शनिवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात आयपीएल २०२०चा आठवा सामना पार पडला. अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात कोलकाता संघाने ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना हैद्राबाद संघाने २० षटकात ४ विकेट्स गमावत १४२ धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाता संघाने केवळ १८ षटकात ३ विकेट्स गमावत हैदराबाद संघाचे लक्ष्य पूर्ण केले आणि सामना खिशात घातला.
तसं तर कोलकाता संघाच्या विजयात प्लेइंग इलेव्हनमधील सर्व खेळाडूंचा वाटा होता. पण त्यातील ५ खेळाडूंच्या दमदार प्रदर्शनामुळे संघाला या हंगामातील पहिला विजय मिळवण्यात यश आले. 5 Star Performer Of Kolkata Knight Riders Against Sunrisers Hydrabad
चला तर बघूया, कोण आहेत ते ५ खेळाडू
शुबमन गिल
कोलकाता संघाचा युवा फलंदाज शुबमन गिलने हैदराबादविरुद्धच्या सामन्यात नेत्रदीपक फलंदाजी प्रदर्शन केले. त्याने सलामीला फलंदाजीला येत, सामन्याच्या शेवटपर्यंत ६२ चेंडूत नाबाद राहत ७० धावांची तूफानी खेळी केली. यात त्याच्या ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. हे गिलचे आयपीएल २०२०मधील पहिले अर्धशतक ठरले. तसेच त्याने ऑयन मॉर्गनसोबत मिळून चौथ्या विकेटसाठी ९२ धावांची भागिदारी रचली.
ऑयन मॉर्गन
इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार ऑयन मॉर्गन हैदराबादविरुद्धच्या सामन्यात तूफानी खेळी केली. त्याने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत केवळ २९ चेंडूत नाबाद राहत ४२ धावांची दमदार खेळी केली. यात त्याच्या ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
नितीश राणा
आयपीएलच्या तेराव्या हंगामातील कोलकाता संघाच्या पहिल्या सामन्याप्रमाणे दूसऱ्या सामन्यातही नितिश राणाने चांगली फलंदाजी केली. त्याने फक्त १३ चेंडूत २००च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत २६ धावा कुटल्या. दरम्यान त्याने ६ चौकार ठोकले.
पॅट कमिन्स
पहिल्या सामन्यात खूप महागडी गोलंदाजी केलेल्या पॅट कमिन्सने हैदराबादविरुद्धच्या सामन्यातून दमदार पुनरागमन केले. त्याने हैदराबाद संघाच्या पूर्ण डावात ४ षटके टाकत केवळ १९ धावा दिल्या. दरम्यान त्याने यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टोची विकेट घेतली. पूर्ण डावात त्याचा इकोनॉमी रेट ४.८० इतका होता.
वरुण चक्रवर्ती
पहिल्यांदाच कोलकाता संघाकडून खेळत असणारा खेळाडू म्हणजे, वरुण चक्रवर्ती. या फिरकीपटूने आपल्या या पहिल्या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटकात केवळ २५ धावा दिल्या आणि हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरला बाद करत तंबूचा रस्ता दाखवला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हा’ खेळाडू टीम इंडियाकडून तीनही स्वरूपात खेळताना दिसेल, दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नने व्यक्त केली आशा
IPL आजचा सामना : हंगामातील दुस-या विजयासाठी पंजाब आणि राजस्थानमध्ये होणार लढत, पाहा संभाव्य संघ
ट्रेंडिंग लेख-
स्टार खेळाडूंचा होता भरणा, तरीही ‘या’ ५ कारणांमुळे हैदराबाद झाली चारीमुंड्या चीत
आयपीएलमध्ये ‘या’ संघांनी केल्यात सर्वाधिक वेळा २०० धावा
सेहवाग, गेल, डिविलियर्स या दिग्गजांमध्येही आपले वेगळेपण जपणारा मॅक्यूलम






