कसोटी क्रिकेट हा क्रिकेटमधील सर्वात कठिण समजला जाणारा प्रकार आहे. त्यामुळे या क्रिकेट प्रकारात नेहमीच खेळाडूंची मानसिक आणि शाररिक स्तरावर परिक्षा पाहिली जाते. तसेच क्रिकेट हा एक सांघिक खेळ असल्याने एकमेकांच्या सहकार्यानेच तो योग्य प्रकारे खेळला जातो. अशावेळी बऱ्याचदा क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाच्या विजयात दोन फलंदाजांची भागीदारी सर्वात महत्वाची ठरते. खरंतर ही भागीदारी संघाच्या विजयाचा पायाही अनेकदा रचते. आज या खास लेखात अशाच कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ५ भागीदारींबद्दल सांगणार आहोत, ज्या नेहमीच लक्षात ठेवल्या जातील.
कुमार संगकारा- माहेला जयवर्धने – भागीदारी ६२४ धावा – विरुद्ध दक्षिण आफ्रिका
२७ जुलै २००६ मध्ये श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका त्यांच्यात दोन कसोटी सामान्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळाला गेला. या कसोटी सामन्यात श्रीलंकेचे दोन फलंदाज कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांनी कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी भागीदारी रचली.
संगकारा-जयवर्धनेने तीन दिवस फलंदाजी केली आणि तिसर्या विकेटसाठी त्यांनी ६२४ धावा जोडल्या. कुमार संगकाराने २८७ आणि या सामन्याचा हिरो महेला जयवर्धनेने ३७४ धावा केल्या. या दोघांच्या जबरजस्त खेळीने श्रीलंका संघाने हा सामना डाव आणि १५३ धावांनी जिंकला.
राहुल द्रविड- व्हीव्हीएस लक्ष्मण – भागीदारी ३३५ धावा – विरुद्ध ऑस्ट्रेलिया
ईडन गार्डन येथे २००१ मध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात भारताविरुद्ध एकूण ४४५ धावा केल्या. तर भारतीय संघ पहिल्या डावात फक्त १७१ धावाच करू शकला.
त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघाला फॉलोऑन देत पुन्हा फलंदाजीला बोलावले. भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. १०० धावांच्या आताच पहिले २ फलंदाज तंबूत परतले होते. जेव्हा कर्णधार गांगुली बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या होती ४ बाद २३२ धावा. त्यावेळी पराभवाचे सावट भारतीय संघावर होते.
पण जेव्हा राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण मैदानावर फलंदाजीला आले तेव्हा त्यांनी सामन्याची दिशा बदलून टाकली. तिसर्या दिवशी लक्ष्मणने या सामन्यात १०९ धावा केल्या. त्याचवेळी राहुलची धावसंख्या ७ धावा होती. पण जेव्हा हे दोन्ही फलंदाज या सामान्याच्या चौथ्या दिवशी फलंदाजीस आले, तेव्हा मग त्यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना त्याच्यावर वर्चस्व राखू दिले नाही. या जोडीने दिवसभरात ३३५ धावांची भागीदारी केली, परंतु पाचव्या दिवशी हे दोन फलंदाज बाद झाले. त्यानंतर भारताने हा सामना १७१ धावांनी सामना जिंकला.
अँजेलो मॅथ्यूज-कुसल मेंडिस – भागीदारी २३९ धावा – विरुद्ध न्यूझीलंड
न्यूझीलंड दौर्यावर श्रीलंकेच्या संघाने पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात २८२ धावा केल्या. त्याला उत्तर देताना न्यूझीलंड संघाने फलंदाज टॉम लाथमच्या २६४ धावांच्या खेळीच्या बदल्यात ५७८ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती.
यानंतर मैदानात फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेने दुसऱ्या डावाच्या सुरुवातीलाच १३ धावांवर तीन गडी गमावले होते, त्यानंतर श्रीलंकेच्या संघाला पराभूत होण्याचा धोका होता.
