आयपीएलमध्ये प्रशिक्षकाची भूमिका खूप महत्वाची आहे. एक प्रशिक्षक संघासाठी योग्य खेळाडू तयार करण्यासाठी आणि जबरदस्त रणनीती तयार करण्यात कर्णधारास मदत करतो. आयपीएलमध्ये कर्णधाराच्या अनेक जबाबदाऱ्या असतात आणि म्हणूनच प्रशिक्षकाचे महत्त्व बरेच वाढते.
आतापर्यंत आयपीएलमध्ये अनेक उत्कृष्ट प्रशिक्षक झाले आहेत. यातील काही प्रशिक्षक यशस्वी ठरले. चेन्नई सुपर किंग्जचा प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. तो बर्याच वर्षांपासून सीएसके संघाचा प्रशिक्षक आहे आणि त्याने आपल्या संघाला आयपीएल चषक जिंकून दिला आहे.
सध्या आयपीएलमध्ये असे अनेक प्रशिक्षक आहेत जे या स्पर्धेत कधीतरी स्वत: खेळाडू म्हणून खेळले आहेत. त्याने खेळाडू म्हणून आयपीएल चषक जिंकला आणि नंतर आता प्रशिक्षकही झाले.
या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशा ५ खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांनी एक खेळाडू म्हणून आयपीएल चषक जिंकला आणि नंतर प्रशिक्षक बनले.
५ प्रशिक्षक ज्यांनी खेळाडू म्हणून आयपीएल चषक जिंकला आहे –
५. रिकी पॉन्टिंग – दिल्ली कॅपिटल्स – मुख्य प्रशिक्षक
रिकी पॉन्टिंग सध्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. मागील हंगामात, संघाने त्यांच्या प्रशिक्षणात जबरदस्त कामगिरी केली आणि प्लेऑफ पर्यंत धडक मारली. रिकी पॉन्टिंगने खेळाडू म्हणून आयपीएलचे जेतेपदही जिंकले आहे. तो मुंबई इंडियन्सकडून २०१२ आणि २०१३ चे आयपीएल हंगाम खेळाला आहे. त्यात २०१३ मध्ये आयपीएलचे जेतेपद मुंबई संघाने मिळवले होते, त्यावेळी तो मुंबई संघात खेळत होता. आता रिकी पॉटींग आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा प्रशिक्षक आहे आणि प्रशिक्षक म्हणूनही त्याला आयपीएलचे विजेतेपद मिळवायचे आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर रिकी पॉटींग हा एक अतिशय चांगला कर्णधार आणि खेळाडू आहे, त्यामुळे त्याच्या प्रशिक्षणामध्ये त्याची एक झलक आपल्याला मिळते. त्याच्या आगमनाने दिल्ली कॅपिटल्स संघाला बराच फायदा झाला आहे.
४. रायन हॅरिस – दिल्ली कॅपिटल – गोलंदाजी प्रशिक्षक
रायन हॅरिस सध्या दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे. इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, मोहित शर्मा, एन्रीच नॉर्किए, हर्षल पटेल यांच्यासारख्या गोलंदाजांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. त्याचबरोबर स्वत: रायन हॅरिसनेही खेळाडू म्हणून आयपीएल चषक जिंकला आहे.
२००९ मध्ये जेव्हा डेक्कन चार्जर्स हैदराबादने आयपीएल विजेतेपद जिंकले तेव्हा रायन हॅरिस चॅम्पियन संघाचा एक भाग होता. आता त्याला प्रशिक्षक म्हणून आयपीएल चषक जिंकण्याची इच्छा आहे.
३. मोहम्मद कैफ – दिल्ली कॅपिटल्स – फील्डिंग कोच
या यादीमध्ये दिल्ली कॅपिटलच्या आणखी एका प्रशिक्षकाचे नाव आहे. मोहम्मद कैफ हा दिल्ली संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहे. याशिवाय तो स्वत: आयपीएलचा पहिला सत्र खेळला आहे. २००८ च्या पहिल्या सत्रात तो राजस्थान रॉयल्स संघाचा सदस्य होता आणि शेन वॉर्नच्या नेतृत्वात राजस्थानने आयपीएलचे जेतेपद जिंकले होते.
२. मायकेल हसी – चेन्नई सुपर किंग्ज – फलंदाजी प्रशिक्षक
मायकेल हसी हा आयपीएलमध्ये बर्यापैकी यशस्वी झाला होता. पदार्पण सामन्यात त्याने शतक झळकावले. २००८ मध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध शतकी खेळी केली होती.
त्यानंतर पुढील ५ वर्षांत त्याने सीएसकेच्या संघासह २ चॅम्पियनशिप जिंकल्या. तो मुंबई इंडियन्सचा देखील एक भाग होता. मायकल हसी आता सीएसकेचा फलंदाजी प्रशिक्षक आहे.
१. लक्ष्मीपती बालाजी – चेन्नई सुपर किंग्ज – गोलंदाजी प्रशिक्षक
२०१० मध्ये जेव्हा चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलचे जेतेपद जिंकले तेव्हा लक्ष्मीपती बालाजी त्या चॅम्पियन संघाचा एक भाग होता. त्या मोसमात त्याने ७ सामन्यांत ७ गडी बाद केले होते. २०११ मध्ये त्याला सीएसकेने सोडले होते, त्यानंतर तो केकेआर संघाचा सदस्य झाले. २०१२ मध्ये त्याने केकेआर संघाकडून आयपीएल चषक जिंकला आणि त्या मोसमात त्याने ८ सामन्यांत ११ बळी घेतले होते.
याशिवाय २०१४ च्या आयपीएल हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना त्याने अंतिम फेरीपर्यंतचा प्रवासही केला होता. लक्ष्मीपती बालाजी सध्या चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे.