आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीची (ICC Champions Trophy 2025) सुरूवात (19 फेब्रुवारी) रोजी झाली. दरम्यान जागतिक क्रिकेटमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. यानंतर, या स्पर्धेचा दुसरा सामना (20 फेब्रुवारी) खेळवण्यात आला. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यात भारत-बांगलादेश (India vs Bangladesh) आमने-सामने आहेत. या सामन्यात स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) एक खास रेकाॅर्ड केला आहे.
जडेजाने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात खेळताच 200 वनडे सामने पूर्ण केले. त्याने आयपीएलमध्ये 200 सामने पूर्ण केले आहेत. यासह तो दिग्गजांच्या यादीत सामील झाला आहे. या बातमीद्वारे आपण 200 वनडे, 200 आयपीएल सामन्यांचा टप्पा गाठणाऱ्या 5 दिग्गजांबद्दल जाणून घेऊया.
1) महेंद्रसिंग धोनी- महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) भारतीय क्रिकेट संघात मोठे योगदान दिले आहे. या महान खेळाडूने क्रिकेटला अनेक वर्षे दिली आहेत. दरम्यान त्याने 2004 ते 2019 पर्यंत भारतासाठी 347 वनडे सामने खेळले. त्याच वेळी, धोनीने आयपीएलमध्ये खूप क्रिकेट खेळले आहे आणि 2008 पासून त्याने 264 सामने खेळले आहेत.
2) सुरेश रैना- भारताचा माजी महान फलंदाज सुरेश रैनाने (Suresh Raina) भारतासाठी दीर्घ कारकीर्द घडवली. रैनाबद्दल बोलायचे झाले तर, तो 200 पेक्षा जास्त वनडे आणि 200 पेक्षा जास्त आयपीएल सामने खेळणारा खेळाडू आहे. त्याने भारतासाठी 226 वनडे सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने आयपीएलमध्ये 205 सामने खेळले आहेत.
3) विराट कोहली- भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (VIrat Kohli) सध्या संघाची सर्वात मोठी ताकद आहे. कोहली गेल्या अनेक वर्षांपासून भारतासाठी खेळत आहे आणि त्याने अनेक ऐतिहासिक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले आहेत. कोहलीने भारतासाठी 298 वनडे सामने खेळले आहेत. याशिवाय, त्याने आयपीएलमध्येही भरपूर क्रिकेट खेळले आहे. आतापर्यंत त्याने 252 सामने खेळले आहेत.
4) रोहित शर्मा- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) भारतीय क्रिकेटमध्ये अभूतपूर्व योगदान दिले आहे. 2007 मध्ये पदार्पणापासून रोहित शर्माने भारतासाठी 269 वनडे सामने खेळले आहेत. त्याच वेळी, आयपीएलमध्येही त्याने सामन्यांचे द्विशतक झळकावले आहे आणि आतापर्यंत त्याने 257 सामने खेळले आहेत.
5) रवींद्र जडेजा- भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) भारतासाठी गेल्या अनेक वर्षांपासून चमकदार कामगिरी करत आहे. त्याने भारतासाठी 200 वनडे सामने पूर्ण केले आहेत. जडेजाने 2009 मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केले. तेव्हापासून तो अजूनही खेळत आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 240 सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानला आयसीसीचा दणका, स्लो ओव्हर रेटसाठी केला दंड
“गूगलचा सिनेमॅटिक टच! जया बच्चन यांच्या डायलॉगसोबत दिला भारतीय संघाला पाठिंबा”
11000 धावा आणि रोहितचा जलवा; दिग्गजांच्या यादीत कोरले नाव