पण यानंतर श्रीलंका संघाचे दोन फलंदाज अँजेलो मॅथ्यूज आणि कुसल मेंडिस यांनी दिवसभर फलंदाजी करत श्रीलंकेच्या संघाला या सामन्यात परत आणले आणि २३९ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. पाचव्या दिवशी पावसामुळे केवळ १२ षटके टाकण्यात आली. परिणामी सामना अनिर्णित राहिला.
बेन स्टोक्स-जॅक लीच – भागीदारी ७६ धावा – विरुद्ध ऑस्ट्रेलिया
२०१९ मध्ये अॅशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ अवघ्या १७९ धावांत आटोपला. तर इंग्लंडचा संघ पहिल्या डावात फक्त ६७ धावांतच ऑलआऊट झाला. पहिल्या डावाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या संघाला ११२ धावांची आघाडी मिळाली होती.
दुसर्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ २४६ धावा करुन बाद झाला. दुसर्या डावात सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला ३५९ धावांचे लक्ष्य होते. तिसर्या दिवसाच्या शेवटी इंग्लंडच्या संघाने ३ गडी गमावून १५६ धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी इंग्लंडला जेव्हा ७० पेक्षा अधिक धावांची गरज होती तेव्हा त्यांच्याकडे केवळ १ विकेट बाकी होती. पण असे असतानाही बेन स्टोक्सला जॅक लीचने शानदार साथ दिली. त्यावेळी स्टोक्स आणि लीचने १० व्या विकेटसाठी ७६ धावांची शानदार भागीदारी केली. या भागीदारीची खास गोष्ट म्हणजे जॅक लीचने संघासाठी अवघ्या १ धावा केल्या. तर त्या डावात बेन स्टोक्सने १३५ धावांची शानदार नाबाद खेळी साकारली होती.
जोस बटलर- ख्रिस वोक्स – भागीदारी १३९ धावा – विरुद्ध पाकिस्तान
इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सध्या सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळला गेला. या सामन्याच्या दुसर्या डावात पाकिस्तानने इंग्लंडला विजयासाठी २७७ धावांचे लक्ष्य दिले होते. इंग्लंडच्या संघाने हे लक्ष्य ३ गडी राखून पूर्ण केले. या विजयासह इंग्लंडच्या संघाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती.
इंग्लंडच्या विजयात ख्रिस वोक्स आणि जोस बटलरची मोठी भूमिका होती. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात सुरुवातीच्या विकेट्स लवकर पडल्या होत्या, परंतु वोक्स आणि बटलरने इंग्लंडचा डाव सावरला. या दोन्ही खेळाडूंनी कठीण प्रसंगी १३९ धावांची शानदार भागीदारी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
दुसर्या डावात बटलर ७५ धावांवर बाद झाला, परंतु वोक्स ८४ धावा करून नाबाद राहिला आणि वोक्सला सामनावीर म्हणून निवडले गेले.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमध्ये यष्टीमागे सर्वात जास्त विकेट्स घेणारे ३ यष्टीरक्षक; एमएस धोनी आहे या स्थानी
२ वेळा विश्वचषकात संधी मिळूनही दुखापतीमुळे खेळू न शकलेली हरहुन्नरी पुणेकर देविका वैद्य
पुण्याच्या अनाथालयातील पोरगी, जीने ४ वेळा ऑस्ट्रेलियाला केले विश्वविजेते
महत्त्वाच्या बातम्या-
कोहलीला लॉर्ड्सवर क्लिन बोल्ड करण्याची स्वप्ने पाहणारी कोण आहे ही महिला?
विराट कोहलीला राजस्थान रॉयल्समध्ये घेऊ, पण फक्त एका अटीवर
भारतीय क्रिकेटरच्या गर्लफ्रेंडचा पीपीई किटमध्ये डान्स, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल