जागतिक संघ, आशियाचा संघ किंवा आफ्रिकेचा संघ तयार करुन त्यांच्यात अनेक आंतरराष्ट्रीय सामने आजपर्यंत झाले आहेत. आशिया खंडातील भारत, पाकिस्तान, श्रीलंका व बांगलादेश अशा देशातून संघ तयार करुनही सामने खेळविण्यात आले आहेत.
आशिया ११ संघ आजपर्यंत केवळ वनडे सामने खेळला आहे. २००५साली आयसीसी वर्ल्ड ११सोबत एक सामना, २००५मध्ये आफ्रिका ११ संघासोबत दक्षिण आफ्रिकेत ३ सामने तर २००७साली आफ्रिका ११संघासोबतच ३ वनडे सामने भारतात असे एकूण ७ वनडे सामने आशिया ११ संघ खेळला आहे. 5 Indian Cricketers who represented the Asian XI.
त्यावेळी खाजगी लीग सुरु झाल्या नसल्याने अनेक खेळाडूंना दुसऱ्या देशातील खेळाडूंबरोबर ड्रेसिंग रुम शेअर करण्याची एक संधी मिळत असे. आशिया ११कडून ७ सामन्यात एकूण २५ खेळाडूंनी भाग घेतला. यातील ९ खेळाडू भारतीय, ७ खेळाडू श्रीलंकेचे, ६ पाकिस्तानचे तर ३ खेळाडू बांगलादेशचे खेळले.
मोहम्मद युसुफ व विरेंद्र सेहवागने ७ पैकी ७ सामने खेळण्याचा पराक्रम केला आहे. झहिर खानने ६ तर माहेला जयवर्धनेने ५ सामने खेळले आहेत.
भारताकडून आशिया ११ मध्ये खेळलेले खेळाडू व त्यांची कामगिरी-
विरेंद्र सेहवाग- ७ सामने, २१४ धावा, १ अर्धशतक, १ विकेट
एमएस धोनी- ३ सामने, १७४ धावा, १ शतक
सौरव गांगुली- ३ सामने, १४२ धावा, १ अर्धशतक
युवराज सिंग- ३ सामने, ९२ धावा, १ विकेट
राहुल द्रविड- १ सामना, नाबाद ७५ धावा, १ अर्धशतक
झहिर खान- ६ सामने, ३९ धावा, १३ विकेट
अनिल कुंबळे- २ सामने, ३५ धावा, ३ विकेट
हरभजन सिंग- २ सामने, २४ धावा, ४ विकेट
आशिष नेहरा- ३ सामने, १ धाव, २ विकेट
ट्रेडिंग घडामोडी-
–या ३वेळी कॅप्टन कूल धोनीला आला होता जबरदस्त राग
–आणि क्रिकेटपासून भटकलेल्या श्रेयस अय्यरला नेले मानसोपचार तज्ञाकडे