शुक्रवार (१४ जानेवारी) पासून १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ (icc under 19 world cup) स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत यश धुल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी १९ वर्षाखालील भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत विजय मिळवला होता. भारतीय १९ वर्षाखालील संघ ७ वेळेस स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. ज्यामध्ये ४ वेळेस भारतीय संघाला जेतेपद मिळवण्यात यश आले आहे. ही स्पर्धा वेस्ट इंडिजमध्ये पार पडणार आहे. चला तर पाहूया भारतीय १९ वर्षाखालील संघातील ५ खेळाडू जे या स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकतात.
१) यश धुल (Yash Dhull) : सप्टेंबर महिन्यात पार पडलेल्या विनू मांकड स्पर्धेत यश धुलने ५ सामन्यात ७५ च्या सरासरीने ३०२ धावा केल्या आहेत. तसेच त्याने भारतीय १९ वर्षाखालील संघाला आशिया चषक स्पर्धेत विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. आता तो १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
२) हरनूर सिंग (Harnur Singh): हरनूर सिंगने बांगलादेश संघाविरुद्ध १११, यूएई विरुद्ध १२, पाकिस्तानविरुद्ध ४६ आणि अफगाणिस्तानविरुद्ध ६५ धावा करून तो प्रसिद्धीच्या झोतात आला. आशिया चषक स्पर्धेत तो सामनावीर ठरला होता.
३) आर.एस. हंगरगेकर (RS Hangarkegar) : आर.एस. हंगरेकर हा १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज असणार आहे. त्याने लिस्ट ए क्रिकेटच्या ५ सामन्यांमध्ये १० गडी बाद केले आहेत. तसेच १० व्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने ४१ धावा केल्या आहेत. नुकताच संपन्न झालेल्या आशिया चषक स्पर्धेत ४९ धावा करत ५ गडी बाद केले होते.
४) निशांत सिंधू (Nishant Sindhu) : निशांत सिंधूने ४ युथ वनडे सामन्यांमध्ये २ गडी बाद केले आहेत. त्याने वेस्ट इंडिज संघाविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात नाबाद ७८ धावांची खेळी केली होती. तो या स्पर्धेत अष्टपैलू खेळाडूची भूमिका पार पाडताना दिसून येऊ शकतो.
५) राज बावा (Raj Bava): प्रसिद्ध हॉकीपटू त्रिलोचन बावा यांचा मुलगा राज क्रिकेटमध्ये आपले कौशल्य दाखवत आहे. आशिया चषकातील ४ सामन्यात ८ गडी बाद केले होते. त्याने पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात ५६ धावा खर्च करत ४ गडी बाद केले होते.
आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी :
सामने –८३
विजय –६३
पराभव –१९
अनिर्णीत –१
विजयाची टक्केवारी – ७६.८३%
असा आहे १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ स्पर्धेसाठी भारतीय संघ:
यश धुल (कर्णधार), हरनूर सिंग, अंगक्रिश रघुवंशी, एस. रशीद (उपकर्णधार), निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनिश्वर गौतम, दिनेश बाना, आराध्या यादव, राज अंगद बावा, मानव पारख, कौशल तांबे, आर.एस. हंगरगेकर, वासू वत्स, विकी ओस्तवाल, रविकुमार, गरव सांगवान.
राखीव: ऋषी रेड्डी, उदय सहारन, अंश गोसाई, अमृत राज उपाध्याय, अमृत राज उपाध्याय
महत्वाच्या बातम्या :
हे काय? कॅच सुटला, मग चेंडू मैदानावरील हेल्मेटला धडकला अन् द. आफ्रिकेला फुकटात मिळाल्या चक्क ५ धावा
कसोटी क्रमवारीत मोठे फेरबदल, स्मिथने चँपियन कर्णधार विलियम्सनला पछाडले; तर जेमिसनचीही मोठी झेप
हे नक्की पाहा :