केरळ उच्च न्यायालयाने सोमवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) क्रिकेटपटू एस. श्रीशांतवरील आजीवन बंदी उठवण्याचा आदेश दिला आहे. पण बीसीसीआय श्रीशांतवरील बंदी उठवण्याबाबतीत सकारात्मक दिसत नाही. २०१३ च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये स्पॉट फिक्सिंग केल्याच्या आरोपांवर बीसीसीआयने त्याला आजीवन बंदी घातली होती.
पाहुयात कोणत्या कारणामुळे श्रीशांतला संधी देणे योग्य राहणार नाही.
१.एकदा भ्रष्ट्राचार केला की त्या खेळाडूला संधी नाही
श्रीशांतला शिक्षा देऊन बीसीसीआय सर्व युवा खेळाडूंना एक संदेश पाठवत आहे आणि असे प्रकार पुन्हा घडणार नाही याबद्दल खबरदारी ही घेत आहे. मॅच फिक्सिंग सारख्या क्रिकेटला काळिमा फासणाऱ्या गोष्टींना याच प्रकारे आळा घातला पाहिजे. तरच क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या चाहत्याचा विश्वास खेळावर टिकून राहील.
२. बीसीसीआयच्या अनुशासन समितीने त्याला दोषी ठरवले आहे
भारतात खेळाबद्दलच्या घोटाळ्या विषयी कोणताही कायदा नाही. त्यामुळे खेळा विषयीचा गुन्हा कोर्टात सिद्ध करणे खूप कठीण आहे. याच कारणामुळे श्रीशांत निर्दोष सुटला आहे. पण बीसीसीआयच्या अनुशासन समितीने श्रीशांत आणि त्याच्या बरोबरच्या दोन खेळाडूंना दोषी ठरवले आहे. भारतीय कायद्यानुसार, मॅच फिक्सिंग एक गुन्हा नाही. पण बीसीसीआयच्या कोड अंतर्गत, मॅच-फिक्सिंग हा एक दंडनीय अपराध आहे ज्यामुळे जीवनभर प्रतिबंध लागू शकते.
३. त्याने स्वतः कबुली दिली आहे
श्रीशांतने स्वतः मॅच फिक्सिंग केल्याची कबुली दिली होती. त्यात जरी तो असे म्हणाला आला की त्याच्याकडून हे काम बळजबरीने करून घेण्यात आले तरी त्याने मॅच फिक्सिंग केली हे अंतिम सत्य आहे.
२. क्रिकेट चाहत्यांचा विश्वासघात
भारतात क्रिकेटचे चाहते या खेळासाठी वेडे आहेत. भारताने जेव्हा २०११ विश्वचषक जिंकला तेव्हा या चाहत्यांनी क्रिकेटर्सला डोक्यावर घेतले होते तर जेव्हा २००७ ला सुमार कामगिरी करून विश्व्चषकाच्या पहिल्या फेरीत बाहेर पडला तेव्हा याच चाहत्यांनी क्रिकेटर्सचे पोस्टर्स जाळले होते. श्रीशांतने तर या चाहत्यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळेच हे चाहते श्रीशांतला पुन्हा भारतीय जर्सीत नक्कीच बघू इच्छित नसणार.
१. सध्याच्या भारतीय संघाला त्याची गरज नाही
सध्याच्या भारतीय संघात श्रीशांतला अजिबात जागा नाही. भारत आता कसोटीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्याचे प्रमुख कारण भारताची गोलंदाजी आहे. २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने अंतिम फेरी गाठली होती. त्या स्पर्धेत ही भारताच्या वेगवान गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. श्रीशांतला भारतीय संघात वेगवान गोलंदाज म्हणून स्थान दयायचे झाले तर नक्की कोणाच्या जागी हाही प्रश्न आहे.