क्रिकेट खेळामध्ये प्रत्येक खेळाडू आपला जीव लावून खेळत असतो. आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी तो जीव की प्राण एक करतो. परंतु एवढी मेहनत केल्यानंतरही दोन्हींपैकी एका संघाला पराभवाचा सामना करावा लागतोच. अशावेळेस कधी-कधी खेळाडूंकडून भावना रोखल्या जात नाहीत आणि त्यांना भर मैदानात रडू कोसळते. आजवर बऱ्याचदा क्रिकेट मैदानात असे प्रसंग घडले आहेत. त्यापैकीच काही प्रसंगांचा येथे आढावा घेण्यात आला आहे.
विराट कोहली
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली २०१२ साली झालेल्या टी-२० विश्वचषकात रडताना दिसून आला होता. दक्षिण आफ्रिकेला हरवल्यानंतर भारताचा सामना वेस्ट इंडीजसोबत झाला होता. या सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला होता. त्यामुळे विराट कोहलीला आपले अश्रु अनावर झाले होते आणि तो मैदानातच रडू लागला होता. विराट एक आक्रमक खेळाडू आहे. संघ जिंकल्यावर त्याचा जोश आणि उत्साह हा वेगळ्या अंदाजात असतो. परंतु संघ हारल्यावर तो तितकाच निराशही होतो.
बांगलादेशी खेळाडू
सध्याच्या क्रिकेटमध्ये बांगलादेश संघाला सुद्धा मजबूत संघ मानला जातो. २०१२ साली बांगलादेश संघाने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून त्यांना आशिया चषकावर आपले नाव कोरण्याची चांगलीच संधी होती. परंतु पाकिस्तानने तो सामना केवळ २ धावांनी जिंकून बांगलादेशला पराभूत केले होते. यावेळी बांगलादेश संघाच्या खेळाडूंसोबत सर्व बांगलादेशी क्रिकेटप्रेमींना आपले अश्रु अनावर झाले होते.
युवराज सिंग
दरवेळी खेळाडू पराभूत झाल्यावरच रडेल असे नाही. कधी कधी खेळाडू आनंदाच्या भरातसुद्धा रडतो. असेच दृश्य आपण २०११ सालच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात झाले होते. २८ वर्षांनंतर भारतीय संघ विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता. त्यावेळेस युवराज सिंगच्या डोळ्यात आनंदाचे अश्रु आले होते.
विनोद कांबळी
१९९६च्या विश्वचषकात भारतीय संघाच्या उपांत्य फेरीतील खराब प्रदर्शनामुळे स्टेडीयममधील प्रेक्षकांनी गोंधळ केला होता. यामुळे प्रतिस्पर्धी श्रीलंका संघाला विजयी घोषित करण्यात आले होते. यावेळी भारतीय संघाचा भाग असलेले विनोद कांबळी यांना या निर्णयामुळे भर मैदानात रडू कोसळले होते.
इंजमाम उल हक
पाकिस्तान क्रिकेट संघाचा उत्कृष्ट खेळाडू आणि माजी कर्णधार इंजमाम उल हकने २००७ साली शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. हा शेवटचा सामना खेळल्यानंतर मैदान सोडून जाताना इंजमामला रडू आले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडच्या पदार्पणवीराने घडवला इतिहास, तब्बल १२५ वर्षांपुर्वीचा विक्रम काढला मोडीत
ग्रेट भेट! खूप दिवसानंतर ‘या’ दोन भारतीय खेळाडूंची झाली भेट, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद
आई आणि बहीण गमावलेली भारतीय क्रिकेटपटू ‘अशी’ आली दुःखातून बाहेर, स्वतः सांगितली कहानी