आयपीएल २०२१ मधील दुसरा टप्पा युएईत पार पडला. यामधील अंतिम सामना शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झाला. हा सामना सीएसकेने २७ धावांनी आपल्या खिशात घातला. यासह सीएसकेने आयपीएलची चौथी ट्रॉफीही आपल्या नावावर केली. याबरोबरच यंदाच्या आयपीएलचा पर्पल कॅप विजेता खेळाडू मिळाला आहे. आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप मिळते.
यंदाच्या आयपीएल हंगामातील पर्पल कॅपचा मानकरी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल ठरला आहे. या लेखातून आपण आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या ५ गोलंदाजांविषयी जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया… (5 Players Who takes Most wickets In 2021)
#आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –
१. हर्षल पटेल- ३२ विकेट्स, १५ सामने (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर)-
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने आयपीएल २०२१ चा हंगाम अक्षरश: गाजवला आहे. त्याने आपल्या भेदक गोलंदाजीने आपल्या संघाला महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवून दिल्या आहेत. त्याने या हंगामात १५ सामने खेळताना १४.३४ च्या सरासरीने तब्बल ३२ विकेट्स घेतल्या. या हंगामातील त्याची २७ धावा देत ५ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
२. आवेश खान- २४ विकेट्स, १६ सामने (दिल्ली कॅपिटल्स)-
दिल्ली कॅपिटल्स संघाचा वेगवान गोलंदाज आवेश खाननेही या हंगामात आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवला आहे. तो आयपीएल २०२१मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याने १६ सामने खेळताना १८.७५ च्या सरासरीने तब्बल २४ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. या हंगामातील त्याची १३ धावा देत ३ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
३. जसप्रीत बुमराह- २१ विकेट्स, १४ सामने (मुंबई इंडियन्स)-
बलाढ्य मुंबई इंडियन्स संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्यानेही महत्त्वाच्या सामन्यांमध्ये आपल्या संघाला मौल्यवान विकेट्स मिळवून दिल्या आहेत. त्याने आतापर्यंत १४ सामने खेळताना १९.५२ च्या सरासरीने २१ विकेट्स घेतल्या आहेत. या हंगामातील त्याची ३६ धावा देत ३ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
४. शार्दुल ठाकूर- २१ विकेट्स, १६ सामने (चेन्नई सुपर किंग्स)-
चेन्नई सुपर किंग्स संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथे स्थान पटकावले. त्याने १६ सामन्यात २५.०९ च्या सरासरीने २१ विकेट्स घेतल्या आहेत. या हंगामातील त्याची २८ धावा देत ३ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
५. मोहम्मद शमी- १९ विकेट्स, १४ सामने (पंजाब किंग्स)-
पंजाब किंग्स संघाचा भेदक गोलंदाज मोहम्मद शमी या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा पाचवा गोलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत १४ सामने खेळताना २०.७८ च्या सरासरीने १९ विकेट्स घेतल्या आहेत. या हंगामातील त्याची २१ धावा देत ३ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
हेही वाचा-
-लय भारी! यंदाच्या आयपीएलमध्ये ‘या’ ५ फलंदाजांचाच बोलबाला; केल्यात सर्वाधिक धावा
-राडाच ना! आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप पटकावणारे विस्फोटक फलंदाज; ऋतुराज ठरला चेन्नईचा तिसरा खेळाडू
-आमचा नाद करायचा न्हाय! आयपीएलमध्ये पर्पल कॅप जिंकणारे गोलंदाज; ‘या’ भारतीयाने पटकावल्यात दोनदा