता. खरे तर, लवकर विकेट पडल्यानंतर, संघाचा एकही फलंदाज संभाळून फलंदाजी करू शकला नाही आणि डाव पुढे नेऊ शकला नाही
सलामीवीर अपयशी – आयपीएल 2024 मध्ये हैदराबादच्या सलामीवीरांनी चमकदार कामगिरी केली. मात्र सलामीवीर अपयशी ठरताच संघाची फरफट झाली आणि फायनल मध्येही तेच झाले. मिचेल स्टार्कनं अभिषेक शर्माला त्रिफळचित केलं तर वैभव अरोरानं ट्रॅव्हिस हेड दुसऱ्याच षटकात गोल्डन डकवर बाद केलं. त्यामुळं संघ 113 धावांवर ढेपाळला.
उत्कृष्ट फिरकीपटूची नव्हते – हैदराबादकडे फारसे चांगले फिरकीपटू नव्हते, त्यामुळे ते धावांचा बचाव करताना सामना लढवू शकले नाहीत. चेन्नईच्या मैदानावर, विशेषत: लाल मातीच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांसोबतच फिरकीपटूही महत्त्वाची भूमिका बजावतात.
महत्त्वाच्या बातम्या –
संघाचा लाजिरवाणा पराभव सहन झाला नाही, काव्या मारन चालू मॅच मध्येच स्टेडियममधून निघून गेली
केकेआरनं तिसऱ्यांदा कोरलं ट्रॉफीवर नाव! सनरायझर्स हैदराबादवर मिळवला ऐतिहासिक विजय
संपूर्ण आयपीएल हंगाम गाजवणाऱ्या ट्रॅव्हिस हेडच्या नावावर जाता जाता लाजीरवाणा विक्रम!