---Advertisement---

‘हिटमॅनला बोलवा रे!’, राहुल – मयांकच्या जोडीच्या फ्लॉप शोनंतर नेटकऱ्यांच्या मागणीला जोर

On: गुरूवार, जानेवारी 13, 2022 11:06 AM
Mayank Agarwal and KL Rahul
---Advertisement---

केपटाऊनच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India)  यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय संघाकडे ७० धावांची आघाडी आहे. परंतु या डावात देखील भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज पुन्हा एकदा फ्लॉप ठरले आहेत. ज्यामुळे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर आपल्या संतप्त प्रतिक्रीया द्यायला सुरुवात केली आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (१२ जानेवारी ) भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आणि भारतीय संघाला पुनरागमन करून दिले. त्यानंतर भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारून दक्षिण आफ्रिका संघासमोर मोठे लक्ष्य द्यायचे आव्हान होते. परंतु, भारतीय सलामीवीर फलंदाज केएल राहुल आणि मयांक अगरवाल या डावात देखील फ्लॉप ठरले. केएल राहुल (Kl Rahul)  १० तर मयांक अगरवाल (Mayank Agarwal) अवघ्या ७ धावा करत माघारी परतला.

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रीया
अनेकांनी मयांक अगरवाल आणि केएल राहुल या दोन्ही सलामीवीर फलंदाजांवर जोरदार टीका केली आहे. एका युजरने ट्विट करत लिहिले की, “आणखी एका महत्त्वपूर्ण सामन्यात आमच्या सलामीवीर फलंदाज फ्लॉप ठरले आहे. यात नवीन काही नाहीये. आता पुन्हा एकदा भारतीय संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्याची जबाबदारी कर्णधार कोहलीवर आहे.”

तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “चला आता… केएल राहुल आणि मयांक अगरवाल खूप काही केलं तुम्ही .. आता तुम्ही जाऊन तारक मेहता पाहा..”तसेच आणखी एका युजरने ट्विट करत लिहिले की, “केएल राहुल आणि मयंक अगरवाल कसे खेळत आहेत? प्रत्येक महत्वाच्या क्षणी अपयशी ठरत आहेत? लवकरच हिटमॅन त्यांची जागा घेईल.”

https://twitter.com/pankaj_1518/status/1481291272413650945?t=sxx5V5Lozts4B64m0ZaqeA&s=19

https://twitter.com/HardikJ___07/status/1481291483097485324?t=XLKYosG9cIYLll4prH-g0Q&s=19

https://twitter.com/icon0clast__/status/1481291364558155777?t=fCXNi0ZxArpzcghDtf80Bw&s=19

https://twitter.com/Cricket94583075/status/1481290449310859266?t=jvM4tyS6FJijv-d7aIPY0Q&s=19

https://twitter.com/Rishabhdadhic18/status/1481289980144414721?t=GqoPUh5P_xZJ9hj-RF24yA&s=19

https://twitter.com/ManishS41796915/status/1481291766817243139?t=KpUrROvdOac_Gzr-yfLUuQ&s=19

https://twitter.com/GoatViratKohli/status/1481287226533486593?t=StQSRmVp8yatPp2jGKWKhA&s=19

https://twitter.com/AkashAgrawal_1/status/1481286867895349250?t=98z8GQZaM4IB0xjHr3F_8g&s=19

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना २२३ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये कर्णधार कोहलीने सर्वाधिक ७९ धावांची खेळी केली होती. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिका संघाचा संपूर्ण डाव २१० धावांवर संपुष्टात आला आहे. ज्यामध्ये किगन पीटरसनने ७२ धावांची खेळी केली. आता दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाची दुसऱ्या दिवसाखेर धावसंख्या २ बाद ५७ अशी आहे. विराट कोहली १४, तर चेतेश्वर पुजारा ९ धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे.

महत्वाच्या बातम्या

दणक्यात साजरा झाला वामिकाचा पहिला वाढदिवस, बर्थडे पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

ताली मारते रहो’; शमीच्या एका षटकातील डबल धमाक्याचं कर्णधाराकडून कौतुक, करून घेतला टाळ्यांचा गजर

हे नक्की पाहा:

क्रिकेट अंपायर्सला मिळणारे मानधन| Cricket Umpire Salary

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---