टी20 विश्वचषकात श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात खूपच कमी धावा बनल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेचा संघ केवळ 77 धावांवरच मर्यादित राहिला. प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेनं हे लक्ष्य 4 गडी गमावून गाठलं. या सामन्यात एक मोठा विक्रमही बनला. या सामन्यात एकूण 127 डॉट बॉल खेळले गेले. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात एकाच सामन्यात इतके डॉट बॉल खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. प्रथम खेळताना श्रीलंकेचा संघ 19.1 षटकांत 77 धावांवर गडगडला. मात्र दुसऱ्या डावात जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा त्यांचे फलंदाजही धावा काढण्यासाठी धडपडताना दिसले. दक्षिण आफ्रिकेनं 16.2 षटकांत 4 गडी गमावून हे लक्ष्य गाठलं.
या सामन्यात टी20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक ‘डॉट बॉल’चा विक्रम नोंदवला गेला. या बातमीद्वारे जाणून घ्या, टी20 विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक ‘डॉट बॉल’ खेळले गेलेले 5 सामने.
(5) नामिबिया विरुद्ध स्कॉटलंड – 118 डॉट बॉल
नामिबिया आणि स्कॉटलंड यांच्यातील हा सामना 2021 टी20 विश्वचषकात अबू धाबी मध्ये खेळला गेला होता. या सामन्यात एकूण 118 डॉट बॉल खेळले गेले होते. स्कॉटलंडनं प्रथम खेळताना 109 धावा केल्या होत्या आणि प्रत्युत्तरात नामिबिया संघानं 6 गड्यांच्या मोबदल्यात 115 धावा करत सामना जिंकला.
(4) नेदरलँड विरुद्ध झिम्बाब्वे – 121 डॉट बॉल
नेदरलँड्स विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील हा सामना ॲडलेडमध्ये 2022 च्या टी20 विश्वचषकादरम्यान खेळला गेला. या सामन्यात एकूण 121 डॉट बॉल खेळले गेले होते. प्रथम खेळताना झिम्बाब्वेनं 117 धावा केल्या होत्या आणि प्रत्युत्तरात नेदरलँड्सनं 120 धावा करत सामना जिंकला होता.
(3) दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत – 123 डॉट बॉल
दोन्ही संघांमधील हा सामना 2007 च्या पहिल्या टी20 विश्वचषकात खेळला गेला होता. भारतीय संघानं हा सामना जिंकला होता. या सामन्यात एकूण 123 डॉट बॉल खेळले गेले. टीम इंडियानं 153 धावा केल्या होत्या आणि प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 9 गड्यांच्या मोबदल्यात 116 धावाच करू शकला.
(2) नामिबिया विरुद्ध ओमान – 123 डॉट बॉल
हा सामना 2024 च्या टी20 विश्वचषकात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना ओमाननं 19.4 षटकांत केवळ 109 धावा केल्या होत्या. नामिबिया हे लक्ष्य सहज गाठेल असं वाटत होतं. मात्र, ओमानच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर नामिबियाला केवळ 109 धावाच करता आल्या आणि सामना बरोबरीत सुटला. यानंतर सुपर ओव्हरमध्ये नामिबियानं 21 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात ओमानचा संघ फक्त 10 धावा करू शकला. या सामन्यात एकूण 123 डॉट बॉल खेळले गेले.
(1) श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका – 127 डॉट बॉल
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ 19.1 षटकांत 77 धावा करून गडगडला. प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेनं हे लक्ष्य सहज गाठले. या सामन्यात एक मोठा विक्रम झाला. या सामन्यात एकूण 127 डॉट बॉल खेळले गेले. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात एकाच सामन्यात इतके डॉट बॉल खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! टी20 विश्वचषकाचे सामने घरबसल्या मोफत पाहता येणार
अफगाणिस्तानची टी20 विश्वचषकाला धडाकेबाज सुरुवात! पहिल्याच सामन्यात मिळवला शानदार विजय
पाकिस्तानच्या हसन अलीचं पुन्हा एकदा हसं! विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन करताना झाली दुखापत; पाहा VIDEO