गेल्या २ वर्षापासून जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम अनेक क्षेत्रांवर पडलेला दिसतो. यात क्रीडा क्षेत्राचाही समावेश आहे. तरी, अनेक गोष्टींची काळजी घेत क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जात आहे. पण बऱ्याचदा स्पर्धा सुरू असताना खेळाडूंचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आढळले आहे. नुकतेच नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेदरम्यान भारताचे ७ खेळाडू कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत.
कोविड पॉझिटिव्ह आढळलेल्या ७ खेळाडूंमध्ये स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत आणि दोनवेळची राष्ट्रकुल स्पर्धतील सुवर्णपदक विजेती अश्विनी पोनप्पा यांचाही समावेश आहे. त्यामुळे या दोघांनी तसेच त्यांचे दुहेरीतील साथीदार यांना इंडिया ओपन स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. याबद्दल जागतिक बॅडमिंटन महासंघाने माहिती दिली आहे.
तसेच श्रीकांत आणि पोनप्पा या दोघांव्यतिरिक्त रितिका राहुल ठक्कर, त्रिशा जॉली, मिथून मंजूनाथ, सिमरन अमन सिंघी आणि खुशी गुप्ता यांचे देखील कोरोह चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. यातील पोनप्पा, ठक्कर, त्रिशा, खुशी आणि सिमरन हे दुहेरी प्रकारात खेळत असल्याने त्यांच्या साथीदारांनाही स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे स्पर्धेतून माघार घेणाऱ्या भारतीय खेळाडूंची संख्या १२ झाली आहे.
????UPDATE#YonexSunriseIndiaOpen2022 #Badminton#COVID19 pic.twitter.com/IMhsbf9UWm
— BAI Media (@BAI_Media) January 13, 2022
जागतिक बॅडमिंटन महासंघाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘मंगळवारी झालेल्या अनिवार्य आरटी-पीसीआर चाचणीत खेळाडूंचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. खेळाडूंचे दुहेरीतील साथीदार त्यांच्या जवळच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये असल्याने त्यांनीही स्पर्धेतून माघार घेतली आहे.’
अधिक वाचा – वर्ष २०२२ चे ३० सर्वात श्रीमंत ऍथलिट्स, यादीत बरीच चकित करणारी नावे; एकाही क्रिकेटरचा मात्र समावेश नाही
तसेच पुढे माहिती देण्यात आली आहे की, ‘मुख्य स्पर्धेत या खेळाडूंचे बदली स्पर्धक सामील केले जाणर नाहीत, त्यामुळे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना थेट पुढील फेरीत प्रवेश करता येईल.’ या वृत्ताला भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने देखील पुष्टी दिली आहे.
व्हिडिओ पाहा – वादापासून आयुष्यभर चार हात लांब राहिलेला Rahul Dravid जेव्हा क्रिकेटप्रेमींच्या डोक्यात गेला होता
इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा ११ जानेवारीपासून सुरू झाली आहे. ही स्पर्धा नवी दिल्लीतील केडी जाधव इनडोअर हॉलमध्ये खेळवली जात आहे.
या स्पर्धेतून बी साई प्रणीतने यापूर्वीच माघार घेतली होती. त्याचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
वेस्ट इंडिजमध्ये रंगणार १९ वर्षाखालील विश्वचषकाचा थरार, ‘या’ ५ भारतीय खेळाडूंवर असेल सर्वांचे लक्ष
‘हिटमॅनला बोलवा रे!’, राहुल – मयांकच्या जोडीच्या फ्लॉप शोनंतर नेटकऱ्यांच्या मागणीला जोर