मँचेस्टर येथे इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात कालपासून(१६ जुलै) दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने दिडशतकी खेळी केली आहे. याबरोबरच त्याने एक खास विक्रमही केला आहे.
स्टोक्सचे हे १० कसोटी शतक आहे. तसेच त्याने आत्तापर्यंत कसोटीमध्ये १५३ विकेट्स घेतलेल्या आहेत. त्यामुळे तो आता कसोटीमध्ये १० किंवा त्यापेक्षा अधिक शतके आणि १५० किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी विकेट्स घेणारा केवळ ५ वा अष्टपैलू क्रिकेटपटू ठरला आहे. तर दुसरा इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू ठरला आहे.
याआधी इंग्लंडकडून अशी कामगिरी इयान बॉथम यांनी केली आहे. त्यांनी १४ कसोटी शतके केली आहेत, तर ३८३ कसोटी विकेट्स घेतल्या आहेत.
याव्यतिरिक्त गॅरी सोबर्स, रवी शास्त्री आणि जॅक कॅलिस यांनी देखील असा पराक्रम केला आहे. सोबर्स यांनी कसोटीत २६ शतके आणि २३५ विकेट्स, रवी शास्त्री यांनी ११ शतके आणि १५१ विकेट्स आणि जॅक कॅलिसने ४५ शतके आणि २९२ विकेट्स घेतल्या आहेत.
सध्या मँचेस्टरमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ३५० धावांचा टप्पा पार केला आहे. त्यांच्याकडून स्टोक्स व्यतिरिक्त डॉमनिक सिब्लेनेही पहिल्या डावात शतकी खेळी केली आहे. त्याने १२० धावा केल्या. तसेच चौथ्या विकेटसाठी स्टोक्स आणि सिब्लेने २६० धावांची भागीदारी केली आहे.
कसोटीमध्ये १०+ शतके आणि १५०+ विकेट्स घेणारे अष्टपैलू क्रिकेटपटू (10 Test hundreds & 150 Test Wickets) –
२६ शतके आणि २३५ विकेट्स – गॅरी सोबर्स (वेस्ट इंडिज)
१४ शतके आणि ३८३ विकेट्स – इयान बॉथम (इंग्लंड)
११ शतके आणि १५१ विकेट्स – रवी शास्त्री (भारत)
४५ शतके आणि २९२ विकेट्स – जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)
१० शतके आणि १५३ विकेट्स – बेन स्टोक्स (इंग्लंड)
ट्रेंडिंग घडामोडी –
५६ वर्षांत जे घडलं नाही, आज ते स्टोक्सने भर लाॅकडाऊनमध्ये घडवलं
कोरोनाच्या भितीच्या वातावरणात आणखी एक धक्कायदाय वृत्त, बंगाल क्रिकेटमध्ये…
असा व्यक्ती, ज्यामुळे भारतीय क्रिकेट बोर्ड रातोरात मालामाल झाले