क्रिकेट सामन्यांमध्ये स्टंप माईकमधील आवाज महत्त्वाचा असतो. यामुळे पंचांना बॅट चेंडूला लागली की नाही, असे निर्णय देताना मदत होते. पण खेळाडूंचाही स्टंप माईकमधील आवाज बऱ्याचदा ऐकू येतो. त्यामुळे अनेकदा चर्चाही होते. अशा स्टंप माईक मधून येणाऱ्या आवाजामुळे भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी तर नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहेे.
अनेकदा स्टंपमाईकमधून संघातील अन्य खेळाडूंपेक्षा यष्टीरक्षकाचा अधिक आवाज ऐकू येतो. कारण तो स्टंपच्या जवळ असतो. तसेच आत्तापर्यंत क्रिकेट चाहत्यांनी अनेकदा स्टंपमाईकमधून एखादे गमतीशीर वाक्य ऐकले असेल, तर अनेकदा खेळाडूंनी एकमेकांना स्लेज केलेले ऐकले असेल. अशाच काही घटनांचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
१. धोनीचा केदार जाधवला मराठीत सल्ला –
३ फेब्रुवारी २०१९ ला भारताने विरुद्ध न्यूझीलंड पाचव्या वनडेत भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी हा चक्क मराठीतून केदार जाधवला सल्ला देताना दिसला होता. धोनीने न्यूझीलंडकडून मिशेल सँटेनर आणि टॉड ऍस्टल फलंदाजी करत असताना ३९ व्या षटकात गोलंदाजी करणाऱ्या केदार जाधवला ‘पुढे नको भाऊ…घेऊन टाक’ असा मराठीतून सल्ला दिला. धोनीने दिलेल्या या सल्ल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
२ धोनीने करुन दिली होती श्रीसंतला गर्लफ्रेंडची आठवण –
धोनी अनेकदा फलंदाजांना स्लेजिंग करण्यापेक्षा आपल्याच खेळाडूंशी बोलताना केलेल्या गमतीशीर संवादामुळे चर्चेत असतो. त्याचे असे अनेक गमतीशीर संवाद आत्तापर्यंत स्टंपमाईकमधून ऐकू आले आहेत. यातील न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने श्रीसंतबरोबर साधलेला संवातही गमतीशीर होता.
श्रीसंत ज्यावेळी क्षेत्ररक्षण करताना त्याच्या जागेवरुन दुसरीकडे सरकला होता तेव्हा धोनी त्याला म्हणाला होता, ‘ओय श्री उधर गर्लफ्रेंड नही हैं, इधर आ जा थोडा( श्री तिकडे तूझी गर्लफ्रेंड नाही, इकडे ये जरा’
तसेच एकदा जडेेजाबरोबरही धोनीने असाच गमतीशीर संवाद साधला होता. एकदा तो न्यूझीलंडविरुद्धच्या एका कसोटीतच जडेजाला म्हणाला होता, ‘ये घुमेगा तोह पुजारा को इसलिये इधर रखा है, वोह उधर ताली बजाने के लिये नही है (जर चेंडू वळला तर मी पुजाराला इथे झेल घेण्यासाठी ठेवले आहे, तो इथे फक्त टाळ्या वाजवण्यासाठी नाही.’
एवढेच नाही तर इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात इयान बेल फलंदाजी करत असताना धोनी गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला म्हणाला होता, ‘घंटी बजाओ इसकी, घंटी को लेकेही जायेंगे’
३. पंत आणि पेनमध्ये रंगले शाब्दिक युद्ध –
२०१८-१९ ला भारतीय संघाने केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेदरम्यान भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनमध्येही चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले होते. पंत आणि पेन यांच्यातील संवाद स्टंप माईकमधून ऐकू आला होता.
मेलबर्न कसोटीत पहिल्यांदा पेन पंतला स्लेज करताना म्हणाला होता की ‘एमएस धोनी वनडे संघात परत आला आहे. त्यामुळे तू बीबीएलमध्ये हॅरिकेन संघात खेळू शकतो. त्यांना फलंदाजाची गरज आहे.’
‘तूझा ऑस्ट्रेलियातील सुट्टीचा वेळही वाढेल. होबार्ट हे सुंदर शहर आहे. तूला शानदार आपार्टमेंटही मिळेल.’ तसेच तो पुढे म्हणाला, ‘तू माझ्या मुलांना सांभाळू शकतो का, जेणेकरुन मी माझ्या पत्नीला घेऊन चित्रपट पहायला जाऊ शकतो.’
Tim Paine doing some recruiting for the @HurricanesBBL out in the middle of the 'G… 😂 #AUSvIND pic.twitter.com/6btRZA3KI7
— cricket.com.au (@cricketcomau) December 28, 2018
त्यानंतर पेनने केलेल्या स्लेजचा हिशोब चुकता करतना पंत यष्टीमागून पेनला डिवचताना दिसला. “कमऑन बाॅईज, आपल्याकडे एक खास पाहुणा आला आहे. तो काही करत नाही. मयांक तुला तात्काळ कर्णधार माहीत आहे का? पेनची ही खास उपस्थिती आहे. त्याला विशेष काही करता येत नाही. तो फक्त बडबड करतो. ” असे यावेळी पंत म्हणताना दिसला होता.
It was Rishabh Pant's turn for some fun on the stump mic today… #AUSvIND pic.twitter.com/RS8I6kI55f
— cricket.com.au (@cricketcomau) December 29, 2018
४. लायनने पुजाराला संयमी खेळीसाठी डिवचले –
२०१८-१९ला झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान सिडनी कसोटीत पुजाराने मालिकेतील तिसरे शतक केले होते. त्यावेळी एकदा ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने पुजाराला विचारले होते की ‘तूला अजून फलंदाजी करुन कंटाळा आला नाही का?’ यावर पुजाराने फक्त हसून प्रतिसाद दिला.
"Aren't you bored yet?" Lyon to Pujara (via r/cricket)
😂😂😂😂😂 pic.twitter.com/CjIblXNLPP
— Mingichavu (@legsidestrangle) January 4, 2019
याच मालिकेत पर्थ कसोटीदरम्यान पाचव्या दिवशी भारताचा वेगवान इशांत शर्मा फलंदाजीला आला तेव्हा तो ऑफ स्टम्पला झाकून उभा होता. तेव्हा लायनने त्याला ‘तू ऑफ स्टम्पला झाकून फलंदाजी करणार आहेस का ?’ असे विचारले होते. यावर इशांतने ‘तू मला ऑफ स्टम्पला गोलंदाजी करणार आहे का ?’ असे उत्तर दिले होते. त्यांच्यातील हा संवादही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
The GOAT always happy to help 🤣🤣#AUSvIND pic.twitter.com/thhUFsP6iw
— cricket.com.au (@cricketcomau) December 18, 2018
५. पेनने मुंबई इंडियन्सला पाठिंबा देण्यासाठी रोहितला दिली होती ऑफर –
२०१८-१९ ला भारताने केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिका भारताच्या चांगल्या कामगिरीबरोबरच स्टंप माईकमधून येणाऱ्या खेळाडूंच्या आवाजासाठी गाजली होती. याच मालिकेतील आणखी एक गमतीशीर किस्सा असा की मेलबर्न कसोटीत रोहित शर्मा फलंदाजी करत असताना पेन रोहितला म्हणाला, ‘मी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यापैकी कोणाला पाठिंबा द्यावा याबाबत गोंधळलेला असतो. पण जर तू आज षटकार मारला तर मी मुंबईला पाठिंबा देईल.’
"If Rohit hits a six here I'm changing to Mumbai" 😂#AUSvIND pic.twitter.com/JFdHsAl84b
— cricket.com.au (@cricketcomau) December 27, 2018
त्याचबरोबर पुढे पेन असेही म्हणाला, ‘पण राजस्थानकडून खूप ऑस्ट्रेलियन खेळाडू खेळतात.’ यावर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज ऍरॉन फिंच म्हणाला, ‘मी पण रॉयल्सकडून खेळलो आहे.’
फिंचच्या या वाक्यावर उत्तर देताना पेन म्हणाला, ‘तू सगळ्याच संघासाठी खेळला आहेस, मित्रा’ त्यावर फिंच म्हणाला ‘फक्त बेंगलोर सोडून’
यावर पेन म्हणाला होता की ‘तू त्या संघाकडून का खेळला नाहीस, विराट कोहलीला तू आवडत नाही का?’. ज्यावर फिंच म्हणाला की, ‘मी कुणालाही आवडत नाही, यामुळे मी एका संघाकडून दुसऱ्या संघाकडे जात असतो.’
Aussie star Aaron Finch is off to @RCBTweets in the #IPLAuction2020. Let's hope his new teammates like him 😂😂😂 pic.twitter.com/VGfUFfJffq
— cricket.com.au (@cricketcomau) December 19, 2019
६. धोनीने दिला कुलदीपला मौल्यवान सल्ला –
न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात २०१९ ला झालेल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात ३७ व्या षटकात न्यूझीलंडकडून बोल्ट आणि टिम साउथी फलंदाजी करत असताना धोनीने कुलदीपला सांगितले की ‘बोल्ट डोळे झाकून बचावात्मक खेळेल. त्यामुळे तू दुसरा चेंडू टाकू शकतो.’ (‘ये आंख बंद करके रोकेगा. दूसरा वाला डाल सकता है इसको’).
धोनीच्या या सल्ल्यानंतर कुलदीपने गुगली बॉल टाकत बोल्टला बाद केले. बोल्टचा झेल पहिल्या स्लीपमध्ये उभ्या असणाऱ्या रोहित शर्माने घेतला. बोल्ट हा न्यूझीलंडच्या डावातील शेवटची विकेट ठरला. त्यामुळे न्यूझीलंडला ३८ षटकात १५७ धावाच करता आल्या होत्या.
"Yeh aank band karke rokega. Dusra waala daal sakta hai isko." MS Dhoni from behind the stumps reads Boult, suggests Kuldeep to bowl a googly. Kuldeep obliges and Rohit takes a simple catch at first slip.
NZ have been bowled out for 157. #CricketMeriJaan #NZvIND
— Mumbai Indians (@mipaltan) January 23, 2019
७. जोस बटलर आणि वर्नोन फिलँडर यांच्यात झाली जोरदार शाब्दिक चकमक
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघात याचवर्षी केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या दुसर्या कसोटी सामन्यात जोस बटलर आणि वर्नोन फिलँडर यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. दक्षिण आफ्रिकेच्या दुसर्या डावात फिलँडर फलंदाजी करीत असताना इंग्लंडचा यष्टिरक्षक जॅास बटलरने त्याला शिवीगाळ केली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. बटलरचा आवाज स्टंप माईकमधून ऐकू येत होता.
Well, that was loud and clear. https://t.co/Mr7ZftfUUg
— Dale Steyn (@DaleSteyn62) January 7, 2020
विशेष म्हणजे या सामन्यानंतर चौथ्या कसोटीत फिलँडरनेही बटलर बाद झाल्यानंतर त्याच्याबद्दल अपशब्दाचा वापर केला होता. त्याबद्दल आयसीसीने या दोन्ही खेळाडूंवर कारवाई केली होती.