-कुलदीप चव्हाण
आयपीएलचा १३ वा हंगाम येत्या १९ सप्टेंबरपासून यूएईत सुरु होणार आहे. नेहमीप्रमाणे या हंगामातही धुरंदर फलंदाजी करणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आयपीएल हा टी२० क्रिकेट प्रकार असल्यामुळे यामध्ये जलद खेळी करण्याला महत्त्व असते. अनेक खेळाडू यामध्ये आपल्या शानदार फलंदाजीने सर्वाधिक धावा करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि आयपीएलमधील ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ही कॅप मिळते) आपल्या नावे करण्याचा प्रयत्न करतात.
या लेखात आपण त्या ५ खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, जे आयपीएल २०२० मध्ये ऑरेंज कॅप मिळविण्याचे दावेदार असतील.
१. विराट कोहली
आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली कोरोना महामारीच्या विश्रांती नंतर पुन्हा एकदा बॅटने धुमाकूळ करण्यास सज्ज झाला आहे. विराटने २०१६ मध्ये विलक्षणीय अशी फलंदाजी करून ऑरेंज कॅप जिंकली होती. त्याने १६ सामन्यांमध्ये ९७३ धावांचा डोंगर उभा केला होता तसेच विराटने आयपीलमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने १७७ सामन्यांमध्ये ५४१२ धावा केल्या आहेत. विराट आणखी एकदा ऑरेंज कॅप मिळविण्याचा दावेदार ठरू शकतो.
२. डेव्हिड वॉर्नर
सनरायझर्स हैद्राबाद संघाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर हा त्याच्या तुफानी फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्याने २०१५ आणि २०१७ या हंगामात ऑरेंज कॅप जिंकली आहे. त्याने आयपीलमध्ये १२६ सामन्यांमध्ये ४७०६ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२० च्या ऑरेंज कॅपसाठी डेविड वॉर्नर हा एक प्रमुख दावेदार आहे
३. एबी डिविलियर्स
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्स २ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्त झाला आहे. त्याने आयपीएल ऑरेंज कॅप कधीही जिंकली नाही. परंतु त्याने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघासाठी खूप योगदान दिले आहे. १५४ आयपीएल सामन्यांमध्ये ४३९५ धावा केल्या आहेत. डिविलियर्स आयपीलमधून निवृत्त होण्याअगोदर एकदा तरी ऑरेंज कॅप जिंकण्यासाठी आतूर असेल.
४. रोहित शर्मा
रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलचे सर्वाधिक ४ वेळा विजेतेपद जिंकले आहे. त्याने १८८ सामन्यांमध्ये ४८९८ धावा केल्या आहेत. रोहित हा उत्तुंग षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. मुंबई इंडियन्स संघाला या हंगामात त्याच्याकडून खूप अपेक्षा असतील. सोबतच तो सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅपही आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल.
५. केएल राहुल
किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार केएल राहुलचा टी२० क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाजांमध्ये समावेश होतो. त्याने ६७ आयपील सामन्यांमध्ये १९७७ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने १ शतकही ठोकले आहे. तो आयपीएल २०२० मध्ये ऑरेंज कॅप जिंकण्याचा प्रमुख दावेदार आहे.
ट्रेंडिंग लेख-
-जायचे होते सैन्यात पण गाजवतोय क्रिकेटचे मैदान
-विराट-डिविलियर्सच्या खांद्याला खांदा लावत हे २ धुरंदर यंदा आरसीबीला बनवणार विजेता
-घरात टीव्ही नसल्याने गल्लीत पान टपरीवर क्रिकेट पाहणारा मुलगा बनला टीम इंडियाचा कर्णधार..
महत्त्वाच्या बातम्या-
-हिटमॅनला गोलंदाजीचे धडे देताना पाहिलंय का? पाहा व्हिडिओ
-लाडकी लेक थांबलीय वडील धोनीचा स्केच घेऊन, सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल
-खुशखबर: कोरोनावर मात करून ‘हा’ खेळाडू झाला सीएसकेच्या ताफ्यात दाखल