मागील ३ आयपीएल हंगामात दिल्ली संघाने चांगली कामगिरी केली आहे. सलग हंगामामध्ये संघाने शानदार कामगिरी केली आहे. काही हंगामांमध्ये संघ प्ले- ऑफमध्ये सुद्धा पोहोचला आहे. २०२०च्या हंगामात दिल्ली संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. आयपीएलच्या १५व्या हंगामात दिल्लीने अनेक नवीन खेळाडू विकत घेतले आहेत. रिषभ पंत संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. यावर्षी दिल्ली संघ आयपीएलची ट्राॅफी जिंकण्याच्या दृष्टीने मैदानात उतरणार आहे.
१. रिषभ पंत
रिषभ पंतसारखा (Rishabh Pant) धडाकेबाज यष्टीरक्षक-फलंदाज दिल्ली संघाकडे आहे. तो उत्तम फलंदाज आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाला या यष्टीरक्षकावर खूप विश्वास आहे. तो खूप जलदपणे सामना पलटवू शकतो. त्याने आयपीएलच्या ८४ सामन्यांत २४९८ धावा केल्या आहेत. यावर्षी तो फलंदाजीबरोबरच संघाचे नेतृत्व करताना देखील सुद्धा दिसेल. यावर्षी तो कोणत्या क्रमांकावर खेळताना दिसेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
२. पृथ्वी शाॅ
पृथ्वी शाॅला (Prithvi Shaw) भविष्यातील स्टार म्हणून ओळखले जाते. तो एक आक्रमक फलंदाज आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्स संघासाठी ५५ सामन्यांत १३०५ धावा केल्या आहेत. तो पहिल्यापासून दिल्ली संघासाठीच खेळताना दिसत आहे. तो संघासाठी डावाची सुरुवात करताना दिसेल. शाॅ चेंडूंवर त्रिफळाचीत होताना दिसत आहे, त्याला सुधारण्यासाठी सचिन तेंडुलकर आणि मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगने सल्ला दिला होता. तो जेव्हा फलंदाजी करतो, तेव्हा त्याला थांबवणे कठीण होते.
३. डेविड वाॅर्नर
इंडियन प्रीमियर लीगमधील स्टार फलंदाज म्हणून वाॅर्नरची (David Warner) ओळख आहे. वाॅर्नर मागील काळात हैदराबाद संघाचा कर्णघार होता, परंतु काही वादांमुळे त्याला संघातून काढले गेले. आता ८ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज दिल्ली संघातून खेळताना दिसणार आहे. दिल्ली संघाने त्याला १५ व्या हंगामात ६.२५ कोटींना विकत घेतले आहे. वाॅर्नर हा ऑरेंज कॅपचा दावेदार होता. त्याच्या नेतृत्वाखाली हैदराबाद संघाने २०१६मध्ये आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते. मागील टी२० विश्वचषकात त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. तो ६ एप्रिलपर्यंत संघाचा भाग नसणार आहे, कारण सध्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये एकदिवसीय आणि टी२० मालिका परा पडणार आहेत. त्यामुळे तो ५ एप्रिलपर्यंत सर्व सामने खेळून दिल्ली संघासोबत जोडला जाईल.
४. मिशेल मार्श
मिशल मार्श (Mitchell Marsh) हा दिल्ली संघात अष्टपैलू म्हणून दिसणार आहे. हा ऑस्ट्रेलियन खेळाडू गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीत उत्तम कामगिरी करून सामन्याला वेगळे वळण देऊ शकतो. त्याने ऑस्ट्रेलियाला टी२० विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्याला फलंदाजी क्रमात शीर्ष क्रमावर पाठवले त्याचा फायदा संघाला झाला. मार्श सध्या ऍरॉन फिंचच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. ऑस्ट्रेलिया संघ पाकिस्तानविरुद्ध सध्या कसोटी मालिका खेळत आहे. तो ६ एप्रिलनंतर भारतात येणार आहे. त्यानंतर दिल्ली संघासोबत खेळताना दिसणार आहे.
५. शार्दुल ठाकूर
शार्दुल ठाकूरला दिल्ली संघाने १०.७५ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. यापूर्वी तो सीएसके संघाचा भाग होता. लाॅर्ड ठाकूरच्या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू चेंडू स्विंग करण्यामध्ये पटाईत आहे. गोलंदाजीसोबत तो फलंदाजी सुद्धा करतो. शार्दुल ठाकूर अष्टपैलू कामगिरी करू शकतो. त्याने आयपीएलमध्ये ६१ सामन्यांत १२६० चेंडूत ६७ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये रैनाला मिळाली नाही संधी, पण मालदीव सरकारने दिलाय मोठा पुरस्कार
आयपीएलमधील रोमांच होणार कमी? सर्वात यशस्वी ५ गोलंदाजांपैकी हे ४ जणं स्पर्धेतून बाहेर
IPL2022| धोनीच्या चेन्नईची चिंता वाढली, ‘या’ प्रमुख अष्टपैलू खेळाडूला अद्याप मिळाला नाही व्हिसा