आयपीएल २०२२मधील अंतिम सामना रविवारी (दि. २९ मे) गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. हा सामना गुजरातने ७ विकेट्सने आपल्या खिशात घातला. यासह राजस्थानने पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी उंचावली. या सामन्यात राजस्थानचा फलंदाज जोस बटलर याने अर्धशतक झळकावत आयपीएल २०२२मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान पटकावला.
#आयपीएल २०२२मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
१. जोस बटलर
राजस्थान रॉयल्स संघाचा सलामीवीर फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) याने यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला दिली जाणारी कॅप) पटकावली. त्याने १७ सामने खेळताना ५७.५३च्या सरासरीने ८६३ धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने ४ शतके आणि ४ अर्धशतकेही झळकावली आहेत.
२. केएल राहुल
आयपीएल २०२२मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul Rahul) याने नाद खुळा फलंदाजी केली. तो आयपीएल २०२२मध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. त्याने आपल्या संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवून दिले. या हंगामात त्याने १५ सामन्यात फलंदाजी करताना ५१.३३च्या सरासरीने ६१६ धावा चोपल्या. या धावा करताना त्याने २ शतके आणि ४ अर्धशतकेही झळकावली.
३. क्विंटन डी कॉक
केएल राहुल पाठोपाठ तिसऱ्या स्थानी लखनऊ सुपर जायंट्स संघाचाच सलामीवीर फलंदाज क्विंटन डी कॉक (Quinton De Kock) याचा क्रमांक लागतो. डी कॉक याने या हंगामात १५ सामने खेळताना ३६.२९च्या सरासरीने ५०८ धावा चोपल्या. विशेष म्हणजे, यादरम्यान त्याने नाबाद १४० धावाही चोपल्या. ही या हंगामातील कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च वैयक्तिक खेळी होती. डी कॉकने ५०८ धावा चोपताना १ शतक आणि ३ अर्धशतकेही मारली.
४. हार्दिक पंड्या
गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने या हंगामात आपल्या संघाला सर्वप्रथम अंतिम सामन्यात पोहोचवण्याची मोलाची कामगिरी केली. त्याने या हंगामात नेतृत्व, क्षेत्ररक्षण, फलंदाजी आणि गोलंदाजी या सर्व विभागात चांगली कामगिरी केली. त्याने फलंदाजी करताना १५ सामन्यात ४४.२७च्या सरासरीने ४८७ धावा चोपल्या आहेत. या धावा करताना त्याने ४ अर्धशतकेही झळकावली आहेत.
५. शुबमन गिल
गुजरात टायटन्स संघाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill) याने या हंगामातील अंतिम सामन्यात षटकार मारत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तो या हंगामात गुजरातसाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. त्याने १६ सामन्यात फलंदाजी करताना ३४.५०च्या सरासरीने ४८३ धावा चोपल्या. त्याने या धावा करताना ४ अर्धशतकेही झळकावली. विशेष म्हणजे, या हंगामातील त्याची ९६ धावा ही सर्वोत्तम खेळी ठरली.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
जिंकलस रे भावा! बटलरने गाजवला IPL 2022चा हंगाम, सर्वाधिक धावा करत मोडला वॉर्नरचा भलामोठा विक्रम
फक्त पंड्या अन् ‘या’ भारतीय कर्णधाराला जमलाय IPL Finalमध्ये विकेट घेण्याची किमया, वाचा सविस्तर
कानामागून आला आणि तिखट झाला; एकच चेंडू फेकला आणि उमरान मलिकचं बक्षीस घेऊन गेला