आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीची (ICC Champions Trophy 2025) सर्व क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. चॅम्पियन ट्राॅफीची सुरूवात (19 फेब्रुवारी) पासून होणार आहे. या मेगा स्पर्धेत 8 संघ ट्रॉफी जिंकण्याच्या शर्यतीत असतील. सर्व संघांनी या मेगा स्पर्धेसाठी आपले अंतिम संघ जाहीर केले आहेत. तत्पूर्वी अनेक संघ त्यांच्या काही प्रमुख खेळाडूंच्या खराब फॉर्मबद्दल चिंतेत आहेत, कारण जर त्यांची कामगिरी चांगली झाली नाही, तर संघाचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंग होऊ शकते.
या बातमीद्वारे आपण त्या 5 दिग्गज खेळाडूंबद्दल जाणून घेऊ, जे खराब फॉर्ममुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये स्वत:च्या संघासाठी खलनायक बनू शकतात.
1) बाबर आझम- पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) त्याच्या खराब फॉर्मशी झगडत आहे, ज्यामुळे त्याला सतत टार्गेट केले जात आहे. सॅम अयुबच्या (Saim Ayub) दुखापतीनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बाबर आझम सलामीवीराची भूमिका बजावेल. जर या मोठ्या स्पर्धेतही त्याची बॅट शांत राहिली, तर पाकिस्तान संघ कमकुवत दिसण्याची शक्यता आहे.
2) मोहम्मद शमी- भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) नुकतेच बऱ्याच काळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. पण त्याचे पुनरागमन निराशाजनक राहिले. इंग्लंडविरुद्धच्या पांढऱ्या चेंडूच्या मालिकेत शमीने 4 सामने खेळले. दरम्यान त्याने केवळ 5 विकेट्स घेतल्या. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बुमराहसारख्या मोठ्या गोलंदाजाच्या अनुपस्थितीत, शमीची जबाबदारी आणखी वाढेल.
3) टॉम लॅथम- न्यूझीलंडसाठी सर्वात मोठी चिंता म्हणजे प्रमुख फलंदाज टॉम लॅथमचा (Tom Latham) फॉर्म. लॅथमची बॅट बऱ्याच काळापासून शांत आहे. अलिकडेच, पाकिस्तानमध्ये झालेल्या तिरंगी मालिकेत तो सलग 2 सामन्यात शून्यावर बाद झाला होता.
न्यूझीलंड संघ लॅथमवर खूप अवलंबून आहे, त्यामुळे त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोणत्याही परिस्थितीत धावा कराव्या लागतील.
4) जोफ्रा आर्चर- उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करताना दिसेल. भारताविरुद्ध अलिकडच्या पांढऱ्या चेंडूच्या मालिकेत आर्चरची कामगिरी सरासरीपेक्षा कमी होती. आर्चर ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो, त्या पद्धतीने गोलंदाजी करू शकला नाही. त्याची अशी कामगिरी सुरूच राहिली, तर इंग्लंडला मोठा फटका सहन करावा लागेल.
5) राशिद खान- या यादीत पाचव्या स्थानी अफगाणिस्तानचा स्टार अष्टपैलू राशिद खानचे (Rashid Khan) नाव समाविष्ट आहे, जो संघातील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसला नाही. तो फलंदाजी आणि चेंडू दोन्हीमध्ये प्रभावी कामगिरी करू शकला नाही. तो फॉर्ममध्ये नसल्याने संघाचा गोलंदाजी क्रम आणि फलंदाजी दोन्ही कमकुवत दिसेल.
महत्त्वाच्या बातम्या-
RCBला मोठा धक्का..! स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर, ‘या’ खेळाडूला संधी
CT2025; दुबईत टीम इंडियाची कामगिरी कशी? पाहा आकडेवारी काय सांगते?
‘हे’ 2 दिग्गज संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर? नेमकं कारण काय?






