सेलिब्रिटी असल्या कारणानं क्रिकेटपटूंचे नावही वाद-विवादाशी जोडले जाते. तरीही असे खूप कमी वेळा झालेले पहायला मिळते. कारण ते असे विवाद लपविण्यात यशस्वी होतात. परंतु जरी सत्य त्या वेळी बाहेर येत नसले तरी ते काही काळानंतर सर्वांसमोर नक्कीच येत असते.
मैदानाबाहेर काहीवेळा क्रिकेटपटूंकडून लाजिरवाण्या घटना होऊन जातात. जे काही काळानंतर विवादांचे रुप घेतात. हे टाळणे आता खूप कठीण असल्याचे दिसते आहे. या घटनांमुळे काही क्रिकेटपटूही चाहत्यांच्या निशाण्यावर आले आहेत, ज्यांच्याबद्दल असा विचारदेखील केला जाऊ नाही शकत. किंवा काही घटना अशाही आहेत, ज्या खेळाडूंकडे तशा घडल्या नाहीत, परंतु चाहत्यांनी त्याला तसे पाहिले आहे.
या लेखात आपण त्या ५ अशा घटनांचा आढावा घेणार आहोत, ज्या मैदानाच्या बाहेर घडल्या होत्या. परंतु त्यात भारताबरोबरच इतर देशांच्या क्रिकेटपटूंंचाही समावेश आहे. या घटना चाहत्यांना आश्चर्यचकीत करणाऱ्या आहेत. यामध्ये भारताच्या कर्णधाराच्याही नावाचा समावेश होतो.
क्रिकेटपटूंकडून घडलेल्या ५ लज्जास्पद घटना- 5 Embarrassing off field Moment
१. विराट कोहलीने पाहिले होते अर्चना विजयच्या नोट्स-
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) खूप कमीवेळा विवादांमध्ये सापडताना दिसतो. परंतु त्याच्या क्रिकेट कारकीर्दीत काही विवाद नक्कीच झालेले समोर आले आहेत. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागला होता. असाच एक विवाद आयपीएल २०१७ दरम्यान झाला होता.
त्यावेळी टी.व्ही. प्रेझेंटर अर्चना विजय (Archana Vijay) विराटची मुलाखत घेण्याची तयारी करत होती. त्यावेळी विराटला विचारण्यात येणारे प्रश्न नोट्सवर लिहिले होते, ते विराटने अगोदरच वाचून घेतले होते. परंतु हे अर्चनाला समजले नव्हते. त्यानंतर या मुलाखतीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
त्यामुळे विराटला सोशल मीडियावर चीटर म्हणत त्याच्यावर टीका करण्यात आली होती. तरीही त्यानंतर विराटला स्वत:ला खूप वाईट वाटले होते. परंतु त्या घटनेचा उल्लेख त्याने खूप कमी वेळा केला होता. हा विवाद खूप वाढला होता.
https://twitter.com/SunikarReddy/status/864808407538073600
२. ख्रिस गेलने म्हटले ‘बेबी ब्लश मत करो’-
वेस्ट इंडीजचा दिग्गज फलंदाज असलेल्या ख्रिस गेलची (Chris Gayle) कारकीर्द अनेक विवादाने भरलेली आहे. तो नेहमी कोणत्या ना कोणत्या वादात अडकताना दिसतो. त्यामुळे त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. असाच एक विवाद बीबीएल म्हणजेच बीग बॅश लीगमध्ये २०१५-१६ दरम्यान झाला होता.
गेलने ऑस्ट्रेलियाची टीव्ही प्रेझेंटर मेल मॅकलॉफ्लिनला (Mel McLaughlin) म्हटले होते की, “मला तुमच्यासोबत मुलाखत घ्यायची होती. त्यामुळे मी इथे आहे. मला पहिल्यांदा तुझे डोळे पहायला मिळाले, हे खूप चांगले आहे. आशा आहे की, विजयानंतर आपण ड्रिंकवर जाऊ शकतो. बेबी लाजू नकोस (बेबी ब्लश मत करो).”
