fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

श्री साई स्पोर्ट्स क्लब नाशिककडून गरजूंना धान्य वाटप

कोरोना व्हायरसने जगात थैमान घातले आहे. त्यामुळे भारतातही २५ मार्च २०२० पासून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पण लॉकडाऊनमुळे गरीब जनतेला मोठा प्रश्न पडला आहे. रोज कमावून खाणाऱ्या या लोकांना कोणताही रोजगार नसल्याने जेवणही मिळत नाही. अशाच गरीब लोकांसाठी अनेक संस्था व मंडळ पुढाकार घेऊन त्यांना अन्नधान्य पुरवत आहे.

नाशिक येथील श्री साई स्पोर्ट्स क्लब नाशिक यांचेकडून कोरोनाच्या संकटात सापडलेल्या गरीब व गरजू लोकांसाठी छोटीशी मदत म्हणून धान्य देण्यात आला. गहू, तांदूळ याचे गरिबांना वाटप करण्यात आले. मुंजा भाऊ शेळके, किरण गुंजल, राम कुमात, चेतन चव्हाण, विशाल दातीर या कबड्डीपटू व प्रशिक्षकांकडून याचे वाटप करण्यात आले.

श्री साई स्पोर्ट्स क्लब नाशिक यांच्याकडे अनेक राष्ट्रीय कबड्डीपटू घडले आहेत. परंतु सध्या कोरोनामुळे सर्व सराव सत्रे व सामने या क्लबने काही काळासाठी रद्द केले आहेत.

ट्रेंडिंग घडामोडी-

-एका आयपीएल हंगामात तब्बल १००० मिनीटं फलंदाजी करणारा एकमेव फलंदाज

-या कारणामुळे विराट किंवा अन्य भारतीय खेळाडूंना कुणी नडत नाही

-क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक ठोकणारे ३ भारतीय

You might also like