२००८ पासून ते २०१९ पर्यंत आयपीएलचे एकूण १२ हंगाम पार पडले आहेत. तर, १९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) आयपीएलच्या १३व्या हंगामाची सुरुवात होणार आहे. हा हंगाम ५३ दिवस चालणार असून अंतिम सामना १० नोव्हेंबरला खेळण्यात येईल.
जगभरातील कित्येक देशातील क्रिकेटपटूंनी भरलेल्या आयपीएलमध्ये फलंदाजांसह गोलंदाजांनाही त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते. याच प्रतिभाशाली क्रिकेटपटूंनी आजवर आयपीएलच्या इतिहासात अनेक शानदार विक्रमांची नोंद केली आहे. याच विक्रमांपैकी एक विक्रम म्हणजे, सर्वाधिक वेगाने चेंडू टाकण्याचा विक्रम आणि हा विक्रम करू शकतात, फक्त वेगवान गोलंदाज. 5 Most Fastest Balls In The IPL History
तसं तर, आयपीएलमध्ये एकापेक्षा एक खतरनाक वेगवान गोलंदाज पाहायला मिळतात. पण, आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेगाने चेंडू टाकण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकाच्या वेगवान गोलंदाज डेल स्टेनच्या नावावर आहे. २०१२ साली डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळत असताना स्टेनने हा पराक्रम केला होता. त्यावेळी त्याने १५४.४० किमी दर ताशी वेगाने चेंडू टाकला होता. आजवर त्याचा हा विक्रम कोणीही मोडू शकले नाही.
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेगाने चेंडू टाकण्याऱ्या गोलंदाजांच्या यादीत स्टेननंतर नाव येते, ते दक्षिण आफ्रिकाच्या वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाचे. विशेष म्हणजे, आयपीएलच्या इतिहासात रबाडाने तब्बल ३वेळा सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा कारनामा केला आहे. गतवर्षी (२०१९) दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत असताना त्याने आयपीएल इतिहासातील दूसरा सर्वात वेगवान चेंडू टाकला होता. त्यावेळी त्याच्या चेंडूचा वेग हा १५४.२३ किमी दर ताशी इतका होता.
तर, आयपीएल २०१९मध्येच रबाडाने त्याच्या कारकिर्दीतील दूसरा आणि आयपीएल इतिहासातील तिसरा सर्वात वेगवान चेंडू टाकला होता. यावेळी त्याच्या चेंडूचा वेग १५३.९१ किमी दर ताशी इतका होता. तर, त्याच हंगामात त्याने कारकिर्दीतील तिसरा आणि आयपीएलच्या इतिहासातील ५वा सर्वात वेगवान चेंडू टाकला होता. या चेंडूचा वेग १५३.५० किमी दर ताशी इतका होता.
शिवाय, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सच्या नावावर आयपीएल इतिहासातील चौथा सर्वात वेगवान चेंडू टाकण्याच्या विक्रमाची नोंद आहे. २०१७ साली दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत असताना कमिन्सने १५३.५६ किमी दर ताशी वेगाने चेंडू टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला होता.
आयपीएल इतिहासातील आतापर्यंतचे पाच सर्वात वेगवान चेंडू
१) डेल स्टेन – १५४.४० किमी दर ताशी
२) कागिसो रबाडा – १५४.२३ किमी दर ताशी
३) कागिसो रबाडा – १५३.९१ किमी दर ताशी
४) पॅट कमिन्स – १५३.५६ किमी दर ताशी
५) कागिसो रबाडा – १५३.५० किमी दर ताशी
महत्त्वाच्या बातम्या –
सचिनने वादळी खेळी केलेल्या शारजावर आयपीएलचे किती सामने होणार, वाचा थोडक्यात
भर सामन्यात राशीद खानने आंद्रे रसेलला मारली लाथ; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
१०० टक्के कमबॅक करणार; दोन वर्षांपासून टीम इंडियाबाहेर असलेल्या खेळाडूची सिंहगर्जना
ट्रेंडिंग लेख –
आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूंची संपूर्ण यादी; या ३ भारतीयांचा आहे समावेश
एक के बाद एक सिक्स! ‘हे’ ३ भारतीय धुरंदर यंदा युएईच्या मैदानावर पाडतील षटकारांचा पाऊस
फलंदाजांनो तयार रहा, ‘हे’ ३ भारतीय गोलंदाज आयपीएलच्या एका डावात उडवू शकतात ५ फलंदाजांची दांडी