आज आॅस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथ्या कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. पहिला कसोटी सामना जिंकणारा आॅस्ट्रेलिया संघ या मालिकेत १-२ असा पिछाडीवर आहे.
त्यात चेंडू छेडछाड प्रकरणामुळे हा संघ चांगलाच अडचणीत आला आहे. या पार्शभुमीवर हा कसोटी सामना सुरू होत असून अनेक कारणांमुळे क्रिकेटप्रेमी हा सामना कधीही विसरणार नाही.
त्यातील ३ ठळक कारणे अशी-
१. मोर्न मोर्कलचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना-
मोर्न मोर्कलचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असून मालिका सुरु होण्यापुर्वीच त्याने याची घोषणा केली होती. या मालिकेत त्याने २ सामन्यात १२ विकेट्स घेतल्या आहेत.
२. डॅरेन लेहमनचा प्रशिक्षक म्हणून शेवटचा सामना-
आॅस्ट्रेलिया संघाचा प्रशिक्षक म्हणून गेली ५ वर्ष अफलातून कामगिरी केलेल्या डॅरेन लेहमनचा हा शेवटचा सामना आहे. त्याच्याच प्रशिक्षक पदाच्या काळात आॅस्ट्रेलिया संघाने संघाने २ अॅशेस आणि एक विश्वचषक जिंकला आहे.
३. टीम पेनचा कर्णधार म्हणून पहिलाच सामना-
१२ कसोटी सामने खेळलेल्या टीम पेनचा कर्णधार म्हणून हा पहिलाच सामना आहे. यष्टीरक्षक कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. अतिशय कठीण काळात हा खेळाडू ही जबाबदारी पार पाडत आहे.