कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुरक्षितता म्हणून बीसीसीआयने आयपीएल स्थगित केली. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील वनडे मालिकाही बीसीसीआयने रद्द केली आहे. परंतु या दरम्यान बीसीसीआयने आणखी एक मोठा धक्कादायक निर्णय घेतला.
तो असा की, भारताचा माजी कसोटी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकरांना (Sanjay Manjrekar) समालोचकांच्या पॅनेलमधून काढून टाकण्यात आले आहे.
यापुर्वीही अनेक समालोचकांची एकतर हाकालपट्टी करण्यात आली आहे किंवा त्यांना समालोचकांच्या पॅनेलमधून वगळण्यात आले आहे. यापुर्वी मार्क निकोलस, डीन जोन्स, हर्षा भोगले व नवज्योत सिंग सिद्धू यांचा समावेश आहे.
डीन जोन्स यांनी श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका 2006 मालिकेदरम्यान हशिम अमलाला दहशतवादी म्हटले होते. नंतर त्यांनी याबद्दल माफीही मागितली होती. “दहशतवाद्याला आणखी एक विकेट मिळाली. “, असे ते समालोचन करताना म्हणाले होते. टेन स्पोर्ट्सने त्यांची तात्काळ हाकालपट्टी केली होती.
2016 आयपीएल दरम्यान हर्षा भोगले यांचा समालोचकांच्या पॅनेमध्ये समावेश करण्यात आला नव्हता. आयपीएलपुर्वी जालेल्या टी20 विश्वचषकादरम्यान महान अभिनेते अमिताभ बच्चन यांनी हर्षावर टीका केली होती. यात त्यांनी “समालोचकांनी आपले खेळाडू सोडून इतरांवर जास्त बोललंच पाहिजे का?” असे म्हटले होते. यावर धोनीने कोट करत ट्विट मध्ये म्हटले होते की नथिंग टू अॅड. अर्थातच धोनीने एकप्रकारे बच्चन यांना पाठींबाच दिला होता.
यानंतर भोगले यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत “”समालोचकांनी कुणाीचीही बाजू घेऊन बोललं नाही पाहिजे. तसेच निपक्षपाती असलं पाहिजे” असं म्हटलं होतं. त्यावेळी भोगले यांना पॅनेलमधून वगळताना कोणतेही कारण सांगण्यात आले नव्हते.
सिद्धू या आधी क्रिकेटर नंतर समालोचक व आता राजकारणी म्हणून ओळखला जातो. समालोचन करताना तो जोरदार शेरोशायरी करत असे. परंतु हीच शेरोशायरी करत असताना सिद्धू बऱ्याच वेळा खेळापेक्षा अन्य गोष्टींवरच जास्त बोलतं असे. त्यातही अनेक गोष्टी विवादास्पद असे.
सिद्धूने समालोचक असताना बांगलादेश संघावर अतिशय विवादास्पद टिपण्णी केली होती. तर 2003 विश्वचषक पराभवानंतर सिद्धूने भारतीय संघावरच ताशेरे ओढले होते. समालोचन सुटल्यावर सिद्धूने टेलीव्हिजनवरील द कपिल शर्मा शो’मध्ये भाग घेतला होता.
ट्रेडिंग बातम्या-
– रणजी ट्राॅफीमधील शानदार कामगिरीचं उनाडकटला मिळणार तेवढंच…
– कारणंही तशीच होती; इतिहासात भारतातील केवळ ३ वनडे मालिका झाल्या आहेत रद्द
– टीम इंडियाचा हा शिलेदार करणार टी20मध्ये दणदणीत द्विशतक
– संजय मांजरेकरांच्या हाकलपट्टीचं खरं कारण आलं समोर