क्रिकेटच्या इतिहासात काही क्रिकेटचा वारसा लाभलेली कुटुंबे सामान्य होती. वडील आणि मुलगा किंवा भाऊ-भाऊ असे अशा जोड्यांनी क्रिकेट खेळणे ही सामान्य गोष्ट आहे. परंतु भाऊ व बहिणी या खेळात असणे इतकी सामान्य गोष्ट नाही. देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बहीण-भावांचे ५ जोड्यांबद्दल या लेखात जाणून घेऊया.
१. टेरी आणि डेनिस अल्डरमॅन – ऑस्ट्रेलिया
टेरी अल्डरमॅनला क्रिकेट खेळाडूंनी “स्माइलींग असेंसिंन” म्हणून संबोधले होते. कसोटी मालिकेत दोनवेळा ४० पेक्षा जास्त बळी घेणारा एकमेव गोलंदाज म्हणून त्याच्या नावावर विक्रम आहे. टेरी पेक्षा चार वर्षांनी छोटी असलेली त्याची बहिण डेनिस एक फलंदाज होती. तिने ७ महिला कसोटी सामन्यात सरासरी ४१.२७ ने ४५४ धावा केल्या आहेत. डेनिसने कसोटी पंच रॉस इमर्सनशी लग्न केले.
या दोघांचा अनोखा विक्रम म्हणजे, ३ फेब्रुवारी १९८५ मध्ये टेरीने वाका स्टेडियममध्ये श्रीलंकेविरूद्ध सामना खेळाला, तर डेनिसने मेलबर्नमधील इंग्लंड महिला संघाविरुद्ध सामना खेळला. त्यामुळे एकाच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारे हे पहिला भाऊ व बहीण बनले.
२. पीटर आणि सारा मॅकग्लाशन – न्यूझीलंड
सेंट्रल डिस्ट्रिक्टचे यष्टिरक्षक रॉबिन स्कोफिल्डचे नातवंड, मॅकग्लाशन भाऊ-बहीण दोघे न्यूझीलंडकडून खेळले. पीटरची कारकीर्द छोट्या स्वरूपातच मर्यादित राहिली, तर साराने भारत महिला आणि इंग्लंडच्या महिला विरुद्ध २ महिला कसोटी सामने खेळले आहेत. तसेच तिने १३४ वनडे आणि ७६ टी-२० सामन्यात न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले आहे. पीटर न्यूझीलंडकडून ४ वनडे आणि ११ टी२० सामने खेळले आहेत.
३. गॉर्डन आणि अॅनेट ड्रममंड – स्कॉटलंड
सर्वात यशस्वी स्कॉटिश क्रिकेटपटूंपैकी एक गॉर्डन ड्रममंडने आजवर ४७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्याने एक फलंदाज आणि मध्यमगती वेगवान गोलंदाज म्हणून नावलौकिक मिळविला आहे. त्याने स्कॉटलंडचे नेतृत्वही केले. स्कॉटिश क्रिकेटमध्ये त्याची बहीण अॅनेटनी ५ वेळा त्यांच्या देशाच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
४. एड, डोम, सेलेशिया आणि इसोबेल जॉयस – आयर्लंड व इंग्लंड
पाचपैकी सर्वात ज्येष्ठ गुस जॉयस २००० मध्ये आयर्लंडकडून खेळला होता परंतु दुर्दैवाने आयर्लंडला त्यावेळी आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला नव्हता. तर एड जॉयसने आयर्लंड व इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे. एड जॉयसने प्रथम इंग्लंडकडून आयर्लंडविरुद्ध पदार्पण केले आणि नंतर तो आयर्लंडमध्ये परत गेला. डोम जॉयसची कारकीर्द छोटी होती. विशेष म्हणजे त्याने आयर्लंडकडून पदार्पण केले त्याच सामन्यात एडने इंग्लंडकडून वनडे पदार्पण केले होते.
आयर्लंडच्या महिलांना कसोटीचा दर्जा मिळाल्यामुळे, कसोटीत देशाचे प्रतिनिधित्व करणारे इसोबेल ही जॉयस या कुटुंबातील एकमेव आहेत. तिने २००० मध्ये पाकिस्तानच्या महिला संघाविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळताना २१ धावात ६ गडी बाद केले होते. तिला पहिल्या डावात गोलंदाजी मिळाली नव्हती आणि ती फलंदाजीही करू शकली नाही. तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७९ वनडे आणि ५५ टी२० सामनेही खेळले आहेत. तिची जुळी बहीण सेलेशियाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५७ वनडे आणि ४३ टी२० सामने खेळले आहेत. त्यांची आई मॉरीन या २ महिला वनडे सामन्यांमध्ये स्कोअरर होत्या.
५. नॅथन आणि लिसा एस्टल – न्यूझीलंड
नॅथन एस्टल न्यूझीलंडच्या सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक होता. त्याच्या काळातील सर्वात विध्वंसक न्यूझीलंडचा फलंदाज म्हणून लौकिक होता. परंतु त्याची बहीण लिसा आंतरराष्ट्रीय पातळीवर केवळ १ वनडे सामना खेळली आहे. ती १९९३ च्या महिला विश्वचषकातील डेन्मार्क महिला विरुद्ध हा वनडे सामना खेळली होती. तर नॅथनने ८१ कसोटी, २२३ वनडे आणि ४ टी२० सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: वॉर्नरने ओळखलीय भारतीय चाहत्यांची नस? ‘पुष्पा’ सिनेमातील हुक स्टेप करत जिंकली लाखो मने