एखादा खेळाडू त्यांचा क्रिकेटमधील खेळ आणि मैदानातील आचरण, वावर यासाठी ओळखले जातो. काही खेळाडू मोठे मस्तीखोर असतात तर काही खेळाडू मैदानात शांत असतात. वेग-वेगळ्या स्वभावाचे खेळाडू मैदानात दिसतात. मैदानावर खेळाडू बऱ्याचदा मज्जा-मस्ती करताना दिसतात. सामन्याची परिस्थिती काहीही असो, हे खेळाडू मस्तीमध्येच असतात, पण क्रिकेट विश्वात असे काही खेळाडू आले आहेत, ते मैदानात खूप शांत राहणे पसंत करतात.
या लेखात क्रिकेटमधल्या त्या ५ खेळाडूंबद्दल सांगणार आहोत जे मैदानात नेहमीच गंभीर दिसतात किंवा त्यांना हासताना चाहत्यांनी खूप कमी वेळा पाहिले आहे.
हे ५ खेळाडू मैदानात हसताना फारच क्वचित पाहिले गेले-
१. गौतम गंभीर (Gautam Gambhir)
भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने बरीच वर्षे संघाची सलामी फलंदाजीची कमान सांभाळली. गौतम गंभीर हा एक जबरदस्त फलंदाज होता, ज्याला भारतासाठी मॅच विनर म्हणूनही ओळखले जाते. गौतम गंभीर भारतासाठी २००७ टी-२० विश्वचषक आणि २०११ च्या वनडे विश्वचषकाचा नायक ठरला.
गौतम गंभीरने यशस्वी सलामीवीर म्हणून आपले नाव प्रस्थापित केले. पण गौतम गंभीर त्याच्या नावाप्रमाणेच मैदानावर गंभीर दिसायचा. त्याला मैदानात चाहत्यांनी फार क्वचित हासताना पाहिले आहे.
२. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)
भारतीय क्रिकेट संघातील चेतेश्वर पुजारा सध्या कसोटी स्वरूपात आपल्या खेळीने सर्वांना प्रभावित करत आहे. गेल्या काही वर्षांपासून चेतेश्वर पुजारा हा भारतीय कसोटी संघाचा सदस्य आहे आणि त्याने आपल्या कामगिरीने खास ठसा उमटविला आहे. कसोटी सामन्यात त्याने त्याच्या फलंदाजीने अनेकदा संघाला सावरलं आहे, त्याला ‘संकटमोचक’ म्हणूनही संबोधले जाऊ लागले.
चेतेश्वर पुजारा जसा स्वभावाने खूप शांत आहे तसा मैदानावरही खूप शांत असतो. पुजारा मैदानावर फारच क्वचित हसताना दिसला आहे.
३. राहुल द्रविड (Rahul Dravid)
क्रिकेटला जेंटलमॅन गेम म्हणतात, म्हणजे हा सज्जनांचा खेळ मानला जातो. या जेंटलमॅन खेळात जर जेंटलमॅन खेळाडूंपैकी एखादे नाव निवडायचे असेल, तर बऱ्याच जणांची निवड भारताचा महान फलंदाज ‘द वॉल’ राहुल द्रविडची असेल. राहुल द्रविड हा क्रिकेट जगातील एक यशस्वी खेळाडू मानला जातो, जो स्वभावाने खूप शांत आहे.
मैदानात शांत स्वभावामुळे तो कोणत्याही प्रकारचा वादात तो कधी दिसला नाही. राहुल द्रविड जितका महान फलंदाज आहे त्याच्याइतकेच तो शांत व्यक्ती आहे आणि क्रिकेट जगात त्याचे उदाहरण दिले जाते.
४. हाशिम आमला (Hashim Amla)
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम आमलाने त्याच्या कामगिरीने प्रभावित केले आहे. हाशिम आमलाने गेल्या वर्षी त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला बाय-बाय केले. परंतु ज्या प्रकारे त्याने सर्व प्रसंगी महत्त्वपूर्ण फलंदाजी केली आहे, त्याचे नाव महान फलंदाजांच्या यादीत घेतले गेले आहे.
वनडे क्रिकेट आणि कसोटी दोन्ही क्रिकेटमध्ये हशिम अमलाच्या नावावर अनेक विक्रम आहेत. आमला फलंदाजी करताना जसा शांत राहायचा तसाच त्याच्या तसाच शांत त्याचा स्वभावही आहे. आमला मैदानात नेहमी शांत दिसला. तो सहसा कधीही हसताना दिसला नाही.
५. शिवनारायण चंद्रपाल (Shivnarayan Chandrapal)
वेस्ट इंडीज क्रिकेट संघात एका पेक्षा एक अनुभवी फलंदाज होऊन गेले. वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा याच्या सोबत शिवनारायण चंद्रपाल फलंदाजी करायचा. आपल्या फलंदाजीमुळे त्याने कसोटी आणि वनडे दोन्ही स्वरूपात मोठे नाव कमावले.
चंद्रपालने वेस्ट इंडीज क्रिकेट संघात अनेक वर्षे योगदान दिले आहे. त्याने कसोटी क्रिकेटमधील १५० सामन्यांचा टप्पादेखील पार केला.
त्याने फलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी केली, तसेच तो त्याच्या शांत स्वभावासाठी देखिल परिचित होता. चंद्रपाल अतिशय शांत स्वभावाचा होता, जो मैदानात क्वचितच हसताना दिसला असेल.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: यंदा आयपीएलमध्ये पदार्पण करू शकतात हे ३ परदेशी खेळाडू…
टी२० विश्वचषक जिंकवलेले मात्र आयपीएलमध्ये अपयशी ठरलेले ५ क्रिकेटपटू
आयपीएलमधील कामगिरीच्या आधारे या ४ युवा खेळाडूंना टीम इंडियात मिळू शकते एंट्री
महत्त्वाच्या बातम्या –
विलियम्सनला खास बर्थडे गिफ्ट देत ‘या’ खेळाडूने केली भारतीय चाहत्याची बोलती बंद
एकेकाळी हार्दिक पंड्यामुळे चूक नसतानाही बॅन झालेला क्रिकेटर म्हणतोय, प्लीज तुझ्या मुलाला भविष्यात…