आजकाल जगात कोणत्याही देशात यजमान संघाला पराभूत करणे कठीण झाले आहे. प्रत्येक देश आपल्या देशात कसोटी क्रिकेटमध्ये अतिशय चांगली कामगिरी करतो. सध्या फारच कमी देश परदेशात कसोटीत एखादा दुसरा विजय मिळवतात.
परंतु काही वर्षांपुर्वी तगडे संघ हे परदेशातही कसोटीत विजय मिळवायचे. कर्णधाराची कामगिरी ही कायम त्याची परदेशातील कसोटीतील कामगिरीवर ठरते. भारतासारख्या देशात फिरकीपटूंचा भरणा असताना कसोटी सामने जिंकणे तसे अवघड काम. परंतु काही कर्णधारांनी भारतात कसोटी सामने जिंकलेही आहेत. 5 great captains who never won a Test in India.
वेस्ट इंडिजचे महान कर्णधार क्लाईव्ह लाॅईड यांनी भारतात ६ कसोटी सामने जिंकले आहेत. तर रिकी पाॅटींग व एलिस्टर कूक यांनी भारतात कसोटीत प्रत्येकी ५ पराभव पाहिले आहेत.
या लेखात भारतात कसोटी सामना न जिंकणारे ३ महान कर्णधार
४. मायकेल क्लार्क
ऑस्ट्रेलियाचा हा तेव्हाचा महान कर्णधार भारतात ३ कसोटी सामने खेळला व या तिनही सामन्यात ऑस्ट्रेलिया पराभूत झाली. या तिन सामन्यात त्याने ४७च्या सरासरीने २४६ धावा केल्या होत्या. २०१२-१३ मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाने ४ सामने खेळले. यातील ज्या तीन सामन्यात त्याने संघाचे नेतृत्त्व केले त्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
३. स्टिफन फ्लेमिंग
न्यूझीलंडचा महान कर्णधार स्टिफन फ्लेमिंगने भारतात ५ कसोटी सामने कर्णधार म्हणून खेळले. यात त्याने ४ सामने अनिर्णित राखण्यात यश मिळवले परंतु एका सामन्यात त्याच्या संघाचा पराभव झाला. त्याच्या नेतृत्त्वाखाली न्यूझीलंड संघ भारतात एकही कसोटी सामना जिंकू शकला नाही.
२. अर्जुन रणतुंगा
श्रीलंकेचा हा महान कर्णधार भारतात कर्णधार नात्याने ७ सामने खेळला व त्यात त्याला ४ पराभव पहावे लागले. तीन सामने त्याच्या नेतृत्त्वाखाली अनिर्णित राहिले. एवढेच नाही तर श्रीलंका संघ भारतात २० कसोटी सामने खेळला व त्यात त्यांनी तब्बल ११ पराभव पाहिले व ९ सामने अनिर्णित राहिले.
१. रिकी पाॅटींग
कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून रिकी पाॅटींगने तब्बल ४८ सामने जिंकले आहेत. पाॅटींग कसोटीतील एक मोठा कर्णधार समजला जातो. परंतु जगभरात ४८ कसोटी सामने जिंकणाऱ्या पंटरला भारतात एकही कसोटी सामना जिंकता आला नाही. भारतात त्याने कर्णधार म्हणून ७ सामने खेळले व त्यात त्याने ५ पराभव पाहिले व २ सामने अनिर्णित राहिले. त्याला फलंदाजीतही कसोटी क्रिकेटमध्ये भारतात विशेष यश मिळाले नाही. याचबरोबर ऑस्ट्रेलियाने भारतात ५० कसोटी सामने खेळले व त्यात त्यांनी १३ विजय, २१ पराभव, १५ अनिर्णित व १ टाय सामना खेळला.
ट्रेंडिंग घडामोडी-
–एका आयपीएल हंगामात तब्बल १००० मिनीटं फलंदाजी करणारा एकमेव फलंदाज
-२००७ विश्वचषकातील हिरो म्हणतोय यावेळीचा टी२० विश्वचषक खेळणारचं
-सचिनला आऊट झाला की हा खेळाडू करायचा रडायला सुरुवात
-आणि युवराजने बसमधील सिटवर बसलेल्या रोहितला उठवले