किंग्स इलेव्हन पंजाबने आयपीएल2020मधील ‘प्ले ऑफ’ च्या घोडदौडीत अडखळत झालेल्या सुरुवातीनंतर चांगल पुनरागमन केलं आहे. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात किंग्स इलेव्हन पंजाबने अतिशय वाईट सुरूवात केली होती. पण त्यानंतर पंजाबने जबरदस्त पुनरागमन करीत ‘प्ले ऑफ’ च्या शर्यतीत स्वतःला पुढे ठेवण्याचे काम केले आहे.
आयपीएल जिंकण्यासाठी प्रत्येक संघ प्रत्येक हंगामात स्वतःचा जीव झोकून देत असतो. आणि यासाठी प्रत्येकाचे अपार कष्ट – मेहनत असते. पंजाबच्या संघाने अजून एकदाही आयपीएल जिंकलेली नाही. त्यामुळे या ट्रॉफीसाठी त्यांचा हा 13वा प्रयत्न आहे, असे म्हणता येईल. या हंगामात त्यांचा संघ दुसऱ्या टप्प्यात आधिक संतुलित बनवून ठेवले आहे. पण असे असले तरी या संघात असे काही प्रतिभाशाली युवा खेळाडू आहेत, ज्यांना अजून या हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. या खेळाडूंविषयी या लेखात आपण जाणून घेऊ.
हंगामात एकही संधी न मिळालेले पंजाबचे 5 खेळाडू
1. दर्शन नळकांडे
आयपीएल 2019 साठी पंजाबच्या संघाने दर्शन नळकांडेला 30 लाखांच्या किंमतीत आपल्या संघात विकत घेतले. मागच्या हंगामात त्याला एकही सामना खेळण्याची संधी पंजाबने त्याला दिली नव्हती. त्याचबरोबर याही हंगामात त्याला अजूनही संघाने खेळण्याची संधी दिलेली नाही. दर्शन हा विदर्भासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत असून तो एक अष्टपैलू खेळाडू आहे.
2. जगदीश सुचित
आयपीएल 2015 च्या हंगामात मुंबई इंडियन्स संघातुन जगदीश सुचितला पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. याच हंगामात त्याला 13 सामने खेळण्याची सुवर्ण संधी मुंबई संघाने दिली होती. यानंतर पुढच्या हंगामात त्याला एकाच सामन्यात मुंबईने जागा दिली. 2019 मध्येही दिल्ली कॅपिटल्सने त्याला एकाच सामन्यात खेळण्यास संधी दिली होती. त्यानंतर 2020 च्या हंगामापूर्वी पंजाबने त्याला संघात समाविष्ट केले. पंजाब संघात जागा मिळाल्यानंतरही त्याला अजून एकही सामना खेळण्याची संधी पंजाबकडून मिळालेली नाही.
3. हार्डस विलजोएन
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज हार्डस विलजोएनला पंजाबच्या संघाने 2019 हंगामासाठी च्या लिलावात संघात समाविष्ट केले. त्याला संघाने 6 सामन्यांत खेळवले मात्र त्याने विशेष असे प्रदर्शन दाखवले नाही. 2020 च्या हंगामात त्याला संघाने पुन्हा रिटेन केले मात्र त्याला अद्याप एकही सामना खेळण्याची संधी दिलेली नाही.
4. ईशान पोरेल
बंगालचा युवा वेगवान गोलंदाज ईशान पोरेलला पंजाबच्या संघाने 2020 च्या हंगामासाठी संघात समाविष्ट केले होते. प्रशिक्षक अनिल कुंबले यांनी पोरेलची तुलना मोहम्मद शमी सोबत देखील केली होती. मात्र लिलावात घेतल्या नंतर त्याला एकाही सामन्यात संघाने संधी दिलेली नाही. विशेष म्हणजे बीसीसीआयने नोव्हेंबर 2020 मध्ये सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची राखीव 4 गोलंदाजांमध्ये निवडही केली आहे.
5. तजिंदर सिंग
तजिंदर सिंगला आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन संघांनी लिलावात विकत घेतले होते. 2018 साली तो मुंबईच्या संघाचा भाग होता. त्यानंतर 2020 साली त्याला पंजाबच्या संघाने संघात समाविष्ट केले. परंतु अद्याप त्याला ना मुंबईने संधी दिली ना पंजाबने.
ट्रेंडिंग लेख-
राजस्थानच्या ‘या’ ५ धुरंधरांची दमदार खेळी पडली पथ्यावर; ७ विकेट्सने पंजाब चितपट
IPL 2020: या ५ कारणांमुळे पंजाबचा विजयी रथ रोखण्यात राजस्थानला आले यश
सीके नायडूंनी ८८ वर्षांपूर्वी मारला होता ‘तो’ ऐतिहासिक षटकार
महत्त्वाच्या बातम्या-
खुशखबर! ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहितला मिळणार संधी? ‘या’ दिवशी बीसीसीआय करणार फिटनेस टेस्ट
DC प्ले ऑफमध्ये जाणार? श्रीलंकेच्या ‘या’ दिग्गजाला वाटतेय काळजी; व्यक्त केली शंका
ज्या गोष्टीसाठी कॅप्टन्सी सोडली त्यातच फ्लॉप, माजी खेळाडूची दिनेश कार्तिकवर खोचक टीका