जगातील कोणत्याही क्रिकेटपटूचे क्रिकेटमध्ये शतक करण्याची इच्छा असते. भारताकडून अनेक असे फलंदाज खेळले ज्यांनी चांगल्या शतकी खेळी केल्या. काही असेही फलंदाज आहेत जे अतिशय लोकप्रिय होते किंवा आहेत परंतु त्यांना वनडेत केवळ १ शतक करता आले आहे.
भारतात वनडेत शतकांमध्ये मोठी मजल मारलेले विराट किंवा सचिनसारखे मोठे खेळाडू आहे. परंतु असे अनेक क्रिकेटपटू आहे ज्यांना वनडेत एकच शतक करता आले आहे.
भारताकडून आजपर्यंत २३१ खेळाडू वनडे सामने खेळले. यातील ३९ खेळाडूंनी वनडेत एकतरी शतक केले आहे. परंतु भारताचे असे काही खेळाडू आहेत ज्यांनी केवळ १ शतक केले आहे. भारताकडून १३ खेळाडूंनी वनडेत १ शतकी खेळी वनडेत केली आहे.
भारताकडून वनडेत केवळ १ शतक करणारे लोकप्रिय क्रिकेटपटू-
१९९४ धावा- संजय मांजरेकर, सामने- ७४
२३३६ धावा- राॅबीन सिंग, सामने- १३६
३०९२ धावा- सुनिल गावसकर, सामने- १०८
३५०८ धावा- दिलीप वेंगसरकर, सामने- १२९
३७८३ धावा- कपिल देव, सामने- २२५
ट्रेंडिंग घडामोडी-
–जगातील ३ असे दिग्गज फलंदाज ज्यांना वनडेत करता आले नाही शतक
–शतक कायमचे रुसलेले पण वनडेत सर्वाधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १५: शंभर कसोटी सामन्यांच्या उंबरठ्यावर असणारा इशांत शर्मा
-शतक कायमचे रुसलेले पण वनडेत सर्वाधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज
-आणि वैतागलेल्या इरफान पठाणने शेअर केले थेट स्क्रीनशाॅट