कोणत्याही क्रिकेटपटूसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव कमाविण्यासाठी, त्याचा पहिला सामना महत्त्वपूर्ण ठरतो. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर पहिल्यांदा राष्ट्रीय पातळीवर खेळायची संधी मिळते आणि पहिल्या सामन्यातच खराब प्रदर्शन केल्याने खेळाडू निराश होतो. असे खूप क्रिकेटपटू होऊन गेले आहेत, ज्यांची पहिल्या सामन्यातील कामगिरी फार काही खास नव्हती. परंतु पुढे जाऊन त्यांनी एक स्थान मिळवले आणि पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही.
चला तर मग जाणून घेऊया त्या खेळाडूंबद्दल, ज्यांच्या कारकिर्दीची सुरुवात फार काही चांगली झाली नाही.
कारकिर्दीची खराब सुरुवात होणारे 5 दिग्गज खेळाडू- 5 Legendary Cricketers who had forgettable Test Debutes
5. मायकल होल्डिंग
वेस्ट इंडिजचे दिग्गज खेळाडू मायकल होल्डिंग (Michael Holding) असे खेळाडू होते, जे आपल्या पूर्ण लयीत होते, गोलंदाजी योग्य वेगाने आणि लेंथने करत होते, यापेक्षा घातक काय असू शकते. तसेच, ते असे खेळाडू होते, ज्यांनी बाऊंसर खेळपट्ट्यांवर आपला दबदबा निर्माण केला होता.
तरीही पहिल्याच सामन्यात 1975 साली ग्रेग चॅपेल यांनी त्यांच्या गतीचा चांगला फायदा उचलला आणि ब्रिसबेनच्या खेळपट्टीवर त्यांची चांगलीच धुलाई केली होती. वेस्ट इंडिज संघाचा पहिला डाव 214 धावांवर सर्वबाद झाला होता, ज्यामध्ये होल्डिंग यांनी काही 7 चौकारांच्या मदतीने 34 धावांची खेळीही केली होती. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध 20 षटके गोलंदाजी करत केवळ 81 धावा दिल्या होत्या. यादरम्यान त्यांना विकेट घेता आली नाही.
दुसऱ्या डावात लॉरेन्स रोव आणि एल्विन कालिचरन यांच्या चमकदार भागीदारीमुळे वेस्ट इंडिज संघाने ऑस्ट्रेलियाला 219 धावांचे आव्हान दिले होते. चॅपेलने यांनी पुन्हा एकदा शानदार फलंदाजी केली आणि शतक ठोकले. होल्डिंग यांच्यासाठी दुसरा डावदेखील निराशाजनक राहिला. तसेच त्यांनी 10 षटके गोलंदाजी करत 46 धावा दिल्या. यादरम्यान त्यांना एकही विकेट मिळविता आली नाही. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने विंडीज संघावर 8 विकेट्सने विजय मिळविला.
याचा अर्थ असा, की होल्डिंग यांना आपल्या पहिल्या विकेटसाठी पर्थ कसोटी सामन्याची वाट पहावी लागली.
पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात होल्डिंग यांनी चमकदार कामगिरी करत पहिल्या डावात 4 विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्यांच्या संघाला पहिल्या डावात चांगली सुरुवात मिळाली. शेवटी तो सामना विंडीजने एक डाव आणि 87 धावांनी आपल्या नावावर केला होता.
होल्डिंग यांंनी आपल्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत 60 कसोटी सामने खेळले. त्यात त्यांनी 23.68 च्या सरासरीने 249 विकेट्स घेतल्या.
4. सर लिओनार्ड हटन
जेव्हा इंग्लंडच्या फलंदाजांच्या कामगिरीबद्दल बोलले जाते, तेव्हा सर लिओनार्ड हटन (Sir Leonard Hutton) यांचे नाव सर्वात प्रथम घेतले जाते. त्यांच्या नावावर 79 कसोटी सामन्यांमध्ये तब्बल 56.67 च्या सरासरीने 6971 धावा जोडल्या आहेत. या सलामी फलंदाजासमोर कदाचितच इतर कोणता खेळाडू असेल, जो यांच्या खेळीचा सामना करू शकला असेल.
तरीही हटन यांचा पहिला सामना हा खूपच निराशाजनक होता. 1937 साली न्यूझीलंडच्या कमकुवत गोलंदाजीसमोर त्यांच्या पारड्यात झुकतं माप पडलं.
त्यांना जॅक कोवी यांनी खूप त्रास दिला. जे एकाच अंदाजात आऊटस्विंगर आणि ऑफ ब्रेक चेंडू टाकत होते. ते लॉर्ड्समध्ये खेळताना आपल्या पहिल्याच डावात शून्य धावसंख्येवर बाद झाले आणि त्यांनी दुसऱ्या डावात केवळ 1 धाव बनवू शकले. तो सामना अनिर्णित राहिला होता.
हटन यांनी पुढच्या सामन्यात जोरदार पुनरागमन केले आणि कोविविरुद्ध आक्रमक खेळी करत एक चमकदार शतक ठोकले. त्या सामन्यात त्यांच्याव्यतिरिक्त इतर कोणालाही त्यांच्याइतक्या धावा जोडता आल्या नाही. शेवटी इंग्लंड संघाने 130 धावांनी विजय मिळविला
3. शेन वॉर्न
जेव्हा शेन वॉर्नने (Shane Warne) खेळायला सुरुवात केली, तेव्हा स्टेडियममध्ये प्रेक्षक नेहमी एक बॅनर घेऊन बसत असत. त्यावर लिहिलेले असायचे, “शेन कोण? रिकी बेनो आताही फिरकीचा किंग आहे.” हे पाहून सर्वांनाच चांगले वाटले, की वॉर्नने कशाप्रकारे प्रेक्षकांना आपल्या फिरकी गोलंदाजीने आपल्या प्रेमात पाडले. क्रिकेटमध्ये सर्वात मनोरंजक गोलंदाजांपैकी एक असणाऱ्या वॉर्नच्या कारकिर्दीची सुरुवात फार खास राहिली नाही आणि तो ते कधीही विसरून शकणार नाही. 1992 साली भारताविरुद्ध आपल्या कसोटी वॉर्नने 45 षटके गोलंदाजी केली आणि तब्बल 150 धावा दिल्या.
त्या सामन्यात वॉर्नने रवी शास्त्री यांची विकेट घेतली होती. शास्त्रींनी त्या सामन्यात द्विशतकी खेळी केली होती. वॉर्नची कसोटीत प्रत्येक संघाविरुद्ध गोलंदाजी सरासरी ही 30 पेक्षा कमी आहे. परंतु भारताविरुद्ध त्याची सरासरी 47.18 आहे.
हा पहिलाच प्रसंग होता, जेव्हा सचिन तेंडुलकर आणि वॉर्नने एकमेकांचा सामना केला होता.
2. सर विवियन रिचर्ड्स
वेस्ट इंडिजचे दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू सर विवियन रिचर्ड्स (Sir Vivian Richards) यांना गोलंदाजांविरुद्ध आक्रमक खेळी खेळण्यासाठी ओळखले जात होते. परंतु त्यांच्या पहिल्या सामन्यात त्यांच्यासमोरील आव्हाने ही वेगळीच होती. 1974 साली भारताविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात, भागवत चंद्रशेखर यांच्या फिरकी गोलंदाजीसमोर त्यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. असे वाटत होते, की त्यांना अशा परिस्थितीत खेळण्याचा कोणताही अनुभव नाही.
रिचर्ड्स यांनी त्या सामन्यात पहिल्या डावात केवळ 4 आणि दुसऱ्या डावात 3 धावाच केल्या होत्या.
पुढच्या सामन्यात चंद्रशेखर यांच्या अनुपस्थितीतीचा रिचर्ड्स यांनी पुरेपूर फायदा उचलला आणि पहिल्या डावात 192 धावांची दीडशतकी खेळी करत आपली छाप सोडली. तसेच, फिरोज शाह कोटला म्हणजे आताचे अरूण जेटली स्टेडियममधील प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांची फलंदाजी येण्यापूर्वी संघ संकटात होता. परंतु त्यांच्या येताच त्यांनी सर्वकाही सहज केले.
1. डॉन ब्रॅडमन
सर डॉन ब्रॅडमन (Sir Don Bradman) यांच्या कारकिर्दीतील शेवटच्या डावाची नेहमीच चर्चा होते. ज्यामध्ये त्यांना आपल्या कारकिर्दीची कसोटी सरासरी 100 पर्यंत नेण्यास केवळ 4 धावांची आवश्यकता होती. तरीही, ते गुगली चेंडू खेळू शकले नाहीत आणि शून्य धावेवर बाद झाले.
जर त्यांनी आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात उत्कृष्ट खेळी केली असती, तर त्यांना आपल्या शेवटच्या डावात 4 धावांची आवश्यकता पडली नसती. त्यांच्या कसोटीतील 99.94 सरासरीचा विक्रम आजही अबाधित आहे. पहिल्याच सामन्यात 1928 साली ब्रिसबेनच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळताना त्यांना मॉरिस टेटने 18 धावसंख्येवर बाद केले होते.
इंग्लंडने दिलेल्या 742 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघासाठी ब्रॅडमन पुन्हा एकदा अपयशी ठरले आणि दुसऱ्या डावात केवळ 1 धाव बनवू शकले. ऑस्ट्रेलिया संघाचा डाव त्या सामन्यात 66 धावांवर संपुष्टात आला होता. ज्या मार्जिनने ऑस्ट्रेलिया संघ पराभूत झाला होता, तो विक्रम आजही अबाधित आहे.
पुढच्या सामन्यात वगळल्यानंतर ब्रॅडमन एमसीजीतील संघात परतले आणि त्यानंतर त्यांनी काय केले हे आपल्या सर्वांना माहिती आहे.
ट्रेंडिंग लेख-
-चुकिला माफी नाही! ५ अशा घटना जेव्हा पेनल्टी म्हणून विरोधी संघाला मिळाल्या ५ धावा
-आयपीएलमधील ५ अशा टीम, ज्यांनी खेळाडूंवर खर्च केलाय पाण्यासारखा पैसा
-क्रिकेटचं काय घेऊन बसलाय! या ५ क्रिकेटर्सने गाजवलेत दुसरेही खेळ






