भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक सौरव गांगुलीच्या शानदार फलंदाजीबद्दल काय बोलावे. “दादा” म्हणून ओळखल्या जाणार्या गांगुलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने बरेच विजय मिळवले. ‘प्रिन्स ऑफ कोलकाताने’ भारताला नुसतं उंचावर नेले नाही, तर तरुण क्रिकेटपटूंना आपल्या खेळाने खूप प्रेरितही केले.
जेव्हापासून गांगुली मैदानावर खेळत होता, तेव्हापासून तो तरुण खेळाडूंना पुढे आणण्याचा प्रयत्न करत होता. ज्यावेळी भारताची कमान त्याच्या हातात होती, तेव्हा त्याने संघाला बरेच तरूण खेळाडू मिळवून दिले, ज्यांनी पुढे जाऊन स्वतःचे नाव तर केलेच, त्याचबरोबर देशाचेही नाव उज्वल केले. आज आपण अशा “5” खेळाडूंबद्दल बोलणार आहोत. ज्यांनी सौरव गांगुलीच्या नेतृत्वात आपली कारकीर्द सुरू केली, आणि भविष्यात बरीच प्रसिद्धी मिळविली.
विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)
विरेंद्र सेहवाग हा दादानेच शोधलेला हिरा मानला जातो. वीरू कधी 5 किंवा 6 व्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. परंतु त्यानंतर गांगुलीने विरूला सलामीची संधी दिली, त्यानंतर त्याने अशी काही खेळी केली की त्यामुळे विरु जगातील सर्वोत्तम सलामीवीर फलंदाज म्हणून ओळखला जाऊ लागला. कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात गांगुलीने विरुला खूप साथ दिली, त्यानंतर विरुने संघासाठी किती जबरदस्त कामगिरी केली, हे तर सर्वांनाच ठाऊक आहे.
झहीर खान (Zaheer Khan)
भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानकडे अशी सर्व कौशल्ये होती, जी त्याला क्रिकेट विश्वात महान उंचीवर नेऊ शकली. परंतु प्रत्येक हिऱ्याला एका जवाहिऱ्याची गरज असते. आणि झहीरला तो जवाहिरा गांगुलीच्या रुपात मिळाला. गांगुलीने झहीरवर केवळ विश्वास दाखवला नाही तर प्रत्येक पावलागणी त्याची साथ दिली. याचा परिणाम असा झाला, की पुढे जाऊन झहिर भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणारा दुसरा सर्वात यशस्वी भारतीय वेगवान गोलंदाज ठरला.
युवराज सिंग (Yuvraj Singh)
या यादीत अजून एका महान फलंदाजाचा समावेश आहे. आणि तो महान फलंदाज म्हणजे युवराज सिंग. 2000 मध्ये त्यानीही सौरव गांगुलीच्या नेतृत्वात आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. युवराजने 19 वर्षांखालील क्रिकेटमध्ये मोठं नाव कमावलं होत. त्यानंतर “आयसीसी नॉकआउट ट्रॉफीमध्ये” ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 84 धावांची शानदार खेळी साकारली, आणि त्यामुळे भारत अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी झाला होता.
गांगुलीने युवराजवर खूप विश्वास ठेवला. ज्यामुळे युवराज आपली कामगिरी सुधारत गेला. या बाबतीत स्वत: युवराजने आपल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, आतापर्यंत जेवढ्या कर्णधाराबरोबर खेळलो, त्या सर्व कर्णधारांपैकी गांगुली सर्वोत्कृष्ट कर्णधार आहे.
एमएस धोनी (MS Dhoni)
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आज जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणला जातो, परंतु गांगुलीशिवाय हे सर्व शक्य नव्हते. माहीला दादाच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघात प्रथमच खेळण्याची संधी मिळाली होती. परंतू त्यावेळी, धोनी मैदानावर चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत होता, तेव्हा गांगुलीने त्याला पाकिस्तानविरुद्ध तिसर्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली.
पाकिस्तानविरुद्धच्या संघात धोनीची निवड करण्यासाठी गांगुलीला निवड समितीबरोबर संघर्ष करावा लागला होता. आपल्याला सांगतो की त्यावेळी धोनीने पाकिस्तानविरुद्ध 148 धावांची शानदार खेळी केली होती.
हरभजन सिंग (Harbhajan Singh )
जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक हरभजन सिंग यानी क्रिकेट जगतात अनेक पराक्रम केले आहेत, परंतु भज्जीला या उंचीवर पोहचण्यासाठी त्याने केलेल्या कष्टाचे श्रेय जेवढे त्याला जाते. तेवढेच श्रेय गांगुलीलाही जाते. संपूर्ण जगात “टर्बनेटर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरभजनने त्याकाळात बरेच यश मिळवले.
त्याने 2001 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत 32 विकेट्स घेतल्या होत्या. या मालिकेपूर्वी भज्जीला संघात घेण्यासाठी गांगुलीने निवडकर्त्यांकडे आग्रह धरला होता. असे हरभजनने स्वत: एका मुलाखतीत सांगितले होते. जर ‘दादाची’ साथ त्याला मिळाली नसती, तर त्याला हे यशस्वी शिखर गाठता आले नसते.
महत्त्वाच्या बातम्या-
गोष्ट एका क्रिकेटरची भाग ५: मोठ्या भावाच्या जागी स्थान मिळालेला तो पुढे सर्वांचा दादा झाला
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ४: …अगदी ठरवुन ‘त्यांनी’ गांगुलीला रडवले