---Advertisement---

एमएस धोनीने विराट कोहलीला दिले हे ५ मॅच विनर खेळाडू

On: गुरूवार, ऑगस्ट 20, 2020 10:22 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीने भारताला ३ महत्वाच्या आयसीसी स्पर्धांचे विजेतेपद जिंकून दिले. २००७ मधील टी-२० विश्वचषक, २०११ मध्ये वनडे विश्वचषक आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स चषक जिंकणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार ठरला.

धोनीने केवळ भारतीय संघासाठी केवळ विजेतेपद मिळवले नाही तर त्याने काही ‘मॅच विनर’ खेळाडूही दिले आहेत. त्याने खेळाडूंची कौशल्य ओळखून त्यांना पुरेशी संधी दिली.

या लेखात धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या अशा ५ खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत. जे पाचही खेळाडू सध्या भारतीय संघाचा एक महत्त्वाचा भाग बनले आहेत आणि विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतासाठीही शानदार कामगिरी करत आहेत. विराट कोहली देखील आपल्या संघात या पाच खेळाडूंचा चांगला वापर करतो.

धोनीच्या नेतृत्वाखाली पदार्पण करणारे ५ क्रिकेटपटू –

केएल राहुल (KL Rahul)

एमएस धोनीच्या नेतृत्वात केएल राहुलने वनडे, टी-२० आणि कसोटीमध्ये पदार्पण केले. धोनीच्या नेतृत्वात त्याला जास्त संधी मिळाली नाही, परंतु त्याने जितके सामने खेळले त्यामधून राहुलने बरेच काही शिकले आहे.

हा फलंदाज विराट कोहलीच्या नेतृत्वात जबरदस्त कामगिरी करत आहे. केएल राहुल या वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंड दौर्‍याच्या टी-२० मालिकेत मालिकावीरही ठरला होता. सध्या केएल राहुल देखील भारताकडून यष्टीरक्षकाची भूमिका देखील साकारत आहे. त्याला कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले तरी तो कोणत्याही क्रमांकावर चांगली कामगिरी करण्याची क्षमता बाळगतो.

हार्दिक पांड्या (Hardik Pandya)

हार्दिक पंड्या हा भारतीय संघातील महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे. तो संघाला फलंदाजीसह गोलंदाजीतही चांगले योगदान देतो, परंतु गेल्या ३-४ महिन्यांपासून भारतीय संघाला या स्टार अष्टपैलू खेळाडू शिवाय मैदानात उतरावे लागले होते. कारण हा अष्टपैलू खेळाडू पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेर होता. मात्र, तो पुन्हा एकदा भारतीय संघात परतेल.

हार्दिक पांड्यानेही धोनीच्या नेतृत्वात पदार्पण केले आणि आज विराट कोहलीच्या नेतृत्वात अष्टपैलू कामगिरी करून तो भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे.

जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah)

सध्या जसप्रीत बुमराह हा जागतिक क्रिकेटमधील अव्वल दर्जाच्या वेगवान गोलंदाजांपैकी एक मानला जातो. कोणत्याही फलंदाजाला त्यांच्या चेंडूंचा सामना करणे फार कठीण जाते. गोलंदाजीत वेग आणि त्याच्या उत्कृष्ट यॉर्कर चेंडूवर जगातील मोठ्या फलंदाजांनी चकवा खाल्ला आहे. त्याची गोलंदाजीची कृती खूप विचित्र आहे. त्याची कृती पारंपारिक नसून या गोष्टीचा त्याला जास्त फायदा होतो. यामुळेच आत्तापर्यंत जगातील सर्व फलंदाजांना त्याने आपल्या गोलंदाजीत जखडून ठेवले आहे.

जर बुमराह आज कोहलीच्या नेतृत्वात जगातील नंबर एकचा गोलंदाज असेल तर त्यात धोनीचा मोठा हात आहे. धोनीनेच त्याला पहिल्यांदा त्याच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघात खेळण्याची संधी दिली.

भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar)

भुवनेश्वर कुमार भारतीय संघाच्या स्विंगचा सुलतान म्हणूनही ओळखला जातो. दोन्ही बाजूंनी चेंडू फिरविण्याची कला भुवीकडे आहे आणि यामुळेच तो फलंदाजांवर आपला दबाव निर्माण करतो. धोनीच्या नेतृत्वात त्याने बरेच काही शिकले आहे

भुवनेश्वर कुमारची आतापर्यंतची क्रिकेट कारकीर्द जबरदस्त आहे. त्याने भारताकडून २१ कसोटी सामन्यांत ६३ बळी घेतले आहेत. त्याचबरोबर त्याने ११४ वनडे सामन्यांमध्ये १३२ बळी घेतले आहेत. त्याने खेळलेल्या ४३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ४१ बळी घेतले आहेत. त्याने आयपीएलच्या ११७ सामन्यात १३३ बळीही घेतले आहेत. त्याने देखील धोनीच्या नेतृत्वाखाली पदार्पण केले आहे.

रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)

रवींद्र जडेजा आज क्रिकेटमध्ये एक चांगला अष्टपैलू क्रिकेटपटूबरोबरच एक उत्तम क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो. त्याच्या यशात एमएस धोनीचा मोठा हात आहे. धोनीने त्याला त्याच्या नेतृत्वाखाली प्रत्येकवेळी योग्य संधी दिली. तसेच बऱ्याचदा तो त्याच्या पाठिशी उभा राहिला होता.

रवींद्र जडेजाने आतापर्यंत भारतीय संघासाठी एकूण ४९ कसोटी सामने आणि १६५ वनडे आणि ४९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. जडेजाने वनडे सामन्यांमध्ये २२९६ धावा केल्यात तर कसोटीत १८६९ धावा केल्या आहेत. तसेच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १७३ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर गोलंदाजीत त्याने कसोटी सामन्यात २१३ बळी, वनडे सामन्यात १८७ बळी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३९ बळी घेतले आहेत.

त्याने आतापर्यंत वनडे मालिकेत ५८, कसोटीत ३६ आणि टी-२० मध्ये २१ झेल घेतले आहेत. त्याच्या अष्टपैलू खेळाचा सध्या विराटला खूप फायदा होतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---