भारतीय संघाचा माझी खेळाडू गौतम गंभीर क्रिकेटपेक्षा पण वादांसाठी जास्त ओळखला जातो. तसेच गौतम गंभीरने आज अचानक राजकारणाच्या पीचवरुन निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या या निर्णयाच अनेकांना आश्चर्य देखील वाटलं आहे. कारण राजकारणात येऊन गौतम गंभीरला अजून पाच वर्षही झालेली नाहीत. तर गौतम गंभीरने अचानक राजकीय सन्यास का घेतला? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. क्रिकेटच मैदान गाजवल्यानंतर गंभीरने राजकारणाच्या पीचवर दमदार एन्ट्री केली होती.
याबरोबरच, गौतम गंभीरने 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघासाठी शानदार खेळी खेळली होती. अशाच गौतम गंभीरशी संबंधित काही गोष्टी ज्या तुम्हाला माहित नाहीत. त्याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. भारतीय खेळाडू गौतम गंभीरचा जन्म 10 ऑक्टोबर 1981 रोजी झाला होता. तर गौतम गंभीरला त्याच्या जन्मानंतर त्याच्या आजोबांनी दत्तक घेतले होते. त्यानंतर आजोबा आणि गंभीर सोबत राहत आहे. पण 2019 मध्ये गौतम गंभीरच्या आजीचे वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले होते.
त्यानंतर गौतम गंभीर संपूर्ण क्रिकेट हा भारतीय संघासाठी खेळत राहिला आहे. त्यामुळे त्याचे कुटुंबाप्रती असलेले प्रेम यामधुन दिसून येत होते. तसेच 2011 मध्ये गौतमने नताशा जैनसोबत लग्न केले. त्यानंतर गौतम गंभीरला अजिन आणि अनैजा अशा दोन मुली आहेत. याबरोबरच क्रिकेटच्या मैदानावर गौतम गंभीरने मोठमोठ्या गोलंदाजांचे षटकार ठोकले होते, त्याच्या या शानदार कामगिरीमुळे गौतम गंभीरचे कौतुकही झाले होते. गंभीरला क्रिकेटशिवाय प्लेस्टेशन गेम खेळण्याची देखील खूप आवड आहे.
I have requested Hon’ble Party President @JPNadda ji to relieve me of my political duties so that I can focus on my upcoming cricket commitments. I sincerely thank Hon’ble PM @narendramodi ji and Hon’ble HM @AmitShah ji for giving me the opportunity to serve the people. Jai Hind!
— Gautam Gambhir (Modi Ka Parivar) (@GautamGambhir) March 2, 2024
दरम्यान, गौतम गंभीरने कसोटी कारकीर्दत चमकदार कामगिरी केली असून त्याच्या नावावर एक विक्रम देखील आहे. जो आजपर्यंत कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूच्या नावावर नाही. गौतम गंभीर हा एकमेव भारतीय खेळाडू आहे ज्याने सलग 4 कसोटी मालिकेत 300 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तसेच सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे गौतम गंभीरचे स्वप्न होते. मात्र, गंभीर त्याचे स्वप्न पूर्ण करू शकला नाही. म्हणून याची खंत गौतम आजपर्यंत व्यक्त करत असतो.
महत्वाच्या बातम्या –
- इशान किशनला बीसीसीआयच्या वार्षिक करारातून वगळल्यानंतर मिळाला ‘या’ प्रशिक्षकाचा पाठिंबा; म्हणाला….
- वयाच्या 48 व्या वर्षी शोएब अख्तर तिसऱ्यांदा झाला बाप, मुलगी की मुलगा? वाचा सविस्तर