गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना विषाणूमुळे जगभरात वाईट परिस्थितीत निर्माण झाली. या रोगाने गेले ४ महिन्यांपासून क्रिकेटचे मैदान बंद ठेवले, परंतु मागील महिन्यापासून पुन्हा एकदा क्रिकेट चालू झाले. गेल्या महिन्यात वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका खेळली गेली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली.
दरम्यान, टी-२० क्रिकेट मधील एक स्पर्धा, कॅरिबियन प्रीमियर लीग मंगळवारपासून सुरू झाली आहे. बरेच स्टार खेळाडू सीपीएलमध्ये खेळताना दिसत आहेत. सीपीएलच्या या हंगामात खेळणारे काही स्टार खेळाडू आयपीएलमध्येही खेळणार आहेत. या लेखात त्या ५ आयपीएल स्टार खेळाडूंबद्दल सांगणार आहोत जे सध्या सीपीएलमध्ये खेळत आहेत.
सीपीएल खेळणारे आयपीएलचे हे ५ स्टार खेळाडू
इम्रान ताहिर (गयाना अमेजन वॉरियर्स)
दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज इम्रान ताहिरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी नोंदवली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर इम्रान ताहिर आता केवळ टी-२० स्पर्धांमध्ये खेळताना दिसतो. ज्यामध्ये तो आता कॅरेबियन प्रीमियर लीग खेळत आहे.
इम्रान ताहिर आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तो या हंगामात देखील चेन्नईकडून खेळताना दिसेल.
ख्रिस लिन (सेंट किट्स आणि नेव्हिस पैट्रियट्स)
ख्रिस लिन ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील धोकादायक फलंदाजांपैकी एक मानला जातो. ख्रिस लिन ऑस्ट्रेलिया संघात सातत्याने खेळत नाही, पण टी-२० क्रिकेट मध्ये त्याचे खूप मोठे नाव आहे.
लिन कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा आयपीएलचा स्टार खेळाडू आहे. आयपीएलमधील शेवटच्या हंगामापर्यंत ख्रिस लिन हा कोलकाता नाईट रायडर्सचा सदस्य होता, तो यावेळी मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. सध्या हा स्टार खेळाडू सीपीएल मध्ये सेंट किंट्स आणि नेव्हिस पैट्रियट्स या संघाकडून खेळत आहे.
राशिद खान (बार्बाडोस ट्राइडर्स)
अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा यशस्वी खेळाडू राशिद खानने गेल्या काही वर्षांत, आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा टी-२० क्रिकेटमध्ये सर्वत्र आपल्या फिरकीची जादू दाखविली आहे. राशिद खान जगभरातील अनेक टी-२० क्रिकेट स्पर्धा खेळतो. तसेच तो आयपीएलमध्येही खेळताना दिसतो.
आयपीएलमध्ये २०१७ पासून राशिद खान सनरायझर्स हैदराबाद संघाचा सदस्य आहे. त्याने आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. तर सीपीएलमध्ये तो बार्बाडोस ट्रायडंट्सच्या संघाकडून खेळतो. आयपीएलपूर्वी सीपीएलमध्ये आपल्या संघात मोठे योगदान देण्यास तो तयार आहे.
मिशेल सेंटनर (बार्बाडोस ट्रिडंट्स)
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू गोलंदाज मिशेल सेंटनरनेही गेल्या काही वर्षांत, केलेल्या कामगिरीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खास नाव कमावले आहे. मिशेल सेंटनर फिरकी गोलंदाजीसह उपयुक्त फलंदाज म्हणून न्यूझीलंड संघाकडून खेळत आहे.
न्यूझीलंडशिवाय अन्य देशांमध्ये टी-२० क्रिकेट लीगमध्येही मिशेल सेंटनर खेळतो. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून तर सीपीएलमध्ये बार्बाडोस ट्रायडेन्ट्सकडून खेळतो.
मुजीब उर रहमान (जमैका तल्लावाह)
गेल्या काही वर्षांत अफगाणिस्तान संघात राशिद खान जबरदस्त कामगिरी करताना दिसतो आहे, तर दुसरीकडे आणखी एक युवा फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमान आहे, ज्याने खूप प्रभाव पाडला आहे. अफगाणिस्तान संघासाठी मुजीब-उर-रहमानची अप्रतिम कामगिरी राहिली आहे. तर त्याने अनेक टी-२० क्रिकेट लीगमध्येही आपली क्षमता सिद्ध केली आहे.
मुजीब उर रहमान आयपीएलचा स्टार खेळाडू आहे, जो किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघातून खेळतो. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणारा मुजीब उर रहमान सीपीएलमध्ये जमैका तल्लावाह संघाकडून खेळात आहे.