गेलच्या या वक्तव्यानंतर मॅकलॉफ्लिन नाराज झाली होती. तिने पोलिसात तक्रारदेखील केली होती. परंतु त्यानंतर न्यायालयाने हा खटला सोडवला. त्यानंतर गेलला त्या लीगसाठी निलंबित केले होते. त्याचबरोबर गेलला १० हजार डॉलर्सचा दंडदेखील ठोठावला होता. ते त्याने नंंतर भरले होते.
https://twitter.com/fudgie8/status/683992694327099392
३. रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा सोफिया हयातबरोबर फोटो-
सध्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हे दोन्ही खेळाडू आपले विवाहित आयुष्यात रमले आहेत. रोहित आता वडील झाला आहे. परंतु एक काळ असा होता, जेव्हा दोघांचेही लग्न झाले नव्हते. परंतु ते भारतीय संघाकडून खेळत होते.
मॉडेल आणि बिग बॉस शोमध्ये जाऊन आलेली सोफिया हयातने (Sofia Hayat) रोहितसोबतच्या तिच्या नात्याबद्दल बोलली होती. त्याचवेळी तिचे आणि रोहितचे सोबतचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. इतकेच नव्हे तर त्यावेळी विराटबरोबरचेही तिचे अनेक फोटो व्हायरल झाले होते.
https://twitter.com/VOICE_2U/status/1142390949693329408
तरीही त्यानंतर रोहित आणि विराट दोघांनीही याबद्दल नकार दिला होता. हयातने सांगितले होते की, ती रोहितबरोबर लंडनच्या एका पार्टीदरम्यान भेटली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या जवळ आले होते. परंतु त्यानंतर ते दोघेही वेगळे झाले.
४. हार्दिक पंड्याचे ‘कॉफी विथ करन’मध्ये विधान-
भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल (KL Rahul) हे दोघेही ‘कॉफी विथ करन’ (Koffee with Karan) या शोमध्ये गेले होते. तेथे पंड्याच्या वक्तव्याने अनेक विवादांचा जन्म झाला होते. त्यामुळे आजही पंड्याला त्याचा त्रास सोसावा लागत आहे. त्यावेळी तो खूप अडचणीत सापडला होता.
Rajasthan: Case registered against Hardik Pandya, KL Rahul & Karan Johar in Jodhpur for comments made during Johar's talk show in December last year. pic.twitter.com/eC19D3jxoP
— ANI (@ANI) February 6, 2019
पंड्याला विवादामध्ये अडकताना पाहून बीसीसीआयवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे पंड्यावर बंदी घालण्यात आली होती. २०१९ हे वर्ष पंंड्यासाठी खूप चांगले नव्हते. परंतु त्याने आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती.
५. एका मुलीच्या फोटोवर युजवेंद्र चहलची कमेंट-
भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) खूप कमी वेळा विवादात अडकलेले पहायला मिळते. परंतु त्याच्या कारकीर्दीत काही विवाद नक्कीच समोर आले आहेत. त्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियावर टीकादेखील करण्यात आली होती. असाच एक विवाद विश्वचषक २०१९ दरम्यान समोर आला होता.
चहलने २० वर्षीय मुलगी निलुनीच्या एका फोटोवर कमेंट केली होती. त्याची ज्या फोटोवर कमेंट होती त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. स्वत: त्या मुलीने पोस्ट करून म्हटले होते की, “एक मिलियन (दहा लाख) चाहते असूनही एका खेळाडूने माझ्या फोटोवर कमेंट केली आहे.”
"That was not me it was my nephew" v2.0 🤪🤪🤪
Yuzi Chahal doing harakiri LMAO 😂😂😂 pic.twitter.com/XSLxdZ4DRR
— انس (@AnasMagnificent) November 6, 2018
त्यावेळी चहलवर सोशल मीडियामार्फत चाहत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर त्या मुलीची स्वत: चहलने माफी मागितली होती. तसेच म्हटले होते की, ती कमेंट त्याने केली नसून त्याच्या एका मित्राने केली होती. त्यानंतर चाहत्यांनी त्याला ट्रोल करणे बंद केले होते.