---Advertisement---

यांना मानलंच पाहिजे! आख्खी कारकीर्द संपली पण गडी शून्यावर बाद झाले नाहीत

On: शुक्रवार, डिसेंबर 17, 2021 6:07 PM
kepller-wessels
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठमोठे विक्रम प्रस्थापित झाले आहेत. कसोटी क्रिकेट, टी२० क्रिकेट आणि वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या बाबतीतही अनेक विक्रम रचले गेले आहेत. तसेच वनडे क्रिकेटमध्येही अनेक असे फलंदाज होऊन गेले, ज्यांनी धावांचा पाऊस पडला आहे. तर असेही काही खेळाडू होते, ज्यांनी सर्वाधिक वेळेस शून्यावर बाद होण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. ज्यामध्ये पाकिस्तानचे माजी फलंदाज इंजमाम उल – हक यांचे नाव सर्वोच्च स्थानी आहे. परंतु असेही काही फलंदाज आहेत. जे आपल्या वनडे कारकिर्दीत एकही वेळेस शून्यावर बाद झाले नव्हते. त्याच फलंदाजांबद्दल अधिक माहिती आपण या व्हिडिओ द्वारे जाणून घेणार आहोत.

१) जॅक्स रूडोल्फ (दक्षिण आफ्रिका) – दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॅक्स रूडोल्फ याने आपल्या कारकीर्दीत एकूण ४५ सामने खेळले होते. ज्यामध्ये त्याने ३९ डावात ११७४ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ७ अर्धशतके झळकावलेई होती. तर ८१ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. आपल्या कारकीर्दीत तो एकही वेळेस शून्यावर बाद झाला नव्हता.

२) पिटर कर्स्टन (दक्षिण आफ्रिका) – या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू पिटर कर्स्टन. १९९१ पासून ते १९९४ पर्यंत त्याने दक्षिण आफ्रिका संघाचे प्रतिनिधित्व केले. यादरम्यान त्याने ४० सामन्यातील ४० डावात १२९३ धावा केल्या होत्या. तर ९ अर्धशतक झळकावले होते. आपल्या कारकीर्दीत तो एकही वेळेस शून्यावर बाद झाला नव्हता.

३)यशपाल शर्मा (भारत) – या यादीत दिग्गज भारतीय फलंदाज यशपाल शर्मांचा देखील समावेश आहे. त्यांनी १९७८ पासून ते १९८५ पर्यंत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. यादरम्यान त्यांनी ४२ सामन्यातील ४० डावात ८८३ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये ८९ धावा ही त्यांची सर्वोत्तम खेळी होती. त्यांनी आपल्या कारकीर्दीत एकूण ४ अर्धशतके झळकावली होती. यादरम्यान ते एकही वेळेस शून्यावर बाद झाले नव्हते.

४) मॅथ्यू क्रॉस (स्कॉटलॅंड) – मॅथ्यू क्रॉसने स्कॉटलॅंड संघासाठी एकूण ५४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ५० डावात ११५० धावा केल्या. यादरम्यान त्याने २ शतक आणि ५ अर्धशतके झळकावली होतेई. तसेच तो आपल्या कारकीर्दीत एकही वेळेस शून्यावर बाद झाला नव्हता.

५) केपलर वेसल्स ( ऑस्ट्रेलिया/ दक्षिण आफ्रिका) – या यादीत पाचव्या स्थानी आहे केपलर वेसल्स. ज्याने एक नव्हे तर दोन बलाढ्य संघांचे प्रतिनिधित्व केले. त्याने आपल्या कारकीर्दीत एकूण १०९ सामने खेळले. ज्यामधील १०५ डावात त्याने ३३६७ धावा केल्या. यादरम्यान त्याने १ शतक आणि २६ अर्धशतके झळकावली होती.

महत्वाच्या बातम्या –

पठ्ठ्याने चक्क पंचांनाच दिली जीवे मारण्याची धमकी; आता भोगतोय परिणाम

बेंगलोरची पराभवाची मालिका खंडित; एटीकेविरूद्ध मानावी लागली ३-३ अशी बरोबरी

Video: ‘टीम इंडिया’ पोहोचली दक्षिण आफ्रिकेत; श्रेयसने धरला ताल तर विराट…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